-->
संपादकीय पान बुधवार दि. ०३ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
अस्थिर पाकिस्तान, अस्वस्थ भारत
---------------------------------------
पाकिस्तानच्या भारतातील राजदूतांनी दिल्लीत ङ्गुटीरतावाद्यांशी चर्चा केल्याच्या निषेधार्थ त्या देशाबरोबर सचिव पातळीवर होणारी चर्चा थांबवण्याचा निर्णय भारताने घेतला. या निर्णयानंतर तरी पाकिस्तानला केल्या कृत्याचा पश्‍चात्ताप होईल अशी आशा होती. परंतु तसे झाले नाही. खरे तर आजवर विविध प्रकारे इशारे देऊनही पाकिस्तानने आपल्या देशाची शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. यावेळी दोन्ही देशांदरम्यान सचिव पातळीवरील चर्चा थांबवण्याच्या भारताच्या निर्णयाने दुखावलेल्या पाकिस्तानने सीमा भागात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या सशस्त्र चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या चकमकीत दोन भारतीय जवानांनाही प्राण गमवावे लागले. सीमेवरील जंगली भागातून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न अतिरेक्यांकडून सातत्याने केला जात आहे. आणखी एक संतापजनक बाब म्हणजे अतिरेक्यांना घुसखोरीत यश यावे यासाठी पाकिस्तानी जवान कव्हर ङ्गायरिंग करत असल्याचे पहायला मिळते.यावरून भारतात कारवाया करू इच्छिणार्‍या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे सहकार्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.  जम्मू-काश्मीर सीमेवर पाक सैनिकांकडून होत असलेल्या तुङ्गान गोळीबाराला लष्कराने सणसणीत उत्तर द्यावे असे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. अलिकडेच सीमेवरील २५ भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी जोरदार गोळीबार केला. त्यावेळी गोळीबाराबरोबर तोङ्गाचाही मारा करण्यात आला. त्यात जम्मूतील अरनिया, आरएस पुरा आणि अखनूर सेक्टरमधील चौक्यांना पाकिस्तानी सैनिकांनी लक्ष्य केले. गोळीबाराच्या या वाढत्या घटना लक्षात घेऊन त्या परिसरातील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन आठवड्यात पाकिस्तानने २० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. असे असताना पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त दिल्लीतच पत्रकार परिषद घेऊन भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे सांगतात तेव्हा त्या ङ्गचोराच्या उलट्या बोंबाफ ठरतात. वास्तविक सध्या पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थिती बरीच अस्थिर आहे.वाढत्या दहशतवादी कारवायांनी जनतेला हैराण केले आहे. तशाही स्थितीत हा देश भारताविरोधात कारवाया करत आहे. वास्तविक हीच शक्ती पाकिस्तानने अंतर्गत शांतता निर्माण करण्यासाठी कामी आणली तर ते हिताचे ठरणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीङ्ग सरकारविरुद्ध माजी क्रिकेटपटू व राजकारणी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साङ्ग या पक्षाने उघडलेली जोरदार मोहीम आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करायला हवा. कारण कोणतेही असो, सरकारविरुद्ध काही ना काही निमित्त शोधून राजकीय मोहीम उघडणे ही तेथील विरोधी पक्षांची राजकीय गरज असते. त्याच वेळी या पक्षांनी उठवलेले वादळ इतके तीव्र असते की, नेहमीचा भारतद्वेषाचा राग आळवल्याशिवाय राज्यकर्त्यांना स्वास्थ्य मिळत नसले, तरी विरोधी पक्षांचा आवाज दडपता येणे शक्य होते. शरीङ्ग यांच्यासाठी सध्या एकच आशेचा किरण आहे. तो म्हणजे तेथील अन्य पक्ष इम्रान खान यांना समर्थन देण्याऐवजी शरीङ्ग यांचीच अप्रत्यक्ष पाठराखण करत आहेत. याच वेळी तेथील धार्मिक नेते ताहिरूल कादरी यांनी मात्र खान यांना सक्रिय पाठिंबा दिला आहे. सुङ्गी पंथाचे कादरी हे तेथील बडे प्रस्थ मानले जाते. जिहादला अतिरेक्यांच्या तावडीतून सोडवणे ही त्यांची धार्मिक-राजकीय विचारसरणी. पाकमधील मध्यममार्गी विचारसरणीच्या नागरिकांनी भावणारी. त्यामुळेच त्यांच्या पाकिस्तान अवामी तहरीक या संघटनेला तेथील जनतेचाही चांगला पाठिंबा मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी, २०१२ मध्ये कादरी यांनी इस्लामाबादेत सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला केवळ ५० हजार लोकांचा पाठिंबा मिळाला होता. परंतु तेव्हाच्या तुलनेत मधल्या काळात तालिबानच्या दहशतवादाने पोळून निघालेल्या पाकिस्तानात कादरी यांची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. आता त्यांनी इम्रान खान यांच्या शरीङ्ग सरकारविरोधी मोहिमेला पाठबळ दिल्याने शरीङ्ग यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत भारताशी मध्यंतरी थांबलेली चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार होती. मात्र, त्याआधी दिल्लीतील उच्चायुक्ताने काश्मिरी ङ्गुटीरतावाद्यांना अधिकृत चर्चेसाठी पाचारण केल्याने भारत सरकारनेही तीव्र निषेध नोंदवताना चर्चेची दारे खुली होण्याआधीच एकतर्ङ्गी बंदही करून टाकली. हे सगळे पाहता भारताच्या मुत्सद्दीपणाचे कौतुक होणे साहजिक असले, तरी त्यामुळेच पाकिस्तानचा पाय अधिक खोलात गेला आहे. खरे तर वारंवार ताकीद देऊनही भारतातील पाकचे राजदूत बसित यासिन भारताच्या नाकावर टिच्चून राजधानी दिल्लीत काश्मीरमधील ङ्गुटीरतावादी हुरियत नेत्यांना बोलावून चर्चा करण्याचा उद्दामपणा दाखवतात तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना परराष्ट्र सचिव पातळीवरील द्विपक्षीय वाटाघाटी रोखण्याशिवाय पर्याय नव्हता.  पंतप्रधान नवाज शरीङ्ग यांच्या त्या दिल्ली भेटीनंतर दोन देशांदरम्यान सचिव पातळीवरील चर्चेची दारे खुली झाली होती. त्यानंतर व्यापारविषयक बोलणी होणार होती. तेवढ्यासाठीच शरीङ्ग यांनी दिल्ली भेटीत काश्मीरी ङ्गुटीरतावाद्यांची भेट घेण्याचे टाळले होते. पण  या सार्‍या संधीवर पाकने स्वत:हून पाणी ङ्गेरलेे. पाकने  शरीङ्ग यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार अधिकारावर असले तरी त्यावर लष्कराचे कमालीचे नियंत्रण आहे. भारताविरूध्द लढण्याची पाक लष्कराची खुमखुमी अजुनही कमी झालेली नाही. त्यामुळे भारताशी मैत्रीपूर्ण संंबंध असावेत असे शरीङ्ग यांना भलेही वाटत असले तरी तेथील लष्कर आणि आयएसआय यांना ते मान्य नाही. त्यामुळे अशा वाटाघाटी ऐन वेळी रद्द होण्यासाठी  वेगवेगळ्या आगळीकी केल्या जातात. सध्या खुद्द शरीङ्ग सरकारच अस्थिर परिस्थितीशी झगडताना दिसत आहे. एकीकडे तालिबान्यांचे दहशतवादी हल्ले वाढत असतानाच तेहरिक-ए -इन्साङ्गचे नेते इम्रान खान आणि धर्मगुरू ताहिरिल काद्री यांनी शरीङ्ग सरकारला आव्हान देत इस्लामाबाद शहरात उग्र निदर्शने केली. त्यांच्या हजारो अनुयायांनी पाक संसदेला घेराव घालून सरकारला वेठीस धरले. एकूणच पाकिस्तानातील अस्थिर वातावरणाचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे.
-----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel