-->
संपादकीय पान बुधवार दि. २५ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
आणखी एका म्युच्युअल फंडाची माघार
----------------------------
देशातील म्युच्युअल फंडाचे क्षेत्र खासगी उद्योगांना खुले झाल्यानंतर १९९४ साली स्थापन झालेल्या मॉर्गन स्टॅन्ली म्युच्युअल फंडाने आता देशातून आश्‍चर्यकारक माघात घेतली. हा म्युच्युअल फंड एच.डी.एफ.सी. फंंडाने विकत घेतला. मॉर्गन स्टॅन्लीची देशातील एकूण मालमत्ता सुमारे ३,३०० कोटी रुपये होती. या फंडाच्या असलेल्या एकूण आठ योजनांसह सर्व मालमत्ता एच.डी.एफ.सी. ने खरेदी केली आहे. परिणामी देशातील म्युच्युअल फंडात पहिल्या क्रमांकावर असलेल्या एच.डी.एफ.सी. ने आपली पहिल्या क्रमांकाची स्थिती अधिक मजबूत करुन या उद्योगावर पकड घट्ट केली आहे. गेल्या काही वर्षात प्रामुख्याने मंदीची स्थिती आल्यापासून शेअर बाजारातील परिस्थिती अस्थिर होऊ लागली आणि म्युच्युअल फंडांना वाईट दिवस आले. त्यामुळे अनेक फंडांनी देशातील बाजारपेठेतून पळ काढण्यास सुरुवात केली. यातून स्टेट बँक म्युच्युअल फंडाने दिवा म्युच्युअल फंड खरे दी केला. तर एल.अँड टी. फंडाने फेडिलिटी म्युच्युअल फंड, बिर्ला सन लाईफने अलियान्स म्युच्युअल फंड हे खरेदी केले. देशात आपल्याकडे १९९४ साली आर्थिक क्षेत्र खुले करण्यास सुरुवात झाल्यावर मॉर्गन म्युच्युअल फंड स्थापन करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या पहिल्याच योजनेस गुंतवणूकदारांनी जबरदस्त पाठिंभा दिला होता. परंतु हा फंड जागतिक पातळीवर मोठा असला तरीही त्यांनी भारतात आपला काही विस्तार केला नाही. याचा परिमाण असा झाला की त्याहूनही पाठून आलेल्या म्युच्युअल फंड कंपन्या त्यांच्या पुढे गेल्या. त्यांचे अस्तित्व म्युच्युअल फंड उद्योगात एक लहान फंड म्हणून निर्माण झाल्याने त्यांना भारतीय बाजारपेठेत तग धरणे कठीण जाऊ लागले. त्यामुळे मॉर्गन स्टॅन्ली म्युच्युअल फंडला आपले अस्तित्व अन्य कुठल्यातरी फंडात विलिन करुन संपविणे गरजेचे वाटू लागले होते. त्यापूर्वी फेडिलिटी या आणखी एका मोठ्या बहुराष्ट्रीय म्युच्युअल फंडाने भारतातून आपला काढता पाय घेतला होता. फेडिलिटीची खरेदी एल.अँड टी फंडाने केली होती. सध्या देशात ४४ म्युच्युअल फंड कार्यरत असून सुमारे नऊ लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांनी त्यांच्या विविध योजनांमध्ये गुंतविले आहेत. या योजनांमध्ये जसे लहान गुंतवणूकदार आहेत तसे मोठे व मध्यम आकारातील गुंतवणूकदारही आहेत. गेल्या तीन वर्षात शेअर बाजारात मंदीचे वारे वाहू लागल्यापासून लहान व मध्यम आकारातील म्युच्युअल फंडांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी झगडावे लागत आहे. कारण उत्पन्न कमी व खर्च जास्त झाल्याने त्यांच्यावर आर्थिक बोजा वाढला आहे. अशा स्थितीत जे मोठे फंड आहेत तेच तग धरु शकणार आहेत. मॉर्गन स्टॅन्ली ही बहुराष्ट्रीय कंपनी असली तरीही त्यांचे भारतातील अस्तित्व लहान आहे. त्यामुळे त्यांना भारतातील आपले व्यवहार गुंडाळण्याशिवाय काहीच पर्याय राहिला नाही. सध्या म्युच्युअल फंडांचे गुंतवणूकदार झपाट्याने कमी होत असताना एच.डी.एफ.सी.कडे हा फंड ताब्यात घेतल्याने सुमारे चार लाख गुंतवणूकदार आले आहेत. यामुळे त्यांना या उद्योगातील आपले स्थान बळकट करण्यासाठी मदत होणार आहे. आपल्याकडे म्युच्युअल फंड उद्योगात आता झपाट्याने बदल येऊ घातले आहेत. आपल्याकडे पूर्वी पूर्वी युनिट ट्रस्ट हा सरकारी फंडच होता. त्यानंतर हे क्षेत्र खुले केल्यावर सुरुवातील बँकांचा प्रवेश झाला. त्यानंतर विविध वित्तसंस्था व शेअर दलाल कंपन्या उतरल्या. आपल्याकडे अजूनही म्युच्युअल फंड उद्योग तळागाळातील लोकांपर्यंत पुरेसा पोहोचलेला नाही. लहान गुंतवणूकदारांसाठी एक गुंतवणुकीचे उत्तम साधन अशी याची प्रतिमा विकसीत झालेली नाही. हे करण्यासाठी म्युच्युअल फंडांनी लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.
--------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel