कर्जबुडव्या मल्ल्यावरचे कारवाईचे नाटक
संपादकीय पान गुरुवार दि. ०५ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कर्जबुडव्या मल्ल्यावरचे कारवाईचे नाटक
सरकारच्या हातावर तुरी देऊन लंडनला स्थायिक झालेल्या विजय मल्ल्या याचा पासपोर्ट जप्त करुन सरकारने त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. अर्थात हे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत. कारण भारत व ब्रिटन यांच्यात परराष्ट्र सचिवांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. परंतु यातून काहीच होणार नाही. आय.पी.एल.चे एकेकाळचे सर्वेसर्वा ललित मोदी याला देखील अशाच प्रकारचा परत आणण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु ललित मोदी लंडनमध्ये सुखासीन जीवन जगत आहे. तसेच विजय मल्ल्या याचे होणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. युनायटेड ब्रुवारीज ही देशातील सर्वात मोठी मद्य निर्मिती करणारी कंपनी मल्याची आहे. या कंपनीच्या वतीने दरवर्षी छापले जाणारे अर्धनग्न मॉडेल्सचे छायाचित्रांचे कॅलेंडर हे गाजत होते. मद्यनिर्मितीच्या व्यवसायातून कमाविलेल्या गडगंज नफ्यातून मल्याने किंगफिशर ही विमानसेवा सुरु केली. त्यासाठी मोठी स्वप्ने त्याने प्रवाशांना दाखविली. प्रामुख्याने उत्कृष्ट सेवा पुरविण्याचे आश्वासन दिले. विजय मल्ल्याच्या उडाणटप्पू मानसिकतेला हे सर्व पोषक होते. किंगफिशर या विमानसेवा कंपनीने विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून हजारो कांटी रुपयांची कर्जे काढली. ही कर्जे देतानाही बँकांनी त्यांच्यावर खैरात केली. अर्थातच यामागे मल्ल्याच्या मागे असलेला राजकीय वरदहस्त कारणीभूत होता. अशा प्रकारे राजकीय पातळीवर आर्थिक लॉबिंग करण्यासाठी विजय मल्ल्याने राज्यसभेची खासदारकी आपल्या पदरात पाडून घेतली होती. विजय मल्ल्याने बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडविल्याची बाब बँकांसह सरकारलाही गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाऊक आहे. या कर्जाखेरीज त्याच्या अन्य कर्जांच्या बुडवेगिरीबाबतची सारी माहिती तिच्या कागदपत्रांसह सरकारदरबारी होती. मात्र सरकार प्रदीर्घ काळ थंड होते. या कर्जांच्या वसुलीसाठी त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कारवाई आर्थिक संचालनालयाने (ईडी) काही महिन्यांपूर्वीच सुरू केली. खरे तर ही प्रक्रिया या अगोदरच करावयास पाहिजे होती. एवढे काळ सरकार का गप्प होते याचे कोणी उत्तर देईल काय? विजय मल्ल्या कर्जबुडवेपणा करणार असल्याचे उघड दिसत असताना या सरकारने त्याच्यावर नजर ठेवणे आवश्यक होते. एवढेच कशाला मल्ल्या लंडनला जात असल्याची खबर असतानाही त्याला तेथे अडविण्यात आले नाही. कर्जाची वसुली करण्यासाठी ज्यावेळी कोर्टात बँका धावल्या त्यावेळी सर्वांना मल्ल्याची जाग आली. मल्ल्या देशातून उघडपणे पळून जाणे हा मोदी सरकारचा मोठा पराभव आहे. एखाद्या लहान कर्जदारासाठी बँका त्याची वसुली करण्यासाठी त्याचा जीव टागंणाला लावताता. मात्र मल्ल्यासारख्या बड्या भांडवलदाराच्या कर्जाची वसुली करताना मात्र अनेक सवलती दिल्या जातात. आज केवळ मल्ल्याच नव्हे तर सुमारे १.४० लाख कोटी रुपयांची कर्जे अनेक धनवंतांनी बुडविली आहेत. त्यादृटीने पाहता मल्ल्याची रक्कव केवळ नऊ हजार कोटी रुपयेच आहे. हे मल्ल्याचे समर्थन नाही परंतु अशा प्रकारे जनतेच्या पैशातून घेतलेली ही कर्जे बुडविणार्यांच्या बाबतीत सरकार कठोर कधी होणार हा सवाल आहे.

0 Response to "कर्जबुडव्या मल्ल्यावरचे कारवाईचे नाटक"
टिप्पणी पोस्ट करा