-->
संपादकीय पान गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
शेतीमालात ई ट्रेडिंगचा वापर वाढला पाहिजे
-------------------------------------------------
सध्याच्या आधुनिक युगात इंटरनेट आणि मोबाईल या दोन गोष्टी जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणार्‍या ठरणार आहेत. आगामी काळात या जर दोन बाबी तुमच्याकडे नसल्या तर तुमचे जगणे कठीण होईल, यात काहीच शंका नाही. पावलोपावली या दोन्ही बाबींची आपल्याला गरज भासणार आहे. यामुळे आपल्या जीवनाचा दृष्टीकोनच बदलून जाणार आहे. इंटरनेटमुळे आपल्या हाती एक काळ दाबल्यावर माहितीचा खजिना उपलब्ध झाला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होणार्‍या व्यवहारात तर गेल्या वर्षात झपाट्याने वाढ झाली आहे. कारम या व्यवहारात पारदर्शकता असते तसेच हे व्यवहार झपाट्यानेही होतात. शेअर बाजारांचा आपण विचार केल्यास शेअर बाजारात संगणकावर व्यवहार सुरु झाल्यावर तेथील कारभारात पारदर्शकता आली. त्यापूर्वी शेअर दलाल ग्राहकांची जी फसवणूक करीत त्याला पूर्णपणे आळा बसला. त्यापाठोपाठ विविध व्यवहार अगदी घरगुती खरेदी देखील ऑनलाईन करण्याचे प्रमाण वाढले. सध्या ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. आता शेतमालाची खरेदी-विक्री ऑनलाईन करण्याची वेळ आली आहे.  
भारतात शेतमाल वगळता इतर वस्तूंचा व्यवहारात ई-ट्रेडिंगचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. शेतमाल व्यवहार अद्यापही पारंपरिक जोखाडात अडकून पडल्याने शेतकर्‍यांचे अब्जावधी रुपयांचे आर्थिक शोषण होते. या जोखडातून शेतकर्‍यांना बाहेर काढण्याचा विडा उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांच्या सरकारने घेतला आहे. येथे राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये ई-ट्रेडिंग (ई-व्यापार) सुरू करण्यात येणार आहते. त्यापून महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांनाही यापासून धडा घेतला पाहिजेे. उत्तरप्रदेशसारखे एक तंत्रज्ञानात मागास असलेले राज्य जर शेतकर्‍यांच्या हितासाठी मंडींचे सर्व व्यवहार इंटरनेटव्दारे करीत असेल तर महाराष्ट्राने यात का मागे रहावे हा प्रश्‍न आहे. जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक नावीन्यपूर्ण बदल होत आहेत. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये (मंडी) ई-व्यवहारावर भर देण्याची महत्त्वाकांक्षी योजना उत्तर प्रदेशने आखली. बदलत्या काळाप्रमाणे बाजार समितींच्या व्यवहारात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. तसेच शेतकर्‍यांनी बाजार समित्यांमध्ये आणलेल्या शेतीमालास वाजवी दर मिळावा, त्यांचे परिश्रम कमी व्हावे आणि वेळेचा सदुपयोग व्हावा यासाठी ई-ट्रेडिंग, इ-टेंडरिंग आणि ई-ऑक्शन करण्याची योजना आहे.  देशातील आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांत काही प्रमाणात काही शेतमालांकरिता ई-ट्रेडिंग करण्यात येत आहे. मात्र सर्वच बाजार समित्यांमध्ये हा व्यवहार सुरू करण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न उल्लेखनीय मानला जात आहे. सध्या ज्या राज्यांमध्ये ई टे्रडिंग सुरु झाले आहे तेथे ते झपाट्याने लोकप्रिय होत आहे. विदेशात असा प्रकारचे शेतमालाचे व्यवहार ई-ट्रेडिंगव्दारे सुरु झालेले आहेत. हॉलंडमधील अल्समीर येथे फुलांचे जागतिक पातळीवरील सर्वांत मोठे ई-लिलाव होतात. शेतकरी तसेच व्यापारी स्वतः हजर राहून किंवा घरबसल्या लिलावात सहभागी होऊ शकतात. शनिवार, रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्या सोडून हा बाजार अविरत सुरू असतो. येथे असलेल्या सभागृहात लिलावात भाग घेणारे उपस्थित राहतात. त्यानंतर त्यांच्यासमोर एका ट्रॉलीतून फुले आणली जातात. कॅमेेराचा वापर करून प्रोजेक्टरद्वारा समोरील पडद्यावर त्याचे स्पष्ट चित्र आणि लेबलक्लेम दिसते, त्यानंतर लिलाव पुकारला जातो. या सर्व खरेदी-विक्रीत कमी परिश्रम व वेळेचा सदुपयोग होतोच. शिवाय शेतमालाला वाजवी दर मिळाल्याने शेतकर्‍याचा सर्वा्रत मोटा फायदा होतो. खरेदी करणार्‍या ग्राहकालाही कमीत कमी किंमतीत माल उपलब्ध होऊ शकतो. या सर्व प्रक्रियेत शेतकरी व ग्राहक यांच्यातील दलाल संपनिवा जातो. ग्राहक थेट खरेदी करतो. यात सर्वांचाच म्हणजे शेतकरी व ग्राहकांचा फायदा होतो. आजवर संगणकावरील व्यवहाराने लोकांच्या खरेदी बाजाराचा चेहरा पार बदलून गेला आहे. अशावेळी शेतकर्‍याला त्याचा रास्त दर मिळावा यासाठी ही पध्दती महाराष्ट्रात सुरु होण्याची नितांत आवश्यकता आहे.
-------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel