-->
करभरण्यात घट

करभरण्यात घट

संपादकीय पान बुधवार दि. 21 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
करभरण्यात घट
नोटाबंदीचे दीर्घकालीन परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर उमटणार आहेत. हे आता विविध बाबींवरुन स्पष्ट होऊ लागले आहे. उद्योगक्षेत्रावर नोटाबंदीचे परिणाम हे आता दिसू लागण्यास सुरुवात झाली आहे. देशातील कंपन्यांनी निदान त्याचे संकेत दिले आहेत. कंपन्यंनी अग्रिम करभरणा करण्याच्या तिसर्‍या तिमाहीतील 15 डिसेंबर या मुदतीपर्यंत भरलेला कर हा गेल्या वर्षीचा विचार करता घटला आहे. कर निर्धारण वर्ष 2015-16 मधील जमा झालेल्या रकमांच्या तुलनेत किमान 16 बडया कंपन्यांच्या अग्रिम कराच्या रकमेत लक्षणीय घट झाली आहे. केंद्र सरकारच्या तिजोरीत कंपन्या, उद्योग समूहामार्फत जमा होणार्‍या अग्रिम कर संकलनात देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा सिंहाचा वाटा आहे. आघाडीच्या बँकांचे अग्रिम कराचे प्रमाण यंदा लक्षणीय रोडावले असून अनेक खासगी कंपन्यांनीही यंदाच्या तिमाहीत ऑक्टोबर ते डिसेंबर 2015 च्या तुलनेत कमी कर भरला आहे. कमी कर म्हणजे कंपन्यांच्या आर्थिक महसूल आणि नफ्याबाबत चिंता व्यक्त करण्यासारखी स्थिती असल्याचे मानले जाते. मुंबईस्थित 43 बडया कंपन्यांनी डिसेंबरअखेरच्या तिमाहीकरिता 27,321 कोटी रुपयांचा अग्रिम कराचा भरणा केला असून वार्षिक तुलनेत त्यात अवघी  10 टक्के वाढ नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी अग्रिम कराची 15 डिसेंबरअखेर रक्कम 24,811 कोटी रुपये होती. करभरणा घसरलेल्या कंपन्यांमध्ये ग्राहकोपयोगी उत्पादनांतील सर्वात मोठी कंपनी हिदुस्तान युनिलिव्हरचा समावेश असून, रोकडचणचणीमुळे घसरलेल्या एकंदर मागणीची कंपनीच्या विक्रीला बसला आहे. मागील वर्षांतील 620 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा 10 टक्के कमी 560 कोटी रुपयांचा करभरणा कंपनीने केला आहे. स्टेट बँकेने 25% कमी, आयसीआयसीआय बँकेने 1,200 कोटी रुपये 27.3% कमी, एलआयसीने 2,235 कोटी रुपये 13% जादा, एचडीएफसी बँकेने 2,300 कोटी रुपये 16.75% जादा व एचडीएफसी लिमिटेडने 920 कोटी रुपये अग्रिम कर भरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा कर 10 टक्क्यांनी तर येस बँकेचा कर 44 टक्क्यांनी वाढला आहे. देशातील सर्वात मोठी आय.टी. कंपनी टीसीएसचा अग्रिम कर वर्षभरापूर्वीच्या 1,600 कोटींवरून यंदा 1,540 कोटी रुपये झाला आहे. टाटा स्टीलचा कर 11.11 टक्क्यांंनी घर भरणा घसरला आहे. कंपनीने यंदा 400 कोटींचा अग्रिम कर भरणा केला आहे. करातील ही घट पाहता मंदीत आणखी वाईट दिवस नोटाबंदीमुळे आले आहेत, हेच स्पष्ट झाले आहे.
---------------------------------------------------

0 Response to "करभरण्यात घट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel