-->
एड्‌सवर नियंत्रण

एड्‌सवर नियंत्रण

संपादकीय पान सोमवार दि. १३ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
एड्‌सवर नियंत्रण
एड्‌सबाबत गेल्या काही वर्षात झालेली जनजागृती फळाला आली असून एड्‌स निदान आपल्या देशात तरी नियंत्रणात आला आहे. गेल्या आठ वर्षात एड्‌सचे प्रमाण ५५ टक्क्यांनी घसरले आहे. त्याचबरोबर एच.आय.व्ही.चा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्याही ६६ टक्क्यांनी कमी झाली आहे. २००० सालापासून टप्प्याटप्प्याने झालेला हा बदल आहे. २००७ साली भारताता एड्‌सने १.४८,३०९ मृत्यू झाले. तर २०१५ साली या मृत्यूंचे प्रमाण घसरुन ६७,६०० वर खाली आले. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या झालेल्या बैठकीत यासंबंधी अहवाल सादर करण्यात आला, त्यात भारताविषयी आकडे प्रसिध्द झाले आहेत. एड्‌सबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघाने तसेच खासगी उद्योगसमूहांच्या मदतीने मोठी मोहीम राबविण्यात आली होती. उद्योगसमूहातील बिल गेटस् फाउंडेशनने यात मोठा आर्थिक हातभार उचलला होता. याचे जगातील अनेक भागात सकृतदर्शनी चांगले परिणाम दिसू लागले. भारतात यासंबंधी प्रचार व प्रसार चांगल्यारितीने झाल्याने त्यांचे उत्कृष्ट परिणाम जाणवले. भारतात २००० ते २०१५ या काळात एच.आय.व्ही. बाधीतांची संख्या २.५१ लाखावरुन ८६,००० वर घसरली. त्यावेळी जागतिक पातळीवर ही घसरण केवळ ३५ टक्क्ेच होती. आता एड्‌सवर संपूर्ण नियंत्रण येण्यासाठी २०३० हे साल निश्‍चित करण्यात आले असून तोपर्यंत एड्‌स आटोक्यात आणला जाणार आहे. यासाठी प्रत्येक देशातील आरोग्य कर्मचार्‍यांनी व स्वयंसेवी संघटनांनी झटून काम करण्याची आवश्यकता आहे. एड्‌सवरील सर्वांना परवडील या किंमतीत औषधे उपलब्ध करुन देणे हे देखील महत्वाचे काम करावे लागणार आहे. १५ वर्षांपूर्वी ज्यावेळी एड्‌सचे रोगी झपाट्याने वाढले होते त्यावेळी यावर नियंत्रण कसे राखणार हे एक मोठे आव्हानच जगापुढे होते. परंतु भारतासाह अनेक देशांनी यावर मोठा विजय मिळविला आहे. शास्त्रज्ञांना मात्र अजूनही एड्‌सच्या रोगावर नियंत्रण ठेवणारी लस शोधणे हे एक आव्हानच ठरले आहे. जर अशा प्रकारचा लशीचा शोध लागल्यास हा रोग नियंत्रणाखाली आणखी झपाट्याने येऊ शकेल. एड्‌सवर नियंत्रण येत असल्याचे लक्षात येताच जागतिक पातळीवर यासाठी खर्च होणारा निधी आटला आहे. मात्र त्यामुळे कदाचित हा रोग पुन्हा वाढला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे एड्‌सविरोधी युध्द जिंकले असले तरी लढाई सुरुच ठेवावी लागणार आहे.
--------------------------------------------------

0 Response to "एड्‌सवर नियंत्रण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel