-->
साहेबांची मुलाखतीव्दारे भविष्यातील पेरणी...

साहेबांची मुलाखतीव्दारे भविष्यातील पेरणी...

रविवार दि. 25 फेब्रुवारी 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
साहेबांची मुलाखतीव्दारे भविष्यातील पेरणी...
------------------------------------------
एन्ट्रो- डाव्या पक्षांपासून सर्व सेक्युलर विरोधी पक्षांना एक आणण्याचे काम शरद पवारांसाठी काही अवघड नाही. विरोधकांनाही त्यांच्यासारखा चेहरा पाहिजेच आहे. कॉग्रेसही त्यांच्या नावाला पाठिंबा देऊ शकेल, कारण सध्या भाजपाविरोधी वातावरण असले तरीही कॉग्रेसला शंभर टक्के पोषक असे अजिबात नाही. सध्या कॉग्रेसला स्वबळावर सत्ता खेचून आणणे अजून किमान पाच वर्षेतरी शक्य नाही. अशा वेळी शरद पवारांसारखा सर्वसमावेशक व सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकणारा नेता भाजपाला पर्याय ठरु शकतो. त्यातूनच पवारांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पवारांनी नेहरु-इंदिरा गांधी-बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करण्याचे कारणही यात दडलेले आहे. नेहरु-इंदिराजींची स्तुती केल्याने कॉग्रेस पक्ष व जुने जाणते कॉग्रेसजन पवारांच्या बाजूने उभे राहू शकतात. त्याचबरोबर बाळासाहेबांची स्तुती केल्याने शिवसेना व मराठी माणसाचा एक सॉफ्ट कॉनर मिळू शकतो. त्यातून शिवसेनेने मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर त्याला पाठिंबा देण्याची उघड भूमिका यापूर्वीच घेतली आहे. शरदरावांसाठी देखील पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्यासाठीचा हा शेवटचा प्रयत्न असेल...
--------------------------------------------
संसदीय राजकारणात गेली 50 वर्षे सातत्याने अग्रभागी असलेले महाराष्ट्रातील एक अग्रगण्य नेते शरद पवार यांची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत नेमकी सध्याच कशासाठी घेतली, असा पहिला प्रश्‍न उपस्थित होतो. शरद पवार हे धुर्त व जाणकार राजकीय नेते (राजकारणात हे गुण आवश्यकच) आहेत, पूर्णवेळ राजकारण करणार्‍या नेत्यांमध्ये त्यांची गणणा होते. मुलाखत घेण्याचा टायमिंग, मुलाखतकार म्हणून राज ठाकरेच का, असे असे अनेक प्रश्‍न ही मुलाखत घेण्याचे जाहीर झाल्यापासून चर्चेत होते. आता ही मुलाखत संपल्यावर या सर्व प्रश्‍नांची उत्तरे गवसली आहेत. या मुलाखतीकडे संपूर्ण महाराष्ट्र डोळे लावून होता, त्याचे कारणही तसेच होते. या मुलाखतीचा गोषवारा सांगावयाचा झाल्यास यातून पवारांनी आपल्या भविष्यातील राजकारणाची दिशा नक्की केली आहे. ही दिशा या अथार्र्ने की, भाजपाबरोबर जायचे की कॉग्रेससोबत रहायचे. म्हणजेच, सेक्युलर पक्षांची साथ चालू ठेवायची किंवा नाही, हा त्यांच्या राजकारणाचा मूळ मुद्दा होता. परंतु पवारांनी कॉग्रेससोबतच जाणार म्हणजेच भाजपा वा मोदींसोबत जाणार नाही, हे या मुलाखतीतून स्पष्ट केले. निवडणूक आता जेमतेम सव्वा वर्षावर येऊन ठेपली असताना पवारसाहेबांनी ही दिशा ठरवून आपल्या भविष्याच्या राजकारणाची बैठक पक्की केली आहे. आता कदाचित यात दोन अंदाज बांधले जात आहेत, त्यातील पहिला अंदाज म्हणजे साहेब कॉग्रेसमध्ये परतून पंतप्रदानपदाचे उमेदवार म्हणून आपले नाव निश्‍चित करुन घेतील व दुसरा अंदाज म्हणजे, सध्याच्या भाजपा सरकारच्या विरोधात सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधण्याचा ते प्रयत्न करतील व त्याचे नेतृत्व आपल्याकडे ठेवतील. म्हणजेच विरोधकांचे ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. अर्थात यातील दुसर्‍या अंदाजाची शक्यता जास्त वाटते. डाव्या पक्षांपासून सर्व सेक्युलर विरोधी पक्षांना एक आणण्याचे काम पवारांसाठी काही अवघड नाही. विरोधकांनाही त्यांच्यासारखा चेहरा पाहिजेच आहे. कॉग्रेसही त्यांच्या नावाला पाठिंबा देऊ शकेल, कारण सध्या भाजपाविरोधी वातावरण असले तरीही कॉग्रेसला पोषक असे अजिबात नाही. सध्या कॉग्रेसला स्वबळावर सत्ता खेचून आणणे अजून किमान पाच वर्षेतरी शक्य नाही. अशा वेळी शरद पवारांसारखा सर्वसमावेशक व सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकणारा नेता भाजपाला पर्याय ठरु शकतो. त्यातूनच पवारांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पवारांनी नेहरु-इंदिरा गांधी-बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करण्याचे कारणही यात दडलेले आहे. नेहरु-इंदिराजींची स्तुती केल्याने कॉग्रेस पक्ष व जुने जाणते कॉग्रेसजन पवारांच्या बाजूने उभे राहू शकतात. त्याचबरोबर बाळासाहेबांची स्तुती केल्याने शिवसेना व मराठी माणसाचा एक सॉफ्ट कॉनर मिळू शकतो. त्यातून शिवसेनेने मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर त्याला पाठिंबा देण्याची उघड भूमिका यापूर्वीच घेतली आहे. शरदरावांसाठी देखील पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्यासाठीचा हा शेवटचा प्रयत्न असेल. कारण आता त्यांचे वय 75 असल्याने व कॉन्सरसारख्या दुर्धर रोगाविरोधात यशस्वी दिल्यावर आता त्यांची प्रकृती तरुणाला लाजवेल अशी उत्तम आहे. त्यामुळे पवारसाहेबांसाठी ही शेवटची संधी ठरणार आहे. शरदरावांचे व्यक्तीमत्वही तसेच आहे. त्यांची सर्व पक्षात चांगलीच उठबस आहे, त्यांना मानणारा वर्ग प्रत्येक क्षेत्रात आहे, भाजपा विरोधात ते विरोधकांची चांगली मोट बांधू शकतात. देशातील आघाडीच्या उद्योगपतींची साथ त्यांना मिळू शकते, शरद पवारांचे धोरण हे आर्थिक उदारपणाचे आहे व त्यात सध्याच्या स्थितीत चूक असे काहीच नाही, त्यामुळे उद्योगपती त्यांच्यामागे सर्व ताकद उभी करु शकतात. त्यांनी शिवाजी महाराज, शाहू, फुले, डॉ. आंबेडकरांचे राजकारण नेमके काय हे मोजक्या शब्दात या जनतेला सांगितले. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यांचा आदर्श महाराष्ट्राला एकत्र आणणारा आहे. त्यांचेच वैचारिक वारसदार शाहु, फुले आणि आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्राला एकत्रितपणे पुढे घेऊन जाणारा ठरला आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी महाराष्ट्र राज्याचे वेगळेपण अधोरेखित केले. छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण लागू करून वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कायम समता आणि समानतेचा पुरस्कार केला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने देशाला कायद्याचे राज्य बनवले. म्हणून शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राला एकत्र ठेवून पुढे नेणारा आहे. आणि शिवाजी महाराज हा त्या विचाराचा आदर्श आहे, असे शरद पवार म्हणाले. यातून त्यांनी आपल्या धोरण देखील सांगून टाकले. सामाजिक ऐक्य आणि जातीय द्वेष ही चिंतेची बाब असल्याचे सांगून पवारांनी, समाजातल्या वाढत्या विद्वेषास सध्याचे भाजप सरकारच असल्याचे त्यंनी सांगितले. जातिभेद वाढीला सत्तेतील काही घटकांची फूस आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला. राज्यात जातीआधारित संघटना सक्रिय झाल्या असून, त्याला सत्तेवरील काही घटकांचे प्रोत्साहन मिळत आहे. त्यातून आपले राजकारण यशस्वी होईल, ही भावना वाढीस लागली आहे. पण महाराष्ट्र या विद्वेषी विचारांनी नव्हे तर शाहू-फुले-आंबेडकरांच्या मार्गानेच पुढे जाईल, असा विश्‍वास पवारांनी व्यक्त केला. आपल्या राजकारणाचा पाया धर्मनिरपेक्षतेवर टिकून आहे. असे सांगताना त्यांनी सत्ताधारी भाजप विरोधात धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले पाहिजेत. त्यासाठी गरज पडली तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक आरक्षणाचा मुद्दा त्यांनी मांडताना सध्याचे आरक्षण रद्द करावे असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे घटनेच्या चौकटीत आर्थिक आरक्षणाचा मुद्दा मांडला आहे. एकूणच या मुलाखतीतून शरद पवारांनी आपल्या भविष्यातील राजकारणाची पेरणी केली आहे. आज विरोधी पक्षांमध्ये जी नेतृत्वाची पोकळी आहे, ती भरुन काढण्यास पवारसाहेब हे योग्य उमेदवार ठरावेत.
----------------------------------------------------

0 Response to "साहेबांची मुलाखतीव्दारे भविष्यातील पेरणी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel