-->
संपादकीय पान बुधवार दि. १९ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
------------------------------------
बेपत्ता मलेशियन विमानाचे वाढते गुढ
-----------------------------
मलेशियन एअरलाईन्सचे कौलंलापूरहून बिजींगला २२७ प्रवासी व १२ कर्मचारी असलेले बोईंग ७७७ या जातीचे विमान ८ मार्चपासून रडारवरुन गायब झाल्यापासून बेपत्ता झाले आहे. आज पर्यंत या विमानाचा पत्ताच लागलेला नाही. या विमानात स्फोट झाला की हे विमान समुद्रात कोसळले याविषयी सर्व तर्कच लढविले जात आहे. अजून या विमानाचा साधा मागमूसही लागू नये याचे आश्‍चर्य वाटते. आता नवीन एका चर्चेनुसार हे विमान पळवून नेण्यात आले व भारतातील एका इमारतीवर नेऊन आदळले जाणार होते. परंतु त्यापूर्वीच ते समुद्रात कोसळले. मात्र याला अजून नेमकी पुष्टी मिळत नाही, त्यामुळे हे केवळ अंदाज व्यक्त होत आहेत. जगातील विमाने मॉनिटर करणारी जगातील अत्याधुनिक यंत्रणा पाहता या विमानाचा अजून मागमूस लागू नये त्यामुळे एकूणच या प्रकरणी गूढ वाढले आहे. त्यामुळे एखाद्याने खून करावा मात्र प्रेत मिळू नये असे एवढ्या सफाईने या विमानाचा नायनाट केला असला जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या अत्याधुनिक काळात एखाद्या विमानाचा मार्ग क्षणोक्षणी टिपला जात असताना हे विमान रडारावरुन गायब झाल्यावर ऐवढा काळ त्याचा ठिवठिकाणा लागत नाही हे एक न उलगडणारे कोडे झाले आहे. बोईंग ७७७ या जातीची विमाने जगप्रसिध्द बोईंग कंपनीने ९०च्या दशकात बाजारात आणली. आजवर त्यांनी जगभरात ४०० ही विमान विकली आहेत आणि या विमानात कधीच दोष आढळलेला नाही. जगभरातील विमान कंपन्यांना ही विमाने उत्कृष्ट सेवा देत आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीतही ही विमाने नेहमीच उजवी ठरली आहेत. बिजींगला जाणारे हे विमान ८ मार्च रोजी १२.४० वाजता पहाटे उडाले आणि १.३० वाजेपर्यंत रडारच्या कक्षेत होते. मात्र मलेशिया सोडल्यावर हे विमान ३५ हजार फुटावरुन थायलंडच्या सीमेवर असतानाही या विमानात काही बिघाड झाल्याचा संदेश नव्हता. मात्र नंतर हे विमान व्हिएतनामच्या कक्षेत गेल्यानंतर राडरवरुन गायब झाले. त्यावेळी असा अंदाज व्यक्त झाला की, या विमानात स्फोट झाला असावा व हे विमान समुद्रात कोसळले. परंतु येथील समुद्रात कसून शोध घेऊनही या विमानाचे काही अवशेष सापडले नाहीत. एखाद्या अपघाग्रस्त विमानाचे अवशेष हे हलके असतात, त्यामुळे ते लगेचच काही समुद्राच्या तळाशी जात नाहीत. बराच काळ हे अवशेष पाण्यावर तरंगत असतात. बोईंग ७७७ या विमानात अत्यधिुनक यंत्रणा बसविलेली असते. परिणामी हे विमान संकटात सापडल्यास तातडीचा संदेश मिळू शकतो. एखादी यंत्रणा बिघडली तर पर्यायी यंत्रणा कार्यान्वित होते व हा संदेश पोहोचविला जातो. तत्यामुले या विमानातील सर्वच यंत्रणा एकाचवेळी निकामी कशा झाल्या असा सवाल आहे. याव्यतिरिक्त आणखी एक पध्दती विमानाचा प्रवास पहात असते. या सर्वच यंत्रणा एखाच वेळी निकामी होणे अश्यक्य असते. एखादी यंत्रणा बिघडली वा काम करेनाशी झाली तर त्याला पर्यायी व्यवस्था सुरु होते. अशा स्थितीत विमानाचा ताबा गेला तरी त्याचा छडा हा लागलाच पाहिजे अशी स्थिती असते. अगदी अतिरेक्यांनी या विमानावर कब्जा केला आणि ताब्यात घेतले तरी काही क्षणात ते समजू शकते. आता या विमानाचा शोध बंगालचा उपसागरात घेतला जात आहे. अशा प्रकारे एखादे विमान रडारवरुन गायब होणे व त्याचा आठ दिवसाहून जास्त काळ पत्ताच न लागणे हे एक मोठे गूढच ठरावे. याचा शओध केवळ मलेशियाच्या सरकारलाच नाही तर बोईंग विमान कंपनीला घ्यावा लागणार आहे. एवढी सुसज्ज यंत्रणा असलेल्या या विमानाचा छडा लावणे हे एक सध्याच्या आधुनिक काळातील एक मोठे आव्हान ठरावे.
------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel