-->
संपादकीय पान सोमवार दि. २४ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
------------------------------------
७७००कोटी रुपयांची मालमत्ता असलेला उमेदवार
------------------------------
बंगळूरमधून कॉँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले नंदन निलकेणी यांनी एकूण मालमत्ता ७७०० कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. आय.टी. उद्योगातील पहिल्या पिढीतील उद्योजक म्हणून ओळखलेले गेलेल्या निलकेणी यांची केंद्र सरकराने आधारच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र अलिकडेच त्यांनी याचा राजीनामा देऊन रितसर कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला व बंगळूरमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जाहीर केलेल्या अवाढव्य मालमत्तेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र त्यांची ही मालमत्ता कोणत्याही अवैध मार्गाने कमविलेली नाही. सध्याच्या घाणेरड्या राजकारणात आपल्याला निलकेणीसारखे पारदर्शक व्यवहार असलेले राजकारणी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सापडतील. आय.टी. उद्योगातील आघाडीची कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. या कंपनीची स्थापना करण्यात निलकेणी यांच्यासोबत पाच जण तरुण आय.आय.टी.यन होते. त्यातील एक नारायण मूर्ती होते. सुमारे तीस वर्षापूर्वी त्यांनी इन्फोसिस ही कंपनी दहा हजार रुपये कर्जावू घेऊन स्थापन केली होती. निलकेणी यांच्याकडे तर आय.आय.टी. झाल्यावर खिशात फक्त दोनशे रुपये होते. तो काळ म्हणजे आय.टी. उद्योगाची सुरुवात होती. बौध्दीक संपत्तीच्या जीवावर उद्योगधंदा स्थापन करुन आपण अब्जोवधी रुपये मिळवू शकतो याची या तरुणांना काडीमात्र कल्पना नव्हती. कारण त्यापूर्वी एकादा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती. परंतु आता संगणकीकरणाच्या युगाचा प्रारंभ झाल्यावर हे चित्र पालटले. बौध्दीक सामर्थ्याच्या बळावर पैसे मिळविण्यास प्रारंभ झाला. नंदन निलकेणी, नारायणमूर्ती, अझीम प्रेमजी, शिव नाडर ही या नवीन पिढीच्या उद्योगपतींची नावे. त्यांनीच आपल्या देशातील भांडवलशाहीची संकल्पना बदलण्यास फार मोठा हातभार लावला. अशा या बौध्दीक संपत्तीच्या जीवावर अब्जावधी रुपये कमविलेल्या निलकेणी यांची आजची मालमत्ता ही ७७०० कोटी रुपये आहे. यात त्यांनी कोणत्याही अवैध मार्गाचा अवलंब केलेला नाही. किंवा विदेशात पैसा लपविलेला नाही. तसेच आपला पैसा अन्य कुणाच्या नावे बेनामीत ठेवलेला नाही. त्यांनी आपले सर्व व्यवहार साफ ठेवले आहेत व वेळोवेळी कर ही भरलेला आहे. त्यांची कधीच कर चुकविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्याकडील एकूण मालमत्तेच्या ८० टक्के रक्कम ही इन्फोसिसच्या समभागाच्या रुपाने आहे. जर ते निवडून आले तर तर सध्या असलेल्या खासदारातील सर्वात श्रीमंत ठरतील असे सध्या तरी चित्र आहे. २००४ साली कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले नागालॅँडचे खासदार एन.एन. लोथा यांची मालमत्ता ९००० कोटी रुपयांची होती. सर्वाधिक मालमत्तेचा त्यांचा संसदेतील विक्रम अजून कोणी मोडू शकलेला नाही. लोथा यांची नागालँडमध्ये १५ चौरस कि.मी. जमीन आहे. निलकेणी यांच्या विरोधात असलेले अनंतकुमार उमेदवार हे पाच वेळा भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची मालमत्ता मात्र ३.६ कोटी रुपयेच आहे. निलकेणी यांची एवढी अवाढव्य मालमत्ता असली तरीही त्यांचा त्याचा कधीच बडेजाव केला नाही व दिखावा केला नाही. ते अगदी सर्वसामान्याप्रमाणे राहणे पसंत करतात. सध्याच्या लोकसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मंत्री प्रफुल पटेल यांची मालमत्ता मंत्र्यांमध्ये सर्वाधिक आहे. त्यांनी आपली मालमत्ता १२२ कोटी रुपये असल्याचे दाखविले आहे. निलकणी यांनी आपल्या संपत्तीवर मोठ्या रकमा सामाजिक कार्यासाठी देणग्यांच्या स्वरुपात दिल्या आहेत. १९९९ सालापासून त्यांनी आजवर ४०० कोटी रुपयांच्या देणग्या सामाजिक कार्यासाठी दिल्या. निलकेणी म्हणतात, इन्फोसिसने मला भरपूर काम करण्याची संधी दिली. भरपूर पैसे दिले. त्यातून मी विविध संस्थांना देणग्या दिल्या व समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो याची जाणीव ठेवून हे काम केले. आता मी राजकारणात लोकांना माझ्याकडील देण्यासाठी उतरत आहे. त्यांचे हे उद्दगार फार मोलाचे आहेत.
-------------------------------------      

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel