संपादकीय पान शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
यंदाच्या निवडणुकीच्या निकालाची चावी तरुणाईकडे
----------------------------------
आपला देश हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. देेशातील एकूण ५० टक्क्याहून जास्त जण हे चाळीशीच्या खालचे आहेत. आपल्या शेजारच्या चीनमध्येही तरुणांचे प्रमाण ऐवढे नाही. आपल्याकडे तरुणांची एवढी मोठी संख्या असल्यामुळे सोशल नेटवर्कचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. देशातील तरुणाईचा सोशल नेटवर्किंगवर जबरदस्त प्रभाव आहे. आता त्यापुढे म्हणजे आगामी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत तरुणाईच्या हातात निवडणूक निकालांची चावी असणार आहे. यएाचेकारण जवळजवळ प्रत्येक लोकसभा मतदारसंघात १८ ते २२ या वयोगटातील पहिल्यांदा मतदान करणार्या तरुणांची संख्या सुमारे ९०,००० ऐवढी आहे. त्यामुळेच देशातील जवळजवळ प्रत्येक पक्षाने या तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात १८ ते १९ या वयोगटातील प्रथम मतदान करणारा मतदार हा सुमारे २४ टक्के म्हणजे ४२ हजार एवढ्या संख्येने सरासरी असेल. हा आकडा महत्वाचा आहे. कारण गेल्या वेळच्या निवडणुकीत २२६ मतदारसंघात उमेदरांना विजयासाठी एवढेच मताधिक्य मिळाले होते. सध्या ज्यांचे वय २२ आहे व ते दुसर्यांदा मतदान कराती आहेत अशा तरुण मतदारांची संख्या सरासरी ९० हजार एवढी आहे. त्याशिवाय २२च्यापुढे व २८च्या आत वय असलेल्यांची संख्या आणखी आहे. राजस्थान (२५जागा), छत्तीसगढ (११जागा), मध्यप्रदेश (२९), पश्चिम बंगाल (४२), उत्तरप्रदेश (८०) व आसाम (१४) या सहा राज्यात तरुण मतदार प्रामुख्याने १८ ते १९ वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ८१.५ कोटी लोक मतदान करण्यासाठी पात्र ठरतील. गेल्या वेळी पाच वर्षापूर्वी मतदारांची संख्या ७१.७ कोटी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मतदार १३.६ टक्क्यांनी वाढले आहेत. संख्येचा विचार करता २.३२ कोटी मतदार वाढले. यात पहिल्यांदा मतदान करणारे २४ टक्के आहेत. यावेळी तरुणाई कोणत्या पक्षाच्या बाजूने उभी राहाणार त्यावर बरेचसे ठरेल. कारण तरुणांची संख्याही वाढील आहे आणि तरुण मतदारांना मतदान करण्यात उत्सुकता असल्याने ते मोठ्या संख्येने मतदानासाठी येणार आहेत. यामुळेच बहुतांशी सर्व पक्षांनी आपली जाहीरातबाजी करताना तरुणांना लक्ष्य केले आहे. गुजरातच्या दंगली विषयी हे तरुण आपले मत काय तयार करतात त्यावर बरेचसे गणित बांधले जाऊ शकते. आजचा पहिल्यांदा मत देणारा मतदार हा दंगलींच्या वेळी सहा ते दहा या वयोगटातील होता. या मतदाराने दंगलीच्या काळात जे उपभोगले असेल, त्यातून त्याच्या मनावर काही बिंबले असणार. त्यातून तो आपले मत कोणाला घ्यायचे ते ठरविणार आहे. तरुण मतदाराला भ्रष्टाचाराची, महागाईची व त्याला रोजगाराच्या पुरेशा संधी मिळत नसल्याबद्दल चीड आहे. दिल्लीतील विधानसभेच्या निवडणुकीत याच मतदाराने कॉँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना नाकारुन मोठ्या प्रमाणावर आम आदमी पक्षाला मतदान केले होते. आता लोकसभेला हा मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याला महत्व आहे. प्रत्येक तरुण आपल्या बाजूने राहावा यासाठी भाजपा व कॉँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रचार करुन तरुणाईला आपल्याकडे खेचण्याचा प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत आहे. यात सर्वात जोरदार आघाडी भाजपाने उघडली आहे. तर कॉँग्रेसला सोशल मिडियाबाबत उशीरा जाग आली. सोशल मिडिया हे तरुणांची मते तयार करण्यासाठी प्रभावी ठरणार असले तरीही या तरुणाची स्वतची म्हणून प्रत्येक पक्षाबाबत मते असणार आहेत. तरुणांची एक गठ्ठा मते कोणत्याही एका पक्षालाच मिळतील असे म्हणणे चुकीचे ठरेल. यावेळी मात्र तरुणांची मते महत्वाची ठरणार आहेत हे नक्की.
-------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा