-->
फिक्सर श्रीशांतचे शुध्दीकरण

फिक्सर श्रीशांतचे शुध्दीकरण

संपादकीय पान सोमवार दि. २८ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
फिक्सर श्रीशांतचे शुध्दीकरण
आय.पी.एल.च्या सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरुन जेलची हवा खाऊन आलेल्या एस.श्रीशांतचे भाजपाने शुध्दीकरण करुन त्याला पक्षात जागा दिली आहे. अशा प्रकारे क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे कृत्य करणार्‍या या क्रिकेटविराला भाजपाने केवळ आपल्या मांडीवर घेतले नाही तर त्याला केरळातील थिरुअनंतपुरम येथून पक्षाचे आगामी विधानसभेसाठी तिकिट दिले आहे. २०१३ च्या आय.पी.एल. सामन्यात मॅच फिक्सिंग केल्याच्या प्रकरणी बी.सी.सी.आय.ने त्याच्यावर आयुष्यभर क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली होती. तसेच याच आरोपाखाली त्याला अटक होऊन त्याची रवानगी तिहार जेलमध्ये झाली होती. मात्र नंतर २०१५ साली दिल्ली न्यायालयाने त्याच्याविरुध्दचे आरोप रद्द केले व त्याची मुक्तता केली होती. मात्र त्याला पुन्हा खेळता येणार नव्हते. अशा या कुप्रसिध्द खेळाडूला भाजपाने आसरा दिला व त्याला थेट निवडणुकीचे तिकिटच दिले. नाहीतरी श्रीशांतचे क्रिकेट करिअर संपलेच होते त्यामुळे त्याला काहीतरी दुसरा पर्याय शोधावाच लागणार होता. तसेच केरळात भाजपाला फारसा बेस नाही. त्यामुळे असे सेलिब्रेटी चेहरे शोधून त्यांच्या जीवावर सत्ता येते का याची चाचपणी भाजपातर्फे सध्या सुरु आहे. गेल्या काही वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केरळात आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच भाजपाने पल्लकड नगरपालिकेची निवडणूक जिंकली आहे. यातून भाजपाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच भर म्हणजे श्रीशांत हा नायर समुदायातून आलेला असल्यामुळे हिंदू समाजात त्यांचे चांगलेच वजन आहे. याचा फायदा भाजपाला मिळेल असा होरा पक्षातून व्यक्त होत आहे. भाजपाची ही गणिते काही फळाला येतील असे दिसत नाही. मात्र काही जागांमध्ये भाजपा निश्चितच विजयी होऊ शकतो. केरळात कॉँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वाखालील आघाडीची अलटून पलटून सत्ता येते. यावेळी देखील कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला केरळातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे माकपच्या नेतृत्वाखाली सरकार येऊ शकते असे दिसते. त्यातच नरेंद्र मोदींचा करिश्मा आता संपत आला आहे. बिहारमधील निवडणुकांतून हे स्पष्टच झाले आहे. श्रीशांतसारख्या बदनाम झालेल्या क्रिकेटविरांना जर तिकिटे दिली तर त्याचा उलटा परिणाम भाजपा पहायला मिळू शकतो. सेलिब्रेटीच्या जीवाववर दरवेळी निवडणुका जिंकल्या जाऊ शकत नाहीत, हे भाजपाला यावेळी श्रीशांतच्या निमित्ताने पटू शकते.
-----------------------------------------------------------

0 Response to "फिक्सर श्रीशांतचे शुध्दीकरण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel