शहरी मतदारांचा कौल
रविवार दि. 27 नोव्हेंबर 2016 च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
शहरी मतदारांचा कौल
--------------------------------------
रायगड व रत्नागिरी या कोकणातील झपाट्याने औद्योगिकीकरण होणार्या जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी आज रविवारी मतदान होत आहे. यातील रायगड जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये दोन लाख मतदार आपला हक्क बजावतील. या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी, कॉग्रेस, शिवसेना, भाजपा यांची आता कसोटी लागणार आहे. भाजपा जिल्ह्यात पहिल्यांदाच जोरदारपणे उतरत आहे, त्यांच्यामागे किती जनता आहे ते समजेलच. आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची एक प्रकारे रंगीत तालीमच सध्या होणार आहे. फरक फक्त एवढाच आहे की, आजच्या मतदानात शहरातील मतदार आपला कौल देईल तर जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण ग्रामीण भागातील जनतेचा कौल समजेल...
----------------------------------------------
रायगड व रत्नागिरी या कोकणातील झपाट्याने औद्योगिकीकरण होणार्या जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी आज रविवारी मतदान होत आहे. यातील रायगड जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये दोन लाख मतदार आपला हक्क बजावतील. या दोन्ही जिल्ह्यात मध्यम व लहान आकाराचीच शहरे आहेत व गेल्या वीस वर्षात झपाट्याने विकसीत झाली आहेत. याला अपवाद तो पनवेलच्या महानगरपालिकेचा. हे शहर आता महानगरपालिकेत रुपांतरीत झाले आहे. मुंबई-ठाण्यापासून जवळ असल्याने पनवेल हे रायगड जिल्ह्यात असले तरीही झपाट्याने विस्तारले. पनवेल हे मुंबईचे उपनगर असल्यासारखेच गेल्या पाच वर्षात कधी झाले याचा पत्ता कुणालाच लागला नाही. या शहराच्या समस्या मात्र झपाट्याने वाढत गेल्या. असो, या दोन्ही जिल्ह्यात लहान व मध्यम आकारातील शहरे विकसीत झाली, यातील बहुतांशी शहरे ही औद्योगिक वसाहती त्याच्या परिसरात स्थापन झाल्याने एकेकाळी गावांसारखी असलेली ही शहरे झाली. अनेकांच्या नागरी समस्या आजही कायम आहेत. अलिबाग हे जेमतेम 500 एकरावर वसलेले जिल्ह्याचे मुख्यालय असलेले एक महत्वाचे शहर. अलिबागपेक्षा त्याच्या परिसरातील ग्रामपंचायती लोकसंख्येचा विचार करता मोठ्या असतील, परंतु अलिबागने आपली एक नागरी व ग्रामीण संस्कृती जपली आहे. गेल्या तीन दशकाहून जास्त काळ शेतकरी कामगार पक्षाने आपली या शहरावर पक्कड कायम ठेवली आहे. विरोधक कितीही आघाड्या करुन व बाह्या सरसावून पुढे आले तरी त्यांची काही डाळ शिजलेली नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे शेकापने या परिसराचा मर्यादीत निधी उपलब्ध असतानाही चांगला विकास करुन दाखविला आहे. रस्त्याने वा समुद्रमार्गाने हे मुंबईसारख्या मोठ्या महानगराशी जवळ असले तरीही आपली एक स्वतंत्र संस्कृती जपली आहे. अर्थातच या शेकापचा महत्वाचा वाटा आहे. यावेळी देखील शेकापला इथे विरोधक नाहीतच. जे कुणी आहेत ते विरोधासाठी विरोध करणारे आहेत. जिल्ह्यावर शेकाप व राष्ट्रवादी कॉग्रेसची पकड आहे व ती यावेळच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसेल, यात काहीच शंका नाही. यावेळी अलिबागची ही निवडणूक एकतर्फी शेकापच्या बाजूने होईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. जिल्ह्यातील खरी चुरस व ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ते रोह्याच्या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे. रोह्यात राष्ट्रवादीत असलेली बंडखोरी व काका-पुतण्यांचे भांडण यात राष्ट्रवादी कामाच्या जोरावर येथे बाजू मारु शकते. कारण रोह्याचा विकास व कायापालट हा राष्ट्रवादी व सुनिल तटकरे यांनी केला आहे. त्याची दाद मतदार देतील अशी अपेक्षा आहे. पेण या कॉग्रेसची सत्ता असलेल्या त्यांच्या बालेकिल्यात यावेळी शेकाप-भाजपा-राष्ट्रवादी अशी नगर विकास आघाडी स्थापन करुन कॉग्रेसच्या नाकी नऊ आणले आहेत. शिवसेनेची इकडे एकला चालो रे ही भूमिका आहे. परंतु या बहुरंगी लढतीत शेवटच्या टप्प्यात नगर विकास आघाडीचा जोरात आल्याचे चित्र आहे. खोपोली या शहरातही चौरंगी लढती लढल्या गेल्या असल्या तरी अंतिम विजेते हे शेकाप-राष्ट्रवादी ठरतील असा विश्वास खोपोलीकरांना वाटतो. उरण मध्ये देखील शेकाप-राष्ट्रवादी-काँग्रेस-मनसे ही आघाडी आपले वर्चस्व स्थापन करेल असे दिसते. उरणचे अनेक प्रश्न आहेत. हे शहर गेल्या दशकात झपाट्याने वाढले. प्रामुख्याने जे.एन.पी.टी. बंदर आल्यावर येथील विकास जोमात झाला. परंतु येथील नागरी सुविधांपासून जनता वंजित आहे. उरण बायपासचा प्रश्न, बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यावरील रहदारी हे प्रश्न आता सत्तेत येणार्यांना सोडवावे लागतील. चवदार तळ्यासारखी ऐतिहासिक वास्तू असलेल्या महाड शहरात प्रामुख्याने तिरंगी लढत असली तरीही यात काँग्रेसचे पारडे जड राहिल असे दिसते. महाडने आजवर अनेकवेळा कॉग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी कॉग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप या नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत व त्यांचे पारडे सध्यातरी जड दिसते आहे. माथेरान या पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लहानशा शहरात अनेक समस्या आहेत. येथील सर्वच राजकीय पक्ष विकासाचा मुद्दा, विविध समस्या मांडून प्रचाराची राळ उडवित होते. तेथे तिरंगी लढत असली तरीही विजयी होणार्या कोणत्याही पक्षास येथील धुळीचे रस्ते, घोड्यांसाठी तबेल्याची सोय, हॉटेल व्यवसायिकांच्या अनेक समस्या, मिनी ट्रेन, मिनी बस, पर्यटनाच्या सुविधा, बॅटरी रिक्शा, स्थानिकांना रोजगार या समस्या सोडवाव्या लागणार आहेत. या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी, कॉग्रेस, शिवसेना, भाजपा यांची आता कसोटी लागली आहे. भाजपा जिल्ह्यात पहिल्यांदाच जोरदारपणे उतरत आहे, त्यांच्यामागे किती जनता आहे ते समजेलच. तर रत्नागिरी जिल्ह्यात सहा नगरपालिकातील मतदार आपला कौल देतील. रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, राजापूर, गुहागर या शहरांपैकी रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण व जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर. येथे शिवसेना आपली सत्ता टिकविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. तर रत्नागिरीचे पुणे म्हणूण ओळखले गेलेल्य चिपळूणात राष्ट्रवादीचे रमेश कदम यांना आता एकाकी लढत द्यावी लागणार आहे. कारण राष्ट्रवादीचे साथीदार असलेले भास्कर जाधव सध्या शिवसेनेबरोबर घरोबा करुन आहेत. खेडची सत्ता गेल्या वेळी मनसेकडे दिली होती. परंतु खेडचा कायापालट काही गेल्या पाच वर्षात झाला नाही. आता जनता यावेळी काय करते ते पहायचे. दापोली, राजापूर, गुहागर येथे अनुक्रमे शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी यांना आपापली सत्ता टिकविण्यासठी झगडावे लागणार आहे. आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची एक प्रकारे रंगीत तालीमच सध्या होणार आहे. फरक फक्त एवढाच आहे की, आजच्या मतदानात शहरातील मतदार आपला कौल देईल तर जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण ग्रामीण भागातील जनतेचा कौल समजेल.
-------------------------------------------------------------

0 Response to "शहरी मतदारांचा कौल"
टिप्पणी पोस्ट करा