-->
भाजपाचा धुव्वा

भाजपाचा धुव्वा

संपादकीय पान बुधवार दि. २० एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
भाजपाचा धुव्वा
राज्यात विविध भागातील नगरपंचायतींमध्ये सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. आपण केंद्रात व राज्यात सत्तेत आहोत त्यामुळे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थाही सहजरित्या काबीज करता येतील हा भाजपाचा इरादा होता. परंतु त्यात त्यांच्या नशिबी पूर्णपणे अपयश आले आहे. विविध नगरपंचायतींच्या १०२ जागांपैकी केवळ पाच जागांवर भाजपाला समाधान मानावे लागले आहे. सर्वाधिक जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. म्हणजे ३६ जागा अपक्षांनी पटाविल्या. अर्थात हे अपक्ष बहुतांशी पक्षातून बंडखोरी केलेले उमेदवार आहेत. आता सत्ता स्थापनेमध्ये त्यांची भूमिका महतत्वाची असेल. कॉँग्रेसला २१, शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी २० जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसला २१ जागा पटाविण्यास य्श आले असले तरीही कुडाळ वगळता कोणतीही नगरपंचायत त्यांच्या ताब्यात आलेली नाही. सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा नगरपालिका तसेच नगरपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते. सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने १७ पैकी आठ जागा जिंकल्या. मात्र येथे सत्ता स्थापन करताना त्यांना कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. कॉंग्रेसने सहा, भाजपाने दोन तर अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली. येथे शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. सोलापूरच्या माळशिरस नगरपंचायतीत सर्वच्या सर्व म्हणजे १७ जागा अपक्षांनी जिंकल्या. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच भाजपला येथे एकही जागा जिंकता आली नाही. सोलापूरच्याच मोहोळ नगरपालिकेत १७ पैकी सहा जागा शिवसेनेने जिंकल्या. राष्ट्रवादीला चार, कॉंग्रेस तसेच भाजपाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. तीन जागा अपक्षांनी जिंकल्या. सोलापूरच्याच माढा नगरपंचायतीत १७ पैकी १२ जागा अपक्षांनी जिंकल्यामुळे येथे राष्ट्रवादीला जोरदार हादरा बसला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हा मतदारसंघ. राष्ट्रवादीला येथे चार जागा जिंकता आल्या. एक जागा कॉंग्रेसला मिळाली. माढा तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा बुद्रुक नगरपंचायतीत भाजपला भोपळाही फोडता आला नाही. लोहारात १७ जागांपैकी आठ जागा शिवसेनेने जिंकल्या. राष्ट्रवादीला चार तर कॉंग्रेसला तीन जागा मिळाल्या. दोन अपक्ष उमेदवार निवडून आले. तसेच महापालिकांच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने नऊपैकी तीन जागा जिंकल्या. भाजपा व कॉंग्रेसने प्रत्येकी दोन तर राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एक जागा जिंकली. कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर महापालिकेतील प्रत्येकी एक जागा शिवसेनेने जिंकली. भाजपने कल्याण-डोंबिवली तसेच औरंगाबाद महापालिकेतील प्रत्येकी एक जागा जिंकली. औरंगाबाद तसेच सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील प्रत्येकी एक जागा कॉंग्रेसने जिंकली. नवी मुंबईतील एक जागा राष्ट्रवादीने तर ठाण्यातील एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. सध्याचा हा निकालाचा कल पाहता भाजपाला जनता कंटाळली आहे व प्रत्येक ठिकाणी भाजपाचा पराभव होत आहे. भाजपाचा हा धुव्वा होण्यात भाजपाचीच धोरण व फसवी आश्‍वासने कारणीभूत आहेत.

0 Response to "भाजपाचा धुव्वा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel