-->
संपादकीय पान मंगळवार दि. २४ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
कोलारमधील सोन्याचा खजिना खुला होणार?
--------------------------------
मध्यंतरी उत्तरप्रदेशात एका साधुच्या स्वप्नावर विश्‍वास ठेवून सोन्याचा खजिना शोधण्याचा मूर्ख प्रयत्न करण्यात आला होता. मात्र कोलार या आपल्याकडील एकमेव सोन्याची बंद खाण आता पुन्हा एकदा उत्खननाच्या तयारीत आहे. येथील उत्खनन सुरु झाल्यास सुमारे २०० टन सोने मिळेल असा अंदाज आहे. बंगलोरपासून सुमारे ११० कि.मी.अंतरावर असलेली १३३ वर्षांची जुनी कोलार सोन्याच्या खाणीत आजच्या घडीला सुमारे २०० टन सोने आहे. सध्याच्या किंमतीनुसार त्याची किंमत सुमारे ६०,००० कोटी रुपये भरते. भारत गोल्ड माईन्स लि. या सरकारी कंपनीच्या मालकीची असलेली ही खाण २००१ साली बंद करण्यात आली. येथून उत्खनन करुन सोने विकणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने ही खाण बंद करण्यात आली. खाण बंद झाल्याने सुमारे तीन हजार लोकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या. परंतु आता पुन्हा एकदा ही खाण उत्खनन करण्यास सज्ज होत आहे. या वर्षी जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या खाणीच्या उत्खननासाठी आन्तरराष्ट्रीय पातळीवर निविदा मागविण्यास परवानगी दिली. आता याची निविदा प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन या देशातील कंपन्या यासाठी इच्छुक आहेत. फेब्रुवारीत या निविदा उघडल्या जाऊन एप्रिलमध्ये प्रत्यक्ष उत्खननास प्रारंभ होईल. ही खाण बंद झाल्यावर येथील एका कामगाराने ही खाण पुन्हा सुरु होण्यासाठी जवळपास १२ वर्षे कायदेशीर लढाई केली आणि त्याच्या प्रयत्नांना यश आले. ऐवढे काळ ही खाण बंद असल्याने येथील सर्व गजबज तसेच एकूण आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. १८८० साली या खाणीचा शोध लागला आणि उत्खननास प्रारंभ झाला. ब्रिटीश काळात जॉन टेलर अँड कंपनीने याचा उत्खनन करण्याचा परवाना सुरुवातीपासून मिळविला आणि ही खाण बंद होईपर्यंत सुमारे ८०० टन सोने येथून मिळाले होते.   १२५०० एकर एवढ्या अवाढव्य भागावर पसरलेल्या या खाणीचे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण करुन भारत गोल्ड माईन्स लि. ही कंपनी स्थापण्यात आली. सध्या इकडे उत्खनन होत नसले तरीही सपरक्षा व्यवस्ता कडक ठेवण्यात आलेली आहे. येथील बर्‍याच लोकांचा सुरक्षा रक्षक हाच एक रोजगार झाला आहे. पूर्वी ब्रिटीशांच्या काळात ही खाण जोरात सुरु असताना येते मोठी हलचल असायची. कंपनीच्या आवारातच अधिकार्‍यांचे बंगले होते. तसेच परिसरात मोठी-मोठी झाडे लावलेली असल्याने येथील सौंदर्य जपण्यात आले होते. मात्र नंतर ही खाण बंद होण्याच्या मार्गावर असताना हळूहळू याची दुर्दशा सुरु झाली. अजूनही इथे सुमारे २०० टन सोने असल्यामुळे अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना उत्खननात रस आहे. त्यामुळे ही कंपनी पुन्हा एकदा जोमाने सुरु होऊ शकते. त्यामुळे येथे रोजगारही उपलब्ध होईल तसेच सरकारच्या तिजोरीत महसूलही जमा होईल. आपल्याकडे देशातली ही एकमेव सोन्याची खाण होती. अन्य काही ठिकाणी फुटकळ स्वरुपात सोन्याच्या खाणी होत्या. आपल्याकडे गेल्या वर्षी सुमारे एक हजार टन सोने खरेदी केली. यातील बहुतांशी सोने हे आयात करावे लागले होते. ही खाण सुरु झाल्यावर तेवढी सोन्याची आयातही कमी होईल व आपम अमूल्य असे विदेशी चलन वाचवू शकतो.
-----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel