-->
परदेश खर्चाचा बोजा!

परदेश खर्चाचा बोजा!

संपादकीय पान गुरुवार दि. ३१ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
परदेश खर्चाचा बोजा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दोन वर्षात झालेल्या परदेश वार्‍या हा चर्चेचा एक मोठा विषय होता. अर्थात तसे होणे स्वाभाविकच होते. कारण मोदींनी विदेशी दौर्‍याचा एक झपाटाच लावला होता. सध्या त्याला कुठे ब्रेक लागला आहे असे दिसते. परंतु हे तत्कालीनच असेल कारण मोदी आता पुन्हा विदेश दोरे आखीत आहेत. या दौर्‍याचा खर्च किती असेल अशी अनेकांना उत्सुकता होता. शेवटी मोदींच्या २२ महिन्यांचा परदेश दौर्‍याचा खर्च हा तब्बल १०६७ कोटी रुपये एवढा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याऊलट डॉ. मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षातील काळातील विदेश दौर्‍यांचा खर्च केवळ ३५० कोटी रुपये होता. ज्यावेळी नरेंद्र मोदी विरोधात होते त्यावेळी त्यांनी मनमोहनसिंग यांच्या विदेश दौर्‍याबाबात सडकून टिका केली होती. आता मात्र सत्तास्थानी आल्यावर हेच मोदीसाहेब विदेश दौर्‍यावर दौरे करीत सुटले आहेत. कोणत्याही देशाच्या पंतप्रधानाने विदेशात दौरे करणे हे आवश्यकच असते, उभय देशातील संबंध सुधारण्यासाठी तसेच एकूणच देशहिताचा विचार करता पंतप्रधांनांनी विदेश दौरे करणे आवश्यकच असते. आपल्याकडेही अनेक राष्ट्रांचे प्रमुख भेटीसाठी येत असतात. मात्र विरोधात असताना ज्या प्रकारची जहरी टिका मनमोहनसिंगांवर करीत होते तेच मोदी सत्तेत आल्यावर कसे बदलले व केवळ २२ महिन्यात राज्याच्या तिजोरीवर एक हजार कोटीहून जास्त रकमेचा भार टाकून कसे गप्प बसले आहेत, हे पहाणे गंमतीचे आहे. त्यातच सर्वात वाईट बाब म्हणजे विदेशात गेल्यावर जे काही पंतप्रधानांनी संकेत पाळणे आवश्यक असतात ते संकेत मोदींनी अनेकदा पायदळी तुडविले आहेत. विदेशात जाऊन आपल्या देशातील विरोधी पक्षांवर टीका करण्याचा मोह मोदी टाळू शकले नाहीत, त्यांच्या या वागण्याबद्दल बरीच टीकाही झाली. मात्र मोदी काही बदलले नाहीत. विदेशात गेल्यावरही ते देशांतर्गत आपल्या विरोधकांवर टीकेची झोड उठवितच असतात. भारत-पाक संबंध हा आपल्याकडे पराराष्ट्र संबंधांचा एक महत्वाचा संवेदनाक्षम प्रश्‍न आहे. विरोधात असताना पाकला धडा शिकविण्याची भाषा करणारे हेच मोदी सत्तेत आल्यावर मात्र पाकिस्तानला धडा शिकविणे तर दूरच परंतु त्यांच्या देसाचे अचानक दौरे करीत आहेत. त्यामुळेच पंतप्रधानांनी आजवर केलेल्या विदेशी दौर्‍यांची नेमकी फलश्रृती काय हे जनतेला समजले पाहिजे. डॉ. मनमोहन सिंग हे एवढे भले गृहस्थ होते की, युनोच्या परिषदेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करताना ते सरकारी खर्चाने न्यूयॉर्कमध्ये आले. पण त्यांची कन्या बोस्टन इथे राहत असताना तिला भेटायला जाताना अमेरिकेतली ऍमट्रॅक या दुय्यम दर्जाच्या रेल्वेने ते स्वखर्चाने तिकीट काढून बोस्टनला गेले. त्याची जाहिरातबाजी त्यांनी केली नाही. मोदींनी यापासून धडा घेण्याची गरज आहे.
------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "परदेश खर्चाचा बोजा!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel