-->
बिल गेटस् यांची खंत

बिल गेटस् यांची खंत

संपादकीय पान बुधवार दि. 22 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
बिल गेटस् यांची खंत
माणसांची जागा मशीन्सने घेतली, पण या मशीन्स हाताळायला माणसं असायची पण आता ती जागा जाऊन त्या ठिकाणी रोबोट आले. आज जगभरातील अशा कित्येक कंपन्या आहेत जिथे काम करण्यासाठी यंत्रमानव म्हणजेच रोबोटचा वापर केला जातो. चीन तर रोजची कामं करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात रोबोटची निर्मिर्ती करत आहे. या रोबोटमुळे काम जरी हलंक झालं असलं तरी माणसं मात्र बेरोजगार झाली आहेत. तेव्हा रोबोटचा वापर करणार्‍या कंपन्यांकडून कर आकारला जावा असा सल्ला मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे. कंपनीत एखादे काम करण्यासाठी जर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली तर त्याच्या पगारावर कर आकारला जातो. मग तेच काम जर रोबोट करत असले तर त्यावरही कर आकारला जावा असे मत बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत मांडले आहे. या करातून येणारा पैसा वुद्ध आणि लहान मुलांच्या कल्याणासाठी वापरावा असेही ते म्हणाले. जगातील फक्त श्रीमंतच नाही तर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही बिल यांचे नाव आदराने घेतले जाते. ऑक्सफेमने केलेल्या एका अहवालानुसार जगात फक्त आठ व्यक्ती अशा आहेत ज्यांकडे जगातील सर्वाधिक संपत्ती एकवटली आहे. या यादीत बिल गेट्स हे पहिल्या क्रमांकावर होते. बिल गेट्स यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की कोणत्याही मोठ मोठ्या कंपन्या आणि अविकसनशील देशही ते सहज विकत घेऊ शकतात. मात्र गेटस् यांना रोबोटसमुळे बेकारीची खंत जाणवत आहे, ती महत्वाची म्हटली पाहिजे.
----------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "बिल गेटस् यांची खंत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel