संपादकीय पान शनिवार दि. ०६ डिसेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
हिंदुत्वाचा छुपा अजेंडा
भाजपाचे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे विकासाच्या मुद्यावर आलेले आहे आणि त्यांना हिंदुत्वाचे काही देणेघेणे नाही अशी जर कुणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. अर्थात देशातील जनतेने नरेंद्र मोदींच्या विकासाच्या प्रचारावर प्रभावित होऊन त्यांना व त्यांच्या पक्षाला मतदान केले ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी भाजपाचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा आहे अशी टीका अनेकांनी करुनही भाजपा मात्र हे वास्तव नाकारते. परंतु त्यांची कृती मात्र त्याच दिशेने सुरु आहे. निदान केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी जी मुक्ताफळे उधळली, त्यामुळे ह समज व्हायला काहीच हरकत नाही. दिल्लीमध्ये राज्य सरकार रामजाद्यांचे आणायचे की हरामजाद्यांचे हे तुम्हीच ठरवायचे आहे, असे भडकविणारे आवाहन त्यांनी दिल्लीत एका सभेत बोलताना केले. या असभ्य वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. तसे होणे अपेक्षितच होते. विरोधकांना साध्वी निरंजन ज्योती यांनी ती संधी उपलब्ध करुन दिली. केंद्रीय मंत्रिमंडळातून साध्वी निरंजन ज्योती यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही विरोधकांनी लावून धरली आहे. साध्वी म्हणतात की त्यांनी याबाबत ददिलगिरी व्यक्त केली. परंतु ती दिलगिरी म्हणजे नेमके काय हे कुणालाच काही समजले नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक होणे स्वाभाविक आहे. यातील विरोधासाठी विरोधाचे राजकारण जरी जमेस धरले, तरी निरंजन ज्योती यांच्या अपशब्दांचे गांभीर्य कमी होत नाही. दिल्लीमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. सर्वात जास्त जागा मिळालेला पक्ष असूनही पुरेसे बहुमत न मिळणार याची खात्री पटल्याने भाजपने सत्तास्थापनेत काही रस दाखविला नाही. केंद्रात भाजपाने आपले सरकार आल्यावर आम आदमी पक्षात फूटाफूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातही त्यांना यश आले नाही. भाजपनंतर सर्वात जास्त जागा मिळालेल्या आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत राज्य सरकार स्थापन केले व त्याला कॉंग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला. केजरीवाल यांच्या राजकारणाचा बाज हा लहरी व लाटांवर हेलकावण्याचा असल्याने त्यांचे हे सरकार फक्त ४९ दिवसच टिकू शकले. त्यामुळे १७ फेब्रुवारी २०१४ पासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट सुरू आहे. दिल्लीमध्ये आगामी विधानसभा निवडणुका येत्या दोन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता असून या वेळी तिथे आपलेच राज्य सरकार स्थापन करायचे असा निर्धार भाजपने केला आहे. या लक्ष्यपूर्तीसाठी जे काही करावयाचे ते संयम राखून करा, हा कानमंत्र आपले नेते व मंत्र्यांना द्यायला भाजपचे अध्यक्ष अमित शहा विसरले असावेत! त्यामुळेच केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती बेफामपणे बोलू शकल्या. दिल्ली विधानसभा निवडणुका अजून जाहीरही झालेल्या नाहीत, तरी पूर्वतयारी म्हणून भाजपने तेथे आपला प्रचार सुरू केला आहे. या प्रचारात ज्या सहा केंद्रीय मंत्र्यांना भाजपने उतरवले आहे, त्यामध्ये या साध्वींचा समावेश आहे. दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीत आपणच सत्तेवर येणार, असा आत्मविश्वास अजूनही भाजपला नाही. त्यामुळेच राजकीय सोयीची जुनी हत्यारे परजून साध्वी निरंजन ज्योती यांनी जे गैरउद्गार काढले, त्या वाक्यात त्यांनी रामजादे म्हणजे रामपुत्रांचा उल्लेख केला आहे. आपण दिल्लीतली सत्ता हिंदुत्वाचे राजकारण करुन मिळवू सकतो अशी भाजपाला खात्री वाटते त्यामुळे त्यांनी साध्वींना या मैदानात उतरवून अशी भाषा वापरण्यास सांगितले असावे. १९९२ मध्ये भाजपचे तत्कालीन अध्वर्यू लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेची परिणती अखेर बाबरी मशीद उद्ध्वस्त होण्यात झाली. त्यानंतर देशात जातीय दंगली उसळल्या. या सगळ्या घटनांचा पुरेपूर राजकीय फायदा नंतरच्या निवडणुकांत भाजपने उठवला. मात्र, एक काळ असा आला की प्रभू रामचंद्रांचे नाव प्रचारात वारंवार घेऊनही देशातील मतदार भाजपला केंद्रात सत्तासूत्रे सोपवण्यास राजी नव्हते. अयोध्येमध्ये राममंदिर बांधणारच ही घोषणा त्यामुळे भाजपने बासनात गुंडाळून ठेवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यातच भाजपला नरेंद्र मोदींसारखा चेहरा मिळाल्याने त्याचाही २०१४च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला मोठा फायदा झाला. अयोध्येतील राममंदिरासारख्या मुद्द्यांमुळे काही काळ धार्मिक उन्माद करता येतो; पण सदासर्वकाळ नाही हे शहाणपण भाजप नेतृत्व शिकले असेल, असे वाटत होते. साध्वी निरंजन ज्योती यांनी पुन्हा प्रभू रामचंद्रांचे नाव वापरून आपल्या पक्षाची नीती ही मुँह में राम बगल में छुरी अशीच असल्याचे सिद्ध केले आहे. निरंजन ज्योती यांनी जे गैरवक्तव्य केले त्याबद्दल भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी या साध्वीसहित सर्वच भाजप खासदारांना कडक शब्दांत समज दिली. मात्र, हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. फतेहपूरच्या खासदार असलेल्या साध्वी निरंजन ज्योती यांनी हरामजादे असा शब्द वापरून देशातील सर्वसामान्य नागरिकांचा धडधडीत अपमानच केलेला आहे. या साध्वीने आपल्या गैरउद्गारांबद्दल माफी मागितली आहे, अशी सारवासारव करून भाजप या प्रकरणातून सहजासहजी सुटका करून घेऊ शकत नाही. देशाच्या राजकारणात सध्या बरेच बाबा, महंत, साधू, साध्वी, मुल्ला-मौलवी, ख्रिश्चन धर्मगुरू यथेच्छ गोंधळ घालत असतात. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात साध्वी निरंजन ज्योतींपासून करावी. भाजपाने व नरेंद्र मोदी यांनी या घटनेपासून बोध घेऊन आपली घटना सर्वधर्मसमभाव मानते तिचा आदर करण्यास शिकावे असे वाटते.
-----------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा