-->
डॉ. सत्यपाल सिंह  पोलिसातले एक अजब 'रसायन'

डॉ. सत्यपाल सिंह पोलिसातले एक अजब 'रसायन'


Published on 01 Sep-2012 Pratima
प्रसाद केरकर 
रसायनशास्त्रात एम. एस्सी. केल्यावर या विषयात संशोधन करावे असे त्यांना सतत वाटत होते. त्यांचा मूळ पिंडही संशोधकाचाच होता. परंतु वडिलांच्या आग्रहामुळे त्यांचे पाय आयपीएसकडे वळले.. कोणालाही पटणार नाही, परंतु अलीकडेच मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्त झालेले डॉ. सत्यपाल सिंह यांच्या आयुष्याच्या करिअरचा हा आलेख आहे. रसायनशास्त्रात एम. एस्सी. करताना त्यांची धातू आणि मूलद्रव्ये यांच्याशी चांगलीच गट्टी जमली होती. पुढे चालून आपल्याला संशोधक व्हायचे आहे, याची पक्की खूणगाठ त्यांनी बांधली होती.
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे जन्मलेल्या सत्यपाल सिंह यांना आपण कधी पोलिस अधिकारी हऊ असे स्वप्नातही वाटले नव्हते किंवा त्यांनी तशी कधी मनीषाही बाळगली नव्हती. रसायनशास्त्रात एम. फिल. केल्यावर त्यांनी ऑस्ट्रेलियात जाऊन एम.बी.ए. केले. संशोधक होण्यासाठी एखादी चांगली नोकरी शोधत असताना त्यांना वडिलांनी आयपीएस होण्याची गळ घातली. किंबहुना त्यांनी आदेशच दिला. शेवटी वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणवत्तेने ते यात पास झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उत्तर प्रदेशाऐवजी महाराष्ट्र केडर स्वीकारले आणि त्यांना ते मिळालेदेखील. त्यानंतर त्यांचे पहिले पोस्टिंग नाशिकला झाले. महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी सर्वात पहिली बाब केली ती म्हणजे मराठी शिकले. मराठी वाचावयास व लिहावयास ते शिकले. नाशिकनंतर त्यांची बदली बुलडाण्याला झाली. त्यानंतर त्यांची बदली राज्याच्या विविध कोपर्‍यांत झाली आणि त्यांनी आपल्या स्वच्छ कारभारातून आपली एक कार्यक्षम, दक्ष अधिकारी म्हणून प्रतिमा निर्माण केली.
नक्षलवाद्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांनी प्रबंध लिहिला. त्यावर त्यांना डॉक्टरेट मिळाली. पोलिस दलातील एक सुसंस्कृत व आध्यात्मिक विचारांचे आणि वेळ पडल्यास कर्तव्यकठोर असे अधिकारी म्हणून त्यांचा सर्वांना परिचय झाला. पुण्याचे पोलिस आयुक्त झाल्यावर त्यांची नियुक्ती लवकरच मुंबईच्या आयुक्तपदी होईल अशी अनेकांची अटकळ होती. मात्र त्यासाठी त्यांना तब्बल दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागली. सत्यपाल सिंह यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माणसांचा अभ्यास करण्याची त्यांची असलेली आवड. यातून ते आपल्याविषयी बोलताना नेहमी गमतीने म्हणतात, माणसांच्या स्वभावाच्या अभ्यासाची सवय असल्याने मी एक मानसोपचारतज्ज्ञही होऊ शकतो. अध्यात्म आणि योगाभ्यास याची त्यांना लहानपणापासून आवड होती. तसेच फावल्या वेळेत लिखाण करण्याची सवय त्यांनी चांगलीच जोपासली आहे. पोलिस दलात असे गुण असलेला अधिकारी विरळाच. मुंबई महानगरात मध्यंतरी ते वांद्रे परिमंडळाचे उपायुक्त म्हणून आले आणि त्यांनी झपाट्याने आपल्या कामाचा ठसा उमटवला. मुंबईत त्या वेळी दाऊद, छोटा शकील, छोटा राजन, गुरू साटम या टोळ्यांचे वर्चस्व होते. त्यावर या टोळ्यांच्या प्रमुखांना धडा शिकवण्यासाठी विशेष पथक स्थापन करून गुंडांचे एन्काउंटर सुरू केले. त्या वेळी त्यांनी पथकाच्या माध्यमातून छोटा शकील टोळीच्या शंभरपेक्षा जास्त गुंडांना कंठस्नान घातले होते. आपली प्रतिमा एक बुद्धिजीवी असावी असे त्यांना नेहमी वाटत आले. आपली ही प्रतिमा जपण्याचा त्यांनी वारंवार प्रयत्नही केला. मात्र वेळ पडेल त्या वेळी वज्राहूनही कठोर होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. मुंबईचे पोलिस आयुक्तपद त्यांना एका महत्त्वाच्या वेळी त्यांच्याकडे चालून आले आहे. आज पोलिस दलापुढे असलेली आव्हाने, पोलिसांची जनतेत मलिन झालेली प्रतिमा तसेच त्यांचे मनोबल उंचावण्याची आवश्यकता ही आव्हाने त्यांच्यापुढे आहेत आणि याचा मुकाबला करण्याचे 'रसायन' त्यांच्याकडे आहे, यात काहीच शंका नाही.
प्रसाद केरकर
रसायनशास्त्रात एम. एस्सी. केल्यावर या विषयात संशोधन करावे असे त्यांना सतत वाटत होते. त्यांचा मूळ पिंडही संशोधकाचाच होता. परंतु वडिलांच्या आग्रहामुळे त्यांचे पाय आयपीएसकडे वळले.. कोणालाही पटणार नाही, परंतु अलीकडेच मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्त झालेले डॉ. सत्यपाल सिंह यांच्या आयुष्याच्या करिअरचा हा आलेख आहे. रसायनशास्त्रात एम. एस्सी. करताना त्यांची धातू आणि मूलद्रव्ये यांच्याशी चांगलीच गट्टी जमली होती. पुढे चालून आपल्याला संशोधक व्हायचे आहे, याची पक्की खूणगाठ त्यांनी बांधली होती.
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे जन्मलेल्या सत्यपाल सिंह यांना आपण कधी पोलिस अधिकारी होऊ असे स्वप्नातही वाटले नव्हते किंवा त्यांनी तशी कधी मनीषाही बाळगली नव्हती. रसायनशास्त्रात एम. फिल. केल्यावर त्यांनी ऑस्ट्रेलियात जाऊन एम.बी.ए. केले. संशोधक होण्यासाठी एखादी चांगली नोकरी शोधत असताना त्यांना वडिलांनी आयपीएस होण्याची गळ घातली. किंबहुना त्यांनी आदेशच दिला. शेवटी वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणवत्तेने ते यात पास झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उत्तर प्रदेशाऐवजी महाराष्ट्र केडर स्वीकारले आणि त्यांना ते मिळालेदेखील. त्यानंतर त्यांचे पहिले पोस्टिंग नाशिकला झाले. महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी सर्वात पहिली बाब केली ती म्हणजे मराठी शिकले. मराठी वाचावयास व लिहावयास ते शिकले. नाशिकनंतर त्यांची बदली बुलडाण्याला झाली. त्यानंतर त्यांची बदली राज्याच्या विविध कोपर्‍यांत झाली आणि त्यांनी आपल्या स्वच्छ कारभारातून आपली एक कार्यक्षम, दक्ष अधिकारी म्हणून प्रतिमा निर्माण के                             

0 Response to "डॉ. सत्यपाल सिंह पोलिसातले एक अजब 'रसायन' "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel