राष्ट्रवादाचा उमाळा
रविवार दि. २१ फेब्रुवारी २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
राष्ट्रवादाचा उमाळा
--------------------------------
एन्ट्रो- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या भाजपाला जर खरोखरीच देशप्रेम दाखवायचे असेल तर त्यांनी जम्मू-काश्मिरमध्ये खुले आम पाकिस्तानचा झेंडा फडकाविणार्यांवर कारवाई करावी. महात्मा गांधींचे हत्यारे असलेल्या नथुराम गोडसेंची पुजा करावयाची अशी भूमीका भाजपा व संघ खुलेआम मांडीत आहे. महात्मा गांधीच्या हत्यार्यांचे गोडवे गाणाऱे हे राष्ट्रविघातक नाहीत का? परंतु त्यांच्या मात्र कारवाई नाही आणि जे.एन.यु.च्या विद्यार्थ्यांवर कोणतीही चौकशी न करता अटक करणे ही बाब खटकणारी आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारने कंदहार प्रकरणात अतिरेकी सोडलेले चालतात. कट्टर दहशतवादी मसरत आलम याची सुटका करणार्या पी.डी.पी.सोबत सत्तेत बसणे भाजपाला चालते. इकडे भाजपाचा राष्ट्रवाद गेला कुठे? म्हणजे आपल्या तो बाब्या आणि दुसर्याचा तो... या म्हणीसारखे भाजपाचे राज्य चालत आहे...
----------------------------------------
गेल्या आठवड्यात दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जे.एन.यू) आवारात देशविरोधी दिल्या गेलेल्या घोषणांचे निमित्त करुन केंद्रातील सरकारने कडक पावले उचलली व विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्यावर थेट देशद्रोहाचा आरोप करुन त्याला अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ सरकारच्या या घटनेचा सर्व थरातून विरोध झाला. अगदी जे.एन.यू.तील प्राध्यापकांनी या घटनेचा जोरदार निषेध केला. परंतु हिंदुत्वाचे भूत डोक्यावर बसलेल्या भाजपाच्या व त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून विविध संघटनांना एक प्रकारचा राष्ट्रवादाचा जोरदार उमाळा आला आहे व त्यांनी राष्ट्रद्रोहाचे खटले भरण्याचा सपाटा लावला आहे. त्यात जे.एन.यू.तील माजी प्राध्यापक गिलानींपासून ते कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष राहूल गांधी यांच्यापर्यंत देशद्रोहाचे खटले भरण्यास सुरुवात केली आहे. एकूणच पाहता भाजपाने आता या देशातील जनतेला राष्ट्रवाद म्हणजे काय हे शिकविण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे आजपर्यंत राष्ट्रवाद कोणालाच माहित नव्हता व त्याची व्याख्या आता भाजपा व संघाकडून या देशातील जनतेला शिकावी लागणार आहे. सरकारचा यामागचा अंतस्थ हेतू स्पष्ट आहे. या देशात हिंदुत्ववादच खरा आहे, तुम्हाला अन्य विचारधारा बाळगायची असेल तर तुम्ही राष्ट्रवादी नाहीत. या देशातील जनतेने फक्त भगव्या झेंड्याच्या खाली येऊनच नमस्ते सदा.. म्हणावे. अन्य विचारधारा या झूठ आहेत. त्यातच डावा विचार मानणारे कम्युनिस्ट असोत वा समाजवादी हे देशद्रोही आहेत व त्यांच्या बरोबर जाणारे हे देशद्रोहीच आहेत असे सूत्रच या सरकारने तयार केले आहे. संसदेवर हल्ला करणार्या अफजल गुरुच्या फाशी दिल्याच्या दिवसाचे निमित्त करुन जे.एन.यू.मध्ये भारतविरोधी घोषणा दिल्या गेल्या. ज्यावेळी कन्हैया कुमार यांचे भाषण चालू होते त्यावेळी या घोषणा दिल्या गेल्या. मात्र या घोषणा कन्हैया कुमार यानेच दिल्याचे जाहीर करुन त्याच्यांवर कारवाई करण्यात आली. आता कन्हैया कुमारचे भाषण व्हायरल झाले आहे त्यात तसे काहीच दिसत नाही. उलट असे सांगितले जात आहे की, त्याचे भाषण सुरु असताना पाठीमागून देशविरोधी घोषणा झाल्या व त्या अ.भा.वि.प.च्या विद्यार्थ्यंनीच दिल्या असे समजते. कारण आता जो व्हिडिओ सर्वत्र व्हायलर झाला आहे त्यात अ.भा.वि.प.चे विद्यार्थी पाठूमागून घोषणा देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे डाव्या विद्यार्थी संघटनांना बदनाम करण्याचा डाव आखलेला होता. अर्थातच हे सर्व पूर्वनियोजितच असावे यात काहीच शंका नाही. काही बाहेरचे तरुण येथे कार्यक्रम सुरु असताना आले व त्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या असे कन्हैया यांचे म्हणणे आहे. आता दिल्ली पोलिसांना कन्हैया कुमार या विद्यार्थी नेत्यावर देशद्रोहाचे आरोप सिद्द करणे कठीण जात आहे. थेट गृहमंत्र्यांकडून आदेश आल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली हे स्पष्टच आहे. जे.एन.यू.मध्ये देशविरोधी घोषणा झाल्या असतील ते निषेधाथर्र्च आहे, याला जबाबदार असणार्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, यात काहीच शंका नाही. मात्र सरकारने या घटनेचे निमित्त करुन जे.एन.यू.च्या नथीततून डाव्यांवर तीर मारण्याचा डाव केला आहे हे स्पष्टच दिसले. जे.एन.य्ू. हे विद्यापीठ प्रामुख्याने डाव्या चळवळीचे एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. गेली कित्येक वर्षे येथे डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी संघटनांचा चांगलाच दबदबा आहे. डाव्या पक्षांच्या नेत्यांना घडविणारी ही शाळाच असे जे.एन.यू.ला संबोधिले जाते. असे असले तरी गेल्या काही वर्षात येथे भाजपाप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने चंचूप्रवेश केला आहे. सध्या केंद्रात त्यांची सत्ता असल्यामुळे या संघटनेला आणखीनच बळ लाभले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेला येथे स्थिरस्थावर करण्यासाठी थेट गृहमंत्रालय कार्यारत झाले आहे. संघ व त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या भाजपाला जर खरोखरीच देशप्रेम दाखवायचे असेल तर त्यांनी जम्मू-काश्मिरमध्ये खुले आम पाकिस्तानचा झेंडा फडकाविणार्यांवर कारवाई करावी. महात्मा गांधींचे हत्यारे असलेल्या नथुराम गोडसेंची पुजा करावयाची अशी भूमीका भाजपा व संघ खुलेआम मांडीत आहे. महात्मा गांधीच्या हत्यार्यांचे गोडवे गाणाऱे हे राष्ट्रविघातक नाहीत का? परंतु त्यांच्या मात्र कारवाई नाही आणि जे.एन.यु.च्या विद्यार्थ्यांवर कोणतीही चौकशी न करता अटक करणे ही बाब खटकणारी आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारने कंदहार प्रकरणात अतिरेकी सोडलेले चालतात. कट्टर दहशतवादी मसरत आलम याची सुटका करणार्या पी.डी.पी.सोबत सत्तेत बसणे भाजपाला चालते. इकडे भाजपाचा राष्ट्रवाद गेला कुठे? म्हणजे आपल्या तो बाब्या आणि दुसर्याचा तो... या म्हणीसारखे भाजपाचे राज्य चालत आहे. सध्याचे जे.एन.यू.तील प्रकरण, हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांची आत्महत्या, पुण्यातील एफ.टी.आय. ही सर्व प्रकरणे पाहता सरकार विद्यापीठांमध्ये हस्तक्षेप करुन हिंदुत्वाचा आपला अजेंडा राबवू पाहता आहे. यातूनच ही सर्व अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रद्रोह म्हणजे नेमके काय याची व्याख्या न्यायलयाने केली आहे. अर्थातच ही व्याख्या भाजपाच्या पुढार्यांनी तयार करावयाची नाही तर त्यासंबंधी न्यायालय निर्णय घेणार आहे. यापूर्वीही यासंबंधी न्यायालयाने अनेकदा महत्वाचे निकाल दिले आहेत. घटनेने दिलेल्या मतस्वातंत्र्याच्या अधिकाराच्या माध्यमातून सरकारवर टीका करणे हा राष्ट्रद्रोह होऊ शकत नाही. सरकारविरोधी घोषणा देऊन जर समाजात हिंसाचार पसरला तर राष्ट्रद्रोह होऊ शकतो, असे न्यायालयाने एका खटल्यात नमूद केले आहे. या व्याखेचा विचार करता कन्हैया कुमार याचा राष्ट्रद्रोह होऊच शकत नाही. कारण त्याने घटनास्थळी पोहचून विद्ायर्थ्यांना शांत राहाण्याचे आवाहन केले. तसेच त्यावेळी केलेल्या बाषमात त्याने राज्यघटनेचा आदर करीत अहिंसेच्या मार्गाने आपला व्यवस्थेशी लढा सुरु राहिले असे म्हटले होते. कन्हैया कुमारचे हे भाषण पाहता सरकारने पूर्वग्रह दुषित राहून त्याच्यावर कारवाई केली हे स्पष्टच आहे. एकूणच भाजपा व संघांच्या नेत्यांना आलेला राष्ट्रवादाचा उमाला त्यांच्याच आंगलटी येणार हे नक्की.
-------------------------------------------------------------------

0 Response to "राष्ट्रवादाचा उमाळा"
टिप्पणी पोस्ट करा