संपादकीय पान बुधवार दि. १२ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
------------------------------------
मुंबई-गोवा बोटीचा भोंगा पुन्हा वाजणार
------------------------------
जवळजवळ दोन दशकानंतर आता पुन्हा एकदा मुंबई-गोवा बोट सुर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना त्यांनी श्रीलंकेत शांती सेना पाठविण्याचा निर्णय् घेतला आणि मुंबई-गोवा मार्गावर असलेल्या बोटीतून भारतीय सैनिक श्रीलंकेत पाठविण्यासाठी ही सेवा स्थगित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही सेवा जी थांबली ती अजून पर्यंत काही सुरु झालेली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याकडे मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते कराची या बोटींचा प्रवास फार लोकप्रिय होता. हा प्रवास स्वस्त असल्याने चाकरमण्यांना परवडतही असले आणि या प्रवासात दगदग नसल्याने सुखाचा प्रवास होई. फाळणीनंतर मुंबई-कराची ही सेवा बंद पडली आणि नंतर सुरु होण्याचे काही कारणही नव्हते. मएात्र मुंबई-गोवा ही बोट सेवा खरे सुरु राहिली पाहिजे होती. दहा वर्षापूर्वी दमानियांनी ही बोट अत्याधिुनक अवतारात सुरु करण्याचे ठरविले मात्र त्यांचा हा प्रयोग फसला. आता मात्र ही सेवा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा सुरु करण्यासाठी आता राज्य सरकारने निविदा मागविल्या आहेत. अर्थात ही सेवा सुरु करण्यासाठी किमान चार ऑपरेटर्स इच्छुक असल्याचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने म्हटले आहे. त्यामुळे बहुदा ही सेवा सुरु होण्याची शक्याता निर्माण झाली आहे. १९७० सालापासून कोकण सेवक व कोकण शक्ती या दोन बोटी नियमीत सुरु होत्या. सरकारी मालकीच्या असलेल्या मुगल लाईन्स शिपिंग लि. या कंपीनमार्फत चालत होत्या. तसेच मुंबई-गोवा मार्गावर एम.व्ही. मुगल ही बोटही चालविली जात होती. काही काळ ही बोट हाज यात्रेकरुंच्या ने-आण करण्यासाठी वापरली जाई. गोवा मार्ग बंद केल्यापासून आता ही बोट अंदमान येथे पर्यटकांच्या वाहतुकीसाठी वापरली जाते. आता मात्र मेरिटाईम बोर्डाने मुंबई-गोवा वाहतुक सुरु व्हावी यासाठी नव्याने प्रयत्न सुरु केले आहेत. जर ही बोट सेवा सुरु झाली तर कोकणातील व गोव्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. सध्याच्या योजनेनुसार, ही प्रवासी बोट गणपतीपुळे, मालवण, वेंगुर्ला, तारकर्ली येथे थांबे घेईल. शेवटचा या प्रवासातील टप्पा गोवा असेल. प्रवासी मधल्या थांब्यावर उतरु शकतील किंवा मध्ये उतरुन थांबा घेऊन पुढील प्रवास करु शकतील. सुमारे ५०० प्रवासी एकावेळी नेण्याची क्षमता या बोटींची असेल. जवळपास ट्रेनच्या तिकिटाऐवढे भाडे बोट आकारेल व गोव्याला जाण्यासाठी सुमारे नऊ तास सागतील. म्हणजे रेल्वे व बसच्या वेळेपेक्षा कमी वेळ लागेल. यापूर्वी मुंबई-गोवा प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली होती. मात्र तो प्रयोग फसला या मागचे महत्वाचे कारण होते ते म्हणजे २०० क्षमता असलेल्या बोटी वापरण्यात आल्या होत्या. प्रवाशांची संख्या कमी असल्याने भाडे महाग पडत होते आणि त्यामुळे लोक सध्याच्याच मार्गाने जाणे पसंत करु लागले. त्याऐवजी जर किमान ५०० क्षमता असलेल्या बोटी वापरल्या तर प्रवासी भाडे हे रेल्वे ऐवढे ठेवता येईल असा अभ्यास मेरिटाईम बोर्डाने केला. त्यामुळे यावेळचा प्रयोग फसणार नाही असा विश्वास आहे. ही सेवा जर खरोखरीच सुरु झाली तर कोकणाच्या विकासाला एक नवी गती मिळू शकेल. कोकणातील बंदरे पुन्हा विकसीत होतील आणि तेथील प्रवाशांची वर्दळ वाढल्याने कोकणात पर्यटक वाढू शकतील. एकदा या बोटी स्थिरावल्या की महागड्या व आलिशान बोटी प्रामुख्याने पर्यटकांसाठी येथे सुरु करता येईल. कोकणाचा चेहरामोहरा बदलू शकणार्या या बोटींचा भोंगा आता कधी वाजतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा