-->
वाढती सायबर गुन्हेगारी

वाढती सायबर गुन्हेगारी

संपादकीय पान मंगळवार दि. १९ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वाढती सायबर गुन्हेगारी
आपल्याकडे संगणकीकरण जसे वाढले तसे अनेक व्यवहार संगणकाव्दारे करण्याचा अनेकांचा कल वाढणे स्वाभाविक होते. त्याच बरोबर गेल्या दशकात आपल्याकडे क्रेडिट कार्डचा वापरही त्याच गतीने वाढला. कोणतेही पेमेंट करताना त्यात असलेली सुलभता, तत्परता व वेळ वाचणे यामुळे क्रेडिट कार्डाव्दारे पैसे देणारा ग्राहक वाढला. परंतु त्यासाठी जी योग्य खबरदारी घ्यावी लागते ती न घेतल्यामुळे सायबर चोरांचे चांगलेच फावले. गेल्या वर्षी सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे. क्रेडिट कार्डाशी संबंधीत गुन्हे १५१ टक्क्‌यांनी वाढले. तर एकूण सायबर गुन्हे ५५ टक्क्‌यांनी वाढले. आता आपल्याकडे ऑनलाईन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढलेला असताना अशा प्रकारची खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यावी याचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ऑनलाईन कंपन्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अनेकदा आपण आपले अनेक व्यवहार स्मार्टफोनव्दारे करतो. परंतु यातील आपला डाटा चोरला जाण्याची शक्यता असते याची कोणालाही फुसटशी कल्पना नसते. त्यासाठी अनेकचा नेमकी कोणती खबरदारी घ्यावी, याचा विचार करण्याची गरज आहे. अनेकदा आपल्या व्हॉटस् अँपवर किंवा एस.एम.एस.व्दारे अनोखखी मेसेज येतात. ते जर क्लिक केले तर त्याव्दारे तुमचा डाटा पळविला जाण्याचा धोका असतो. प्रत्येक संगणकामध्ये सायन्ससधारी अँन्टीव्हारस वापरणे गरजेचे असते. अनोळखी असलेल्या ईमेलला लगेचच उत्तर देणे धोक्याचे असते. क्रेडिट कार्डाच्या बाबतीत बँका अनेकदा वेळोवेळी सुचना देत असतात त्या पाळल्या गेल्या पाहिजेत. कोणालाही आपल्या कार्डाची माहिती प्रामुख्याने कस्टमर आय.डी, पासवर्ड, पीन नंबर देणे धोक्याचे असते. गेल्या वर्षी पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारांना अटका करुन त्यांना शिक्षा करण्यात यश मिळविले आहे. परंतु विषाची परिक्षा न घेणे केव्हाही चांगले, त्यामुळे त्यासंबंधी खबरदारी घेणे हे ग्राहकाचे कर्त्यव्य आहे. उघ्याचे भविष्य हे ऑनलाईन खरेदीचे आहे. प्रत्येक बाब आता घरबसल्या खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ही खरेदी कशी सुलभ होईल हे पाहत असताना यातील सुरक्षा जपण्याची अत्यंत गरज आहे. यासंबंधी जनजागृती जनतेत होण्याची आवश्यकता आहे.
------------------------------------

0 Response to "वाढती सायबर गुन्हेगारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel