-->
कहाणी भारतीय जेम्स बॉँडची!

कहाणी भारतीय जेम्स बॉँडची!

रविवार दि. ०९ ऑक्टोबर २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
कहाणी भारतीय जेम्स बॉँडची!
------------------------------------------
एन्ट्रो- भारतीय पोलिस सेवेत एकेकाळी असलेल्या डाओल यांनी आजवर केवळ सर्जिकल स्ट्राईकच नव्हे तर अनेक जोखमीची कामे पार पाडली आहेत. त्यामुळेच त्यांना भारतीय जेम्स बॉँड असे संबोधिले जाते. सर्जिकल स्ट्राईकच्या आखणीत त्यांचा महत्वाचा वाटा असल्याने त्यांचे नाव हे अलिकडे प्रकर्षाने पुढे आले. मात्र आजवर त्यांनी नेहमीच प्रकाश झोतात येणे टाळले आहे. त्यांनी आजवर अनेक जबाबदारी कामे सहजरित्या पेलली आहेत. अगदी जेम्स बॉँडच्या चित्रपटात शोभेल अशा थाटात त्यांनी अनेकदा अतिरेक्यांच्या अड्यांत जाऊन महत्वाची माहिती मिळविली आहे. त्यांच्या आजवरच्या विविध कार्याचा आढावा घेणे महत्वाचे ठरेल. सध्याच्या उत्तराखंडात असलेल्या व त्यावेळच्या संयुक्त प्रांतात असलेल्या एका गावात १९४५ साली त्यांचा जन्म झाला. अजमेेरच्या लष्करी विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण घेतले, त्यानंतर आग्रा विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. १९६७ साली ते विद्यापीठात पहिले आले होते. भारतीय पोलिस सेवेत ते केरळ कॅडरमध्ये सामिल झाले...
----------------------------------------
नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या मागे राहून त्याची सर्व आखणी करणारे अधिकारी होते अजित डाओल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. भारतीय पोलिस सेवेत एकेकाळी असलेल्या डाओल यांनी आजवर केवळ सर्जिकल स्ट्राईकच नव्हे तर अनेक जोखमीची कामे पार पाडली आहेत. त्यामुळेच त्यांना भारतीय जेम्स बॉँड असे संबोधिले जाते. सर्जिकल स्ट्राईकच्या आखणीत त्यांचा महत्वाचा वाटा असल्याने त्यांचे नाव हे अलिकडे प्रकर्षाने पुढे आले. मात्र आजवर त्यांनी नेहमीच प्रकाश झोतात येणे टाळले आहे. त्यांनी आजवर अनेक जबाबदारी कामे सहजरित्या पेलली आहेत. अगदी जेम्स बॉँडच्या चित्रपटात शोभेल अशा थाटात त्यांनी अनेकदा अतिरेक्यांच्या अड्यांत जाऊन महत्वाची माहिती मिळविली आहे. त्यांच्या आजवरच्या विविध कार्याचा आढावा घेणे महत्वाचे ठरेल. सध्याच्या उत्तराखंडात असलेल्या व त्यावेळच्या संयुक्त प्रांतात असलेल्या एका गावात १९४५ साली त्यांचा जन्म झाला. अजमेेरच्या लष्करी विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण घेतले, त्यानंतर आग्रा विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. १९६७ साली ते विद्यापीठात पहिले आले होते. भारतीय पोलिस सेवेत ते केरळ कॅडरमध्ये सामिल झाले. मिझोराम व पंजाबातील अतिरेकी विरोधी कारवाई करण्यात ते आघाडीवर होते. वाजपेयींचे सरकार असताना कंदहार येथे अतिरेक्यांनी जे विमान अपहरण केले होते त्यावेळी प्रवाशांची सुटका करण्यासाठी ज्या चर्चा झाल्या त्यावेळी डाओल प्रमुख होते. गुप्तहेर म्हणून त्यांनी देशासाठी मोलाची कामगिरी केली आहे. अतिरेक्यांच्या गोटात घुसून त्यांच्या खबर्‍या काढणे तसेच त्यांच्या विरोधात कारवाई करणे यात डाओल यांच्यासारखा तज्ज्ञ देशात अन्य कुणी नाही. पंजाब, मिझोराम, काश्मिर येथे त्यांनी अतिरेकी विरोधी कारवाया यशस्वी करुन दाखविल्या. पंजाबमध्ये असताना त्यांनी अतिरेक्यांमध्ये घुसून त्यांच्या बातम्या काढण्यासाठी त्यांनी रिक्षा चालकाचे रुप घेतले होते. यात अनेकदा त्यांच्या जीवाला धोकाही होती. परंतु ते त्यामुळे डगमगले नाहीत. पंजाबमध्ये सरकारने ऑपरेशन ब्ल्यू स्टार करण्याच्या चार दिवस अगोदर ते सुवर्णमंदीरात घुसले व त्यांनी आपण सी.आय.ए.चे एजंट आहोत असे भासवून सर्व माहिती मिळविली व ती लष्कराला पुरविली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या या कौशल्याचा चांगला उपयोग करुन घेतला होता. व पंजाब कारवाईनंतर त्यांना किर्ती चक्र हा सन्मान बहाल करण्यात आला होता. ईशान्य भारताला १९८६ साली बंडखोरीने पोखरले होते. त्यावेळी मिझो नेता लाल डेंगा यांचे नेतेपद फार मोठे होते. मात्र डाओल यांनी त्यांच्या सात पैकी सहा कमांडोंजना फोडण्यात यश मिळविले, त्यानंतरच लाल डेंगा हे कमजोर होऊ लागले. शेवटी या फुटीर नेत्याला शांतता करारावर सह्या करण्यास भाग पडले. मात्र यामागे पडद्याआड डाओल यांची भूमिका महत्वाची होती. पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांनी तब्बल सहा वर्षे काम केले. यात त्यांना पाकिस्तान त्यांना अगदी जवळून बघता आला. ९० साली त्यांच्याकडे काश्मिरमधील अतिरेक्यांच्या कारवाया मोडून काढण्याची जबाबदारी होती. त्यात ते बर्‍याच अंशी यशस्वी झाले होते. जानेवारी २००५ साली डाओल इन्टिलिजन्स ब्युरोचे संचालक म्हणून निवृत्त झाले. डिसेंबर २००९ साली त्यांनी विवेकानंद आन्तरराष्ट्रीय फाऊंडेशनची स्थापना केली आणि याचे काम ते पाहू लागले. ते भाजपाच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते. त्यांनी स्थापन केलेल्या या फाऊंडेशनचे काम केवळ देशात नव्हे तर जगात सुरु केले. प्रामुख्याने सुरक्षेसंबंधी व्याख्याने व सल्ला देण्यास त्यांनी प्रारंभ केला. जगाच्या विविध कानाकोपर्‍यात त्यांनी भाषणे दिली. २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी त्यांची नियुक्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी केली. त्यानंतर लगेचच इराकमध्ये अडकलेल्या ४६ भारतीय नर्सेसच्या सुटकेच्या कारवाईत यश मिळविले. त्यासाठी डाओल अत्यंत खाजगी व गुप्ततेने इराकला गेले व तेथे त्यांनी उच्च पदस्यांबरोबर चर्चा केली. तरी देखील आय.एस.आय.एस.च्या तावडीतून या नर्सेसची सुटका करणे ही सोपी बाब नव्हती. मात्र यात त्यांना जबरदस्त यश आले. त्यानंतर त्यांच्या हाती म्यानमारमधील अतिरेक्यांच्या विरोधातील कारवाईची सर्व सुत्रे त्यांच्याकडे होती. आता नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या यशस्वीततेत त्यांचा मोलाचा वाटा होता. एक जबाबदार अधिकारी, निर्णय घेण्याची क्षमता असलेले नेतृत्व व डेअरिंगबाज असे त्यांचे प्रमुख गूण आहेत. त्यांच्या आजवरच्या करिअरमध्ये त्यांनी केलेली कामे व पेललेल्या जबाबदार्‍या पाहता त्यांचे महत्व अधोरेखीत होते. इंदिरा गांधींपासून ते आता नरेंद्र मोदींपर्यंत त्यांनी अनेक पंतप्रधानांच्या हाताखाली काम केले आहे. भारतीय जेम्स बॉँड अशी त्यांची जी गणणा होती ती किती योग्य आहे हे त्यावरुन समजते.
------------------------------------------
महत्वाची कामगिरी
-१९८० साली मिझो नॅशनल फ्रंटचे कंबरडे मोडण्यात यशस्वी.
-पंजाबमध्ये सुवर्ण मंदिरात गुप्तहेर म्हणून घुसून मोलाची माहिती मिळविली.
-सात वर्षे पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त
-१९९९ साली कंदहार विमान अपहरणात प्रवाशांची सुटका करण्यात महत्वाची कामगिरी.
-काश्मिरमधील अतिरेकी संघटनांशी चर्चा.
-इराकमध्ये बंदी असलेल्या नर्सेसची सुटका करण्यात मोलाची कामगीरी.
-श्रीलंकेतील राष्टाध्यक्षाच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका.
-नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या मागील मास्टरमाईंड
---------------------------------------------------------

0 Response to "कहाणी भारतीय जेम्स बॉँडची!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel