संपादकीय पान शनिवार दि. २ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
आवाज लाल बावट्याचा!
-----------------------------------
शेतकरी कामगार पक्षाचा आज ६७ वा वर्धापन दिवस. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पनवेल तालुक्यातील कामोठे येथे पक्ष सदस्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लाल बावट्याचे शिलेदार या मेळाव्याला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने उपस्थित राहातील. यंदाच्या मेळाव्यावर शेकापचे ज्येष्ठे नेते व माजी मंत्री मोहनभाई पाटील यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. परंतु असे असले तरीही मोहनभाईंचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी शेकापचे कार्यकर्ते कामास लागेले आहेत. या दुख:त बातमीच्या बरोबरीने शेकापला पुन्हा त्यांचे जुने निवडणुक चिन्ह खटारा पुन्हा मिळाल्याने एक सुखाची झालर लाभली आहे. गेल्या वर्षी शेकापचा मेळावा प्रथमच मुंबईत षणमुखानंद या भव्य सभागृहात घेण्यात आला होता. त्यावेळी शेकापच्या लाल बावट्यांनी मुंबई भर पावसात लाल झाली होती. अर्तात शेकापचा हा लाग रंग गेल्या वर्षात अधिकच गडद झाला. त्याचाच परिणाम म्हणून अलिकडेच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीत शेकापच्या महिला उमेदवार विजयी झाल्या आणि मुंबई महानगरपालिकेत शेकापचा लाल बावटा फडकला. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकाची ताकद ही एखाद्या आमदाराशी तुल्यबळ असते. आता यंदाचा मेळावा हा पनवेल तालुक्यात होत आहे. त्यामुळे पनवेलमधील आमदारकीच्या जागा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत जिंकून शेकाप आपला ठसा उमटवेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे. यावेळचा मेळावा हा आगामी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना होत असल्याने त्याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. कारण शेकाप आपला डावा विचार कायम ठेवीत विकासाचे राजकारण करीत आला आहे. भविष्यात होणार्या निवडणुकांमध्ये शेकापची भूमिका कोणती असेल याची दिशा कार्यकर्त्यांना यातून लाभेल. पूर्वीचे निवडणूत चिन्ह खटारा पुन्हा ताब्यात आल्याने शेकापचे जुने वैभव परतले आहे. पूर्वी ज्याप्रमाणे शेकाप राज्यव्यापी एक आक्रमक पक्ष म्हणून राज्यात ठसा उमटवून होता, ती प्रतिमा शेकापला पुन्हा मिळण्यासाठी ऐक एक पावले टाकली जात आहेत. नवीन पिढी शेकापच्या साथीला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पिढ्यान पिढ्या पक्षासोबत असलेली कुटुंब आहेत ती पक्षाची मोठी ताकद आहे. पक्षाने नव्याने कात टाकून उभारी घेत असताना नव्या माध्यमांना आपलेसे करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी गेल्या वर्षीच्या मेळाव्यात शेकापने आपल्या वेबसाईटचे उद्घाटन केले होते. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या वेबसाईट सुरु करुन सोशल मिडियामध्ये पक्षाने प्रवेश केला. केंद्रात नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत सोशल मिडियाची ताकद दाखवून दिल्याने आपल्यालाही आगामी निवडणुकीत आक्रमक प्रचार करण्यासाठी सोशल मिडिया वापरावा लागणार आहे, हे वास्तव शेकापने स्वीकारले आणि त्यादृष्टीने वाटचाल सुरु केली. यंदाच्या निवडणुकीत सोशल मिडीया एक महत्वाचे प्रचार माध्यम ठरणार आहे हे नक्की. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापला आपला प्रतिनिधी दिल्लीत पाठविण्यात यश जरुर आले नसले तरी यावेळी विधानसभेत शेकापची ताकद निश्चितच वाढणार आहे. कोणत्याही निवडणुकीत पराभवाने खचून जाणारा पक्ष शेकाप नाही. गेल्या ६७ वर्षाच्या इतिहासात शेकापने अनेक पराजय जसे पाहिले तसेच विजयश्रीही खेचून आणलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शेकाप अग्रभागी होता. त्यानंतर शेतकरी, कामगार व कष्टकर्यांच्या प्रत्येक चळवळीत शेकाप आघाडीचा शिलेदार म्हणून या वर्गाच्या बरोबीने राहिला आहे. १९५२ साली शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली २८ आमदार निवडून आले होते. आजवर राज्य विधानसभेच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे २१ वेळा विरोधी नेतेपद शेकापकडे राहिले आहे. शेकापला भाई दाजीबा देसाई, उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, नारायण नागू पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, विठ्ठलराव हांडे, एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाची एक जाज्वल्य परंपरा शेकापला लाभली आहे. १९४८ साली स्वातंत्र्यानंतर कॉँग्रेसच्या भांडवली विचारसारणीच्या नेत्यांशी न जुळल्यामुळे समाजवादी विचार रुजविण्यासाठी कॉँग्रेसमधील काही नेत्यांनी बाहेर पडून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. त्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जागतिक युध्दापासून कम्युनिस्टांनी केलेल्या चुका सुधारुन समाजवादी विचार रुजविण्यासाठी शेकापने जे व्रत हाती घेतले ते आजपर्यंत. गेल्या काही वर्षात केवळ आपल्या देशातच नाही तर जगातीक पातळीवर डाव्या पक्षांची ताकद क्षीण झाली असली तरी शेकापने आपली ताकद रायगड जिल्ह्यात कायम राखली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे शेकापने आपली नाळ आम जनतेशी अजूनही घट्ट जोडली आहे. ग्रामपंचायत पासून ते जिल्हापरिषद ते विधानसभा व लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे. हेच कार्यकर्ते पक्षाची मोठी ताकद ठरले आहेत. गेल्या तीन वर्षांपूर्वी आमदार भाई जयंत पाटील यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीस पदाची सुत्रे आली आणि पक्षाने कात टाकली. एघकानव्या उणर्ईने पक्षाने राज्यात कामाला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद आपल्याला उमटलेले दिसतीलच. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिकवेळा निवडून जाण्याचा म्हणजेच ५० वर्षे आमदार राहिल्याचा विक्रम गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. गणपतरावांसारखे असे अभ्यासू नेते, कार्यकर्ते शेकापमध्ये मोठ्या संख्येने आहेत. ़गेल्या ६७ वर्षाच्या वाटचालीनंतर शेकाप आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. आपल्या डाव्या विचारसारणीशी कोणतीही तडजोड न करता विकासाचा ध्यास शेकापने घेण्याचे ठरविले आहे. या विचारसारणीशी सहमत असणार्या पक्षांना सोबत घेऊन एक नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न, एक नवी उर्मी शेकापकडे आहे. आजच्या मेळाव्यात अशा प्रकारे शेकापच्या लाल बावट्याचा आवाज पुन्हा एकदा दुमदुमणार आहे. एक नवी पहाट यातून उगवणार आहे हे नक्की.
----------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा