-->
संपादकीय पान बुधवार दि. ५ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
मोबाईल रेडिओ: एक नवीन माध्यम
--------------------------------
सध्याच्या काळात नवनवीन माध्यमांचा जन्म होत आहे. पाच वर्षांपूर्वी आपल्याकडे सोशल नेटवकिर्ंंग काय हे कुणास ठाऊक नव्हते. आता मात्र प्रत्येकाच्या तोंडावर सोशल नेटवर्किंगचेच नाव असेत. हे माध्यम गेल्या पाच वर्षात झपाट्याने विस्तारले. पूर्वी आल्याकडे रेडिओ हे माध्यम सर्वात लोकप्रिय होते. मात्र जसा गेल्या पंचवीस वर्षात टेलिव्हिजनचा प्रसार होऊ लागला तसे रेडिओ हे माध्यम मागे पडत गेले. अर्थात एफ.एम. चा नवीन साज घेऊन रेडियो चॅनेल्सचा जन्म आपल्याकडे झाला आणि शहरात हे नवीन माध्यम पुन्हा एकदा लोकप्रिय झाले. एफ.एम. रेडिओ आता अनेक शहरात लोकप्रिय होऊ लागले आहेत. मएा६ त्यापुढे जाऊन आता रेडिओतिल एक नवे माध्यम म्हणजे मोबाईल रेडिओ जन्माला आले आहेत. कुणासही याचे आश्‍चर्य वाटेल परंतु बिहारमधील एका खेडेगावात जिकडे रेडिओ पोहोचत नाही तिकडे प्रायोगिक तत्वावर हिंदुस्थान लिव्हर या कंपनीने प्रयोगिक तत्वावर मोबाईल रेडिओ सुरु केला आणि हा रेडिओ आता लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. हा रेडिओ म्हणजे ग्रामीण भागातील जनतेसाठी एक करमणुकीची मोठी खाण टरला आहे. हिंदुस्थान लिव्हर ही कंपनी यात आपल्या विविध उत्पादनांची जाहिरात करते व आपला कर्च भगविते. त्यांच्यासाठी आपल्या वस्तूंची जाहीरात एैकणारा हक्काचा ग्राहक मिळाला आहे आणि हा रेडिओ एैकणार्‍यासाठी फुकटची करमणूक उपलब्ध झाली. अशा प्रकारे या रेडिओच्या माध्यमातून विक्रेती कंपनी व ग्राहक या दोघांचाही फायदा झाला. या सेवेला रेडिओ ऑन डिमांड असे नाव देण्यात आले आहे. यानुसार एखाद्याला हा रेडिओ एैकावयाचा असल्यास त्याने कंपनीने दिलेल्या मोबाईल नंबरवर मिस कॉल फक्त द्याचा. दुसर्‍या क्षणाला कंपनीकडून कॉल केला जातो. व त्याव्दारे पंधरा मिनिटे मोफत रेडिओ सुरु केला जातो. प्रत्येक पंधरा मिनीटांनंतर हा रेडिओ बंद होतो. ग्राहकाला पुन्हा पाहिजे असल्यास त्याने पुन्हा मिस कॉल द्यायचा की पुन्हा हा रेडिओ सुरु होतो. या रेडिओव्दारे संगीत, विनोद, शेर एैकविले जातात आणि लोकांची निख्खळ करमणूक केली जाते. ज्या भागात आपल्याकडे एफ.एम. रेडिओ पोहोचलेले नाहीत तेथील गावकर्‍यांसाठी करमणुकीची ही एक सुवर्ण संधी ठरते. हिंदुस्थान लिव्हरचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्यांनी त्यांच्या अन्य रेडिओवरील जाहीराती आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त या रेडिओसाठी कोणत्या क्रमांकावर नंबर फिरवायचा तो क्रमांक जाहीर करण्यासाठीच ठिकठिकाणी जाहीरात आता केली जाते. कंपनीच्या वितरकांच्या दुकानातही या रेडिओचे क्रमांकाचे फलक झळकताना दिसतात. कंपनीकडे आता अल्पावधीतच सुमारे ५० लाख मिस कॉल्स आले आहेत. सरासरी ते एक लाख ग्राहकांशी याव्दारे संपर्कात राहातात. बिहारमधील आपल्या ग्राहकांना खूष करण्यासाठी काही स्थानिक भाषेतील गाणी व संवाद त्याव्दारे देण्यास सुरुवात केली आणि त्याला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.बिहारमधील हा प्रयोग यशस्वी झाल्याने हिंदुस्थान लिव्हरने आता शेजारच्या झारखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यातही हा रेडिओ सुरु करण्याची योजना आखली आहे. गेल्या चार महिन्यांत कंपनीकडे सुमारे १.६ कोटी कॉल्स आले. त्याहून महत्वाची बाब म्हणजे कंपनीला असे आढळले आहे की ज्या विभागात हा रेडिओ लोकप्रिय आहे त्या ठिकाणी कंपनी साबण व्हिलची विक्री २५ टक्क्यांनी वाढली आहे. कंपन्या सध्याच्या स्पर्धेच्या काळात कशा प्रकारे आपल्या उत्पादने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारे नवनवीन युक्त्या योजतात ते दिसते. हा प्रयोग सफल झाल्याने आता अन्य कंपन्याही यात उतरतील आणि मोबाईल वाणीचे एक नवे पीक जन्माला लवकरच येणार हे नक्की.
---------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel