संपादकीय पान शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
कोकण रेल्वेवरील डबल डेकर स्वप्नच ठरणार?
---------------------------------------------
कोकण रेल्वेवर डबल डेकर डबे असलेली ट्रेन सुरु होणार अशी स्वप्ने रेल्वे प्रशासनाने दाखविली. त्या डब्यांची ट्रायल रन झाली, ती यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता कोकणी माणसाला या ट्रेनमुळे जादा सीट उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली. येत्या गणपतीला तरी डबल डेकर ट्रेन उपलब्ध झाल्यास त्याला आपल्या गावी जाणे सुलभ होईल असे वाटू लागले होते. मात्र डबल डेकरचे हे स्वप्नच राहिल असे दिसते. मात्र ही डबल डेकर सुरू करण्यात रेल्वे प्रशासनच अडथळे निर्माण करीत असल्याचे चित्र दिसत आहे. मध्य रेल्वेबरोबरच, कोकण रेल्वेकडूनही ही ट्रेन चालवण्याबाबत उदासीनता दिसून येते. याबाबत मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्रवासी सुरक्षेच्या नावाखाली विचारलेल्या प्रश्नांना रेल्वे अधिकार्यांना उत्तरे देणे कठीण जात असल्याचे सांगितले जाते. कोकणवासीयांसाठी एकही पूर्णपणेे एसी ट्रेन आजवर उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे एसी डबल डेकर ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. या ट्रेनच्या चाचण्या रेल्वेच्या आर.डी.एस.ओ.कडून घेण्यात आल्यानंतर कोकण मार्गावर आणि मध्य रेल्वेवर धावण्यास अडथळा नसल्याचे अहवालात सांगण्यात आले. त्यानंतर हा अहवाल कोकण व मध्य रेल्वेला आर.डी.एस.ओ.ने सादर केल्यानंतर मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांना हा अहवाल देणेे गरजेचे होते. मात्र तो अद्याप सादर करण्यात आलेला नाही. उलट कोकण रेल्वेकडून आलेल्या अहवालावर सुरक्षा आयुक्तांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची प्रत एक आठवडयापूर्वी कोकण रेल्वेला पाठवली आहे. तर मध्य रेल्वेकडून आर.डी.एस.ओ.चा अहवाल आलेला नसतानाही सुरक्षा आयुक्तांनी कोकण रेल्वेला पाठविलेली एक प्रत मध्य रेल्वेलाही पाठवली. परंतु आठ दिवस उलटूनही या पत्रवर कोकण आणि मध्य रेल्वेकडून कुठल्याही प्रकारचे उत्तर देण्यात आलेले नाही. या पत्राचे उत्तर देण्यास रेल्वेचे प्रशासनच उदासीन असल्याचे यातून दिसते आहे. त्यातच सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी कोकण आणि मध्य रेल्वेला पाठवलेल्या पत्रात भलतेच आणि अजब प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रवाशांच्या सुरक्षाविषयक प्रश्न उपस्थित करण्याऐवजी वेळ, देखभाल आणि दुरुस्तीसंबंधी अनेक प्रश्न त्यामध्ये आहेत. रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडून काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्याची उत्तरे लवकरच देण्यात येतील. ही ट्रेन लवकरात लवकर चालवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले असले तरी ही ट्रेन सुरु करण्यास एवढा विलंब होण्याचे काहीच कारण नाही. आमच्याकडून अहवाल सुरक्षा आयुक्तांना गेलेला आहे. त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. मात्र विचारलेले प्रश्न कोकण आणि मध्य रेल्वेशी संबंधित असल्याने दोघेही एकत्रित निर्णय घेऊ, असे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे म्हणाल्या. कोकण आणि मध्य रेल्वेकडून या प्रकरणी उत्तरे देण्यास एवढा उशीर का लागत आहे, हे कुणालाच समजत नाही. ही ट्रेन अधिक जलद धावण्यासाठी परवानगी मागण्यात येणार आहे. तसेच रेल्वेच्या नियमानुसार निदान सहा ते सात तास एक्स्प्रेस-मेल ट्रेनची देखभाल करण्यास लागतात. मात्र लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव धावणारी एसी डबल डेकर ट्रेन एकच असल्याने आणि ती ११ तास धावणार असल्याने देखभाल कशी शक्य होईल? हा आणि असे अनेक प्रश्न सुरक्षा आयुक्तांनी विचारले आहेत. अर्थात अशा प्रकारचे प्रश्न हे शुल्लक आहेत. काही ना काही तरी प्रश्न उपस्थित करुन या ट्रेनमध्ये विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यात कदाचित कोकण रेल्वे व मध्य रेल्वे यांच्यातील भांडणाचीही किनार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या गणपतीपूर्वी तरी ही ट्रेन सुरु होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे कोकणवासियांना आंदोलनाचा मार्ग चोखाळावा लागेल असेच दिसते.
-----------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा