-->
राष्ट्रभक्तीचे नवे परिमाण

राष्ट्रभक्तीचे नवे परिमाण

संपादकीय पान गुरुवार दि. ७ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
राष्ट्रभक्तीचे नवे परिमाण
सध्या केंद्र व राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून राष्ट्रभक्तीची परिमाणे बदलत चालली आहेत. भारत माता की जय असा नारा दिलात तरच तुम्ही राष्ट्रभक्त किंवा देशप्रेमी आहात, अन्यथा तुम्ही राष्ट्रप्रेमी नाहीत. मग त्या व्यक्तीने कितीही राष्ट्रविघातक कारवाया केलेल्या असल्या किंवा राष्ट्राचे उत्पन्न बुडविलेले असेल तरी तो राष्ट्रभक्त, अशी एक नवी व्याख्या सध्या भाजपाने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विकसीत केली आहे. आपले जे राष्ट्रगीत आहे ते जन गण मन आता बदलावे व त्याऐवजी वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्ज्या द्यावा अशी एक सूचना संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केली आहे. अजून तरी आपल्याकडे सरकारी पातळीवर जन गण मन हे राष्ट्रगीतच आहे व भविष्यातही तेच राहिल. असे असताना वंदे मातरमला अचानक संघाच्या स्थानात ऐवढे मानाचे स्थान का बरे मिळाले, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. जन गण मन हे बंकिंमचंद्र चटोपाध्याय यांंनी ज्यावेळी इंग्रजांचा राजा पंचम जॉर्ज भारतात आले त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी लिहिले होते. त्यातील उल्लेख असलेले भारत भाग्य विधाता हे पंचम जॉर्ज यांना संबोधून म्हटले आहे. परंतु आता स्वातंत्र्य मिळाल्यावर ते आपल्या देशाला, मायभूमीला संबोधले जाते. वंदे मातरम हे गीत देखील बंकिमचंद्रांनीच लिहिले. या दोन्ही गीतांनी स्वातंत्र्यपूर्व काळात व आत्ताही भारतीयांच्या मनात मानाचे स्थान आहे. परंतु जन गण मन हे आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले असताना ते बदलण्याचा काही संबंध येत नाही. खर तर संघाच्या दृष्टीने सध्याच्या राष्ट्रगीतात अनेक त्यांच्या दृष्टीने जनेच्या बाजू आहेत. पाकिस्तानातील सिंध प्रांताचा उल्लेख यात आहे. आपण स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली तरीही हा उल्लेख वगळलेला नाही. संघाला नाही तरी पाकिस्तान, बांगला देश, अफगाणिस्तान, नेपाळ यांना एकत्र केलेला एकसंघ भारत अपेक्षित आहे. केवळ वंदे मातरमला काही समाजातून विरोध केल्याने संघाचा आता हेच राष्ट्रगीत करा म्हणून अट्टाहास आहे. त्याच धर्तीवर भारत माता की जय चे चालले आहे. भारत माता की जय असे म्हणणे कुणालाही आवडेल, त्यात गैर काहीच नाही. परंतु व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करता याबाबत सक्ती करणेही चुकीचे आहे. राष्ट्रगीताच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. राष्ट्रगीताचा सन्मान प्रत्येकाने ठेवलाच पाहिजे. राष्ट्रभक्तीची ही नवी परीमाणे बदला हेच राज्यकर्त्यांना सांगणे आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to "राष्ट्रभक्तीचे नवे परिमाण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel