-->
ब्रिटनची भारताला थप्पड

ब्रिटनची भारताला थप्पड

संपादकीय पान मंगळवार दि. १२ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ब्रिटनची भारताला थप्पड
ग्रेट ब्रिटनने भारतातून आर्थिक गैरव्यवहार करुन बँका बुडविलेल्या विजय मल्या याला ब्रिटीश पासपोर्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. असे झाल्यास एकदा मल्या ब्रिटनचा कायम स्वरुपी रहिवासी झाल्यावर त्याचे भारत सरकार काहीही वाकडे करु शकणार नाही. त्यामुळे आपल्या देशातील आर्थिक गुन्हेगाराला अशा प्रकारे नागरिकत्व बहाल करुन भारत सरकारच्या चांगलीच थप्पड लगावली आहे. याबाबत सरकार आता कोणती पावले उचलणार आहे. अजूनही मल्याला ब्रिटीश पासपोर्ट मिळालेला नाही, त्यामुळे भारत सरकार हे थांबविण्यासाठी प्रयत्न करु शकते. परंतु परराष्ट्र मंत्रालयाकडून काहीच हालचाली होत आहेत असे दिसत नाही. मल्या याने कितीही इन्कार केला तरी त्याने आपल्या कंपन्यांतील पैसा अन्य कंपन्यांना वळविणे तसेच विदेशात तो पाठविणे हे केलेले आहे. आता अनेक चौकशीतून हे सिध्द होत आहे. यूनायटेड स्पिरिटस लिमिटेड या कंपनीच्या अकार्यकारी अध्यक्षपदी असताना कंपनीचा १२२५ कोटी रुपयांचा निधी स्वत:च्या किंगफिशर एअरलाइन्स व इतर कंपन्यांसाठी वळविल्याचा आरोप याच कंपनीने केला आहे. यावर विजय मल्यायाने हे सर्व व्यवहार कायद्यानुसारच झाले, कंपनी आपल्यावर विनाकारण आरोप करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे मल्या याच्या यूबी समूहाने यूएसएलमधील आपली भागीदारी २०१३ मध्ये डियाजियोला विकली होती. यूनायटेड स्पिरिटस लिमिटेड म्हणजेच यूएसएल ही कंपनीच आता जागतिक स्तरावरील मद्याची कंपनी डियाजियोच्या नियंत्रणात आहे. यूएसएल कंपनीने केलेल्या तपासणीतून ही बाब समोर आली आहे. या एकूणच आर्थिक घटनाक्रमासाठी कंपनीने मल्याला जबाबदार ठरविले आहे. बँकांच्या थकीत कर्ज प्रकरणात अडचणीत आलेला मल्या याचे आर्थिक गैरव्यवहार आता उघड होण्यास सुरुवात झाली आहे. मद्यसम्राट विजय मल्याचा पाय खोलात जात असल्याचे नव्या प्रकरणावरुन दिसत आहे. बँकांची कर्जे थकीत असताना मल्या याने ब्रिटनला पलायन केले, खरे तर सरकारने त्याला जाऊ कसे दिले हा प्रश्‍नच आहे. असे असले तरीही भारत सरकारने आपले वजव वापरुन हा आर्थिक गुन्हेगार आम्हाला परत द्या अशी अधिकृत मागणी ब्रिटनकडे केलेली नाही. त्यामुळे ब्रिटनला पळवून लावण्यामागे सरकारचाच हातभार लागला आहे, हे यावरुन स्पष्ट होते.
---------------------------------------------------------

0 Response to "ब्रिटनची भारताला थप्पड"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel