-->
सरत्या वर्षाला सलाम...

सरत्या वर्षाला सलाम...

रविवार दि. २७ डिसेंबर २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
सरत्या वर्षाला सलाम...
----------------------------------------
एन्ट्रो- यंदाचे २०१५ साल संपून नवीन वर्ष म्हणजे २०६ साल सुरु व्हायला आता जेमतेम चार दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्ष आता नेहमीप्रमाणे नवीन आशा, आकांक्षा, उर्मी घेऊन येणार आहे. सरत्या वर्षात आपण कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्या. देशासाठी या धक्कादायक घटना होत्या. त्याचबरोबर माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या जगाचा घेतलेला निरोपही चटका देणारा होता. क्रिकेटवीर विरेंद्र सहवाग याने प्रथम दर्ज्याच्या क्रिकेटला रामराम केला तर टेनीससम्राज्ञी सायना नेहवाल हिने अखेरीस जगात अव्वल स्थान पटकाविले. राजकीय घटनांमध्ये आपने दिल्लीत भाजपाला घरचा रस्ता दाखविला तर बिहारमध्ये मोदींना हिसका देत नितीशकुमार-लालू-कॉँग्रेस यांची सत्ता आली. अशा प्रकारे भाजपासाठी हे वर्ष निराशाजनक ठरले. केवळ दीड वर्षाच्या काळात नरेंद्र मोदींची लोकप्रियता झपाट्याने घसरल्याचे स्पष्ट चित्र दिसले. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळा, आय.पी.एल.चे माजी प्रमुख ललित मोदी यांचे सुषमा स्वराज व वसुंधराराजे यांचे असलेले आर्थिक हितसंबंध उघड झाले. तर वर्षाच्या अखेरीस अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर झालेल्या आरोपातून भाजपाची आणकीनच बदनामी होणार आहे. याबाबत जेटलींचे नाव न घेता झालेला भ्रष्टाचार उघड करणार्‍या किर्ती आझाद या माजी क्रिकेटपटूची भाजपातून अखेर हकालपट्टी झाली. नेपाळमधील भूकंप, चेन्नईतील विक्रमी पाऊस या घटनांतून निसर्ग आपला हिसका कधीही दाखवू शकतो, हे सिध्द झाले आहे. सरत्या वर्षात जनमताच्या रेट्यापुढे बाल गुन्हेगारांचे वय १८ वरुन १६ करण्यात आले. तीन वर्षे चर्चेच्या टेबलावर असलेले हे विधेयक संमंत व्हायला निर्भया प्रकरणी आरोपी असलेला बाल गुन्हेगार सुटण्याचे निमित्त झाले... एकूणच पाहता वर्ष सरले. घटना घडत गेल्या. आता या घटनांचा धुंडोळा घेण्याचे काम आता आपल्या हाती आहे...
------------------------------------------------  
१० फेब्रुवारी- आम आदमीचा दिल्लीत झंजावात. दिल्ली विधानसभेत ७० पैकी ६७ जागा जिंकून भाजपाला केंद्रात सत्तेत आल्यानंतरचा पहिला पराभव दाखवून दिला. भाजपाला दिल्लीत आपलीच सत्ता येणार अशी पूर्ण खात्री होती. कारण त्यापूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सहाच्या सहा जागा त्यांनी जिंकल्या होत्या. परंतु जनतेने भाजपाला घरचा रस्ता दाखवित अरविंद केजरीवाल यांच्या हाती सत्ता सोपविली.
------------------------------------------------
२० फेब्रुवारी- ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांची मृत्यूशी सुरु असलेली लढत अखेर थंडावली. त्यांची प्राणज्योत मालवल्याने पुरोगामी चळवळीला एक मोठा धक्का बसला. कोल्हापूर येथे त्यांच्यावर व त्यांच्या पत्नीवर एका अज्ञात इसमाने गोळ्या झाडल्या होत्या. कॉम्रेड पानसरे यांची हत्या ही पूर्णपणे राजकीय होती. त्यांच्यासारख्यांचा विचार संपविण्याचा सनातनी विचार करणार्‍या शक्ती या महाराष्ट्रात फोफावत आहेत हे या राज्याचे दुदैव म्हटले पाहिजे.
------------------------------------------------------
२८ मार्च- टेनिस सम्राज्ञी सायना नेहवाल हीने या क्षेत्रात जगात अव्वल स्थान पटकाविले. जेमतेम आर्थिक स्थिती असताना परिस्थितीशी झगडत सायनाने मिळविलेले हे यश भारताच्या शिरोपात एक मानाचा तुरा ठरावा असेच आहे.
-------------------------------------------------
१० एप्रिल- येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणे हे एक मोठे आव्हान परराष्ट्र मंत्रालयापुढे होते. त्यात सरकार यशस्वी झाले व तब्बल ४६४० भारतीयांचे पाय मायभूमीवर टेकले. त्याचबरोबर ४१ देशातील ९६० अन्य नागरिकांनाही भारतात आणण्यात आले.
--------------------------------------------------
२५ एप्रिल- आपला शेजारी असलेल्या नेपाळमध्ये मोठा भूकंप झाला आणि या देशावर मोठे संकटच कोसळले. सुमारे दहा हजार लोक मृत्यूमुखी पडले तसेत लाखो लोक बेघर झाले. या वर्षातली नेपाळमधील आणखी एक महत्वाची घटना म्हणजे त्या देशाने हिंदू राष्ट्र म्हणून आपली ोळख संपुष्टात आणली व सर्वधर्मीयांचे देश अशी एक नवीन पुरोगामी ओळख दाखवून दिली.
--------------------------------------------------
११ मे- बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयाची हवा खाणार्‍या तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांची कर्नाटकच्या उच्च न्यायलयाने सर्व आरोपातून निर्दोश मुक्तता केली व त्यांच्या पुन्हा मुख्यमंत्रीपदी आरुढ होण्याचा मार्ग मोकळा केला.
----------------------------------------------------
१८ जून- आय.पी.एल.चे एकेकाळचे सर्वेसर्वा ललित मोदी यांचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याशी असलेले आर्थिक हितसंबंध उघड. यामुळे भाजपा हा कॉँग्रेस से कुछ कमी नही हे स्पष्ट झाले.
----------------------------------------------------------
२१ जून- पहिला जागतिक योग दिवस जगभरात साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दिल्लीतील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
-------------------------------------------------------
६ जुलै- मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळा उघड. यातील प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षात संबंधीत सुमारे ३५ लोकांचा यात मृत्यू झाल्याने हे प्रकरण बरेच गंभीर झाले आहे.
-------------------------------------------------
२७ जुलै- माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे निधन. अब्दुल कलाम यांच्या जाण्याने आपण एक शास्त्रज्ञ, भविष्यवेधता, सन्यस्थ प्रवृतीचा माणूस गमावला.
------------------------------------------------
२७ जुलै- पंजाबमधील गुरुदासपूर येथील पोलीस स्टेशनवर अतिरेक्यांनी हल्ला केला. यामागे लष्कर ए तोयबा जबाबदार असल्याचे स्पष्ट. पाकिस्तानी अतिरेक्यांचे मनोधैर्य आता किती वाढले आहे हेच यावरुन दिसले. एकीकडे मोदी सरकार चर्चेचे गुर्‍हाळ चालवित असताना हा हल्ला झाला आहे.
-------------------------------------------
३० ऑगस्ट- कन्नड विद्यापीठाचे माजी कुलगुरु व पुरोगामी विचारवंत एम.एस. कलबुर्गी यांच्यावर धारवाड येथे त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या. डॉ. नरेंद्र दोभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पाठोपाठ आता कलबुर्गी यांची झालेली हत्या म्हणजे प्रतिगामी शक्ती प्रबळ होत असल्याचे लक्षण आहे. तसेच विचारांचा लढा हा विचारानेच देण्याचे दिवस आता संपले आहेत, हेच या हत्या दाखवितात.
-------------------------------------------------
८ नोव्हेंबर- बहुचर्चीत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या बिहारमधील निवडणुकीत अखेरीस भाजपाचे पानिपत झाले. नितिश-लालू-कॉँग्रेस यांच्या सेक्युलर आघाडीने दोन तृतीयांश बहुमत पटकावले. भाजपासाठी हा सर्वात मोठा धक्का होता. या निवडणुकीनंतर भाजपा एकदम बॅकफूटवर गेला व सेक्युलर पक्ष एकत्र येऊन लढल्यास भाजपाचा पराभव करणे शक्य आहे हे या निवडणुकीने दाखवून दिले.
----------------------------------
नोव्हेंबर- देशातील एक आघाडीचे महानगर असलेल्या चेन्नईत तुफान पाऊस पडला व त्यात हे शहर पूर्णपणे पाण्याखाली आले. अकरा वर्षापूर्वी मुंबईत अशीच तुफान वृष्टी झाली होती व त्यात मुंबई असेच पाण्याखाली आले होते. त्याची आठवण चेन्नईच्या या अवेळी आलेल्या पावसात आली. चेन्नईत सुमारे ४०० हून जास्त लोकांचे जीव गेले. महत्वाचे म्हणजे पाऊस तुफान पडला असला तरीही चेन्नईत बिल्डरांनी जे अतिक्रमण केले आहे त्यामुळे पाण्याचा बाहेर जाण्याच ओघ थांबला. यातून एकूणच आपल्याकडील नागरी जीवनाचे वास्तव उघड झाले.
----------------------------------------------------
१६ डिसेंबर- तीन वर्षांपूर्वी दिल्लीतील झालेल्या बलात्कार प्रकरणातील बाल गुन्हेगार सुटल्यामुळे पुन्हा एकदा जनतेत नाराजी उमटली. त्यामुळे जनमताच्या रेट्यापुढे सरकारला बाल गुन्हेगारांचे वय १८ वरुन १६ वर्षांवर खाली आणणे भाग पडले.
-----------------------------------------------
नरेंद्र मोदींच्या विदेश यात्रा
---------------
देश                     दिनांक
--------------------
१) सेलेशस          १० ते ११ मार्च
२) मॉरिशस          ११ ते १३ मार्च
३) श्रीलंका           १३ ते १४ मार्च
४) सिंगापूर           २९ मार्च
५) फ्रान्स             ९ ते १२ एप्रिल
६) जर्मनी            १२ ते १४ एप्रिल
७) कॅनडा            १४ ते १६ एप्रिल
८) चीन               १४ ते १६ मे
९) मंगोलिया           १६ ते १७ मे
१०) दक्षिण कोरिया     १८ ते १९ मे
११) बांगलादेश          ६ ते ७ जून
१२) उझबेकिस्तान       ६ जुलै
१३) कझागीस्तान        ७ जुलै
१४) रशिया             ८ ते १० जुलै
१५) तुर्कमेनिस्तान      १० ते ११ जुलै
१६) कायझस्तान        १२ जुलै
१७) तजाकीस्तान       १२ ते १३ जुलै
१८) यु ए ई             १६ ते १७ ऑगस्ट
१९) आयर्लंड            २३ सप्टेंबर
२०) अमेरिका            २४ ते ३० सप्टेंबर
२१) यु के               १२ ते १४ नोव्हेंबर
२२) तुर्की               १५ ते १६ नोव्हेंबर
२३) मलेशिया           २१ ते २२ नोव्हेंबर
२४) सिंगापूर            २३ ते २५ नोव्हेंबर
२५) रशिया             २४ ते २७ डिसेंबर
-----------------------------------------------
संपूर्ण वर्षात ५४ दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौर्‍यावर होते.
------------------------------------------        

0 Response to "सरत्या वर्षाला सलाम..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel