संवेदनाक्षम सोशल मिडिया
रविवार दि. ०३ जानेवारी २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
संवेदनाक्षम सोशल मिडिया
-------------------------------------
एन्ट्रो- २०१५ साली व्टिटर हे राजकारण्यांसाठी आपली मते मांडण्याचे एक उत्कृष्ट साधन झाले. यात अरविंद केजरीवाल व नरेंद्र मोदी हे आघाडीवर आहेत. कोणत्याही देशातील महत्वाच्या घटनेवर मोदी व्टिट करतात. परंतु त्यांना अडचणीचे वाटते तिकडे मात्र मौन बाळगतात. दादरीच्या प्रकरणी पंतप्रधानांनी पंधरा दिवस ट्टिट करणे टाळले होते. तसेच एरव्ही ट्टिट करण्यात आघाडीवर आसणार्या सुषमा स्वराज यांनीही ललित मोदी प्रकरणी व्टिट करणे टाळले होते. अशा प्रकारे अनेक राजकारण्यांना ट्टिट करणे कधीकधी अडचणीचे होते त्यावेळी ते मात्र मौन पाळतात आणि ज्यावेळी त्यांच्या फायद्याचे असते त्यावेऴी एका झटक्यात ट्टिटरवर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात...
----------------------------------------
दोन दिवसांपूर्वी सुरु झालेले २०१६ हे साल गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सोशल मिडियाचे वर्ष म्हणून गाजेल असे दिसते. गेल्या वर्षी सोशल मिडियाने आपला प्रभाव दाखविला. प्रामुख्याने गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सोशल मिडियाने आपली महत्वाची भूमीका बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मिडियाचे हे महत्व ओळखून त्याचा निवडणुकीच्या प्रचारात प्रभावीपणाने उपयोग करुन घेतला आणि सर्वांना गारद करुन सत्तेत आले. सध्याचा विरोधी पक्ष मात्र यात कुचकामी ठरला हे वास्तव कुणीच नाकारु शकत नाही. अगदी त्यावेळी सत्तेत असलेल्या कॉँग्रेसनेही सोशल मिडियाचे महत्व ओळखले नव्हते. आता मात्र देशातील सर्वच पक्ष सोशल मिडियाचे उशीरा का होईना महत्व ओळखून त्यात आपलाही वाटा शोधत आहेत. त्याचबरोबर सोशल मिडिया आता मात्र पोक्त होत आहे. कारण ऐकेकाळी ज्या सोशल मिडियाने नरेंद्र मोदींना डोक्यावर घेतले होते त्याच सोशल मिडियावरुन आता अनेक लोक टीका करु लागले आहेत. यातूनच त्यांची लोकप्रियता घसरु लागली आहे. त्यामुळे सोशल मिडिया हा अत्यंत संवेदनाक्षम आहे. त्यावरुन कसलाही विचार न केला एखादी त्वरित प्रतिक्रिया दिली जाते, परंतु आता हाच मिडिया संवेदनाक्षम असल्याने त्याला मोदींनी आपली फसवणूक केल्याची भावना निर्माण झाल्याने तो त्यांच्या विरोधात सोशल मिडिया उभा ठाकला. गेल्या वर्षी भारत-पाक क्रिकेट मॅच असो, बाल गुन्हेगांचा वयासंबंधी नवीन कायदा असो, राहूल गांधींचा विदेश दौरा असो किंवा नरेंद्र मोदींचे परदेश दौरे असोत प्रत्येक बाबतीत मते व्यक्त करण्यासाठी सोशल मिडिया आघाडीवर राहिला आहे. व्टिटरवरुन अनेक जण विविध प्रश्नी आपला संताप व्यक्त करीत असतात. अगदी महागाई ते खनिज तेलाच्या जागतिक पातळीवर किंमती उतरुनही आपल्याकडे न उतरल्याने नागरिक आपली मते हिरिरीने मांडत आले आहेत. व्टिटरवरुन १४० शब्दात आपली मते मांडणे लोकांना फार सोपे वाटते. सरकारने ज्यावेळी पॉर्न साईटस ब्लॉक केल्या त्यावेळी सोशल मिडियावरुन संताप व्यक्त झाला. शेवटी सरकारला आपला हा निर्णय बदलावा लागला. एवढेच कशाला भाजपाचे खासदार चंदन मैत्रा यांनी सरकार सोशल मिडियावरील मते गृहीत धरुन पाकिस्तानसंबंधी धोरण ठरवित नाही, असे म्हटले होते. त्यावरही संताप व्यक्त झाला होता. शेवटी मैत्रा यांना माफी मागावी लागली होती. भाजपाने २०१४च्या निवडणुकीसाठी एक वर्षे अगोदर सोशल मिडियाची तयारी सुरु केली होती. अमेरिकेतील ओबामांच्या निवडणुकीतील प्रचार पाहून त्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. मात्र भाजपापेक्षा सोशल मिडियातून आक्रमक प्रचार आम आदमी पार्टीने केला होता. त्यात त्यांना यशही मोठ्या प्रमाणात आले, हे विसरुन चालणार नाही. २०१५ साली व्टिटर हे राजकारण्यांसाठी आपली मते मांडण्याचे एक उत्कृष्ट साधन झाले. यात अरविंद केजरीवाल व नरेंद्र मोदी हे आघाडीवर आहेत. कोणत्याही देशातील महत्वाच्या घटनेवर मोदी व्टिट करतात. परंतु त्यांना अडचणीचे वाटते तिकडे मात्र मौन बाळगतात. दादरीच्या प्रकरणी पंतप्रधानांनी पंधरा दिवस ट्टिट करणे टाळले होते. तसेच एरव्ही ट्टिट करण्यात आघाडीवर आसणार्या सुषमा स्वराज यांनीही ललित मोदी प्रकरणी व्टिट करणे टाळले होते. अशा प्रकारे अनेक राजकारण्यांना ट्टिट करणे कधीकधी अडचणीचे होते त्यावेळी ते मात्र मौन पाळतात आणि ज्यावेळी त्यांच्या फायद्याचे असते त्यावेऴी एका झटक्यात ट्टिटरवर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. सोशल मिडियापुढे किंवा एकूणच देशातील इंटरनेटपुढे आता फेसबुकने टाकलेल्या फ्री इंटरनेट जाळ्याचे एक मोठे आव्हान उभे राहाणार आहे. फेसबुक एकीकडे इंटरनेटचा पॅक मोफत देण्याचा डाव टाकीत असून त्याबदल्यात कोणत्या साईटस् वापरावयाच्या याचे स्वातंत्र्य स्वत:कडे ठेवणार आहे. म्हणजे प्रत्येक ग्राहकाच्या गळ्यात आपल्या नावाचा दोरा घालणार आहे. अर्थात हा दोर कधी आवळावयाचा व कधी सैल करायचा हे फेसबुक ठरवेल. त्यामुळेे आपली एकूणच इंटरनेट व्यासपीठ धोक्यात येणार आहे. यासांबधी सध्या फेसबुक मोठ्याल्या जाहीरातींचा मारा करीत आहे, आणि मोफत इंटरनेट किती फायदेशीर आहे ते पटवित आहे. परंतु या फसव्या धोरणापासून ग्राहकांनी दूर राहाणे शहाणपणाचे ठरणार आहे. इंटरनेट हे प्रभावी माध्यम आहे आणि त्याव्दारे जग काही बोटाच्या अंतरावर आले आहे. हे माध्यम जर कुणा एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या हातात जाणार असेल तर त्याला विरोध हा झाला पाहिजे. चालू वर्षात नवीन जगाने हे नवीन प्रश्न सर्वांपुढे येणार आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी ही कधी संपूर्ण जगाची किंवा संबंधीत देशाची असेल. त्यासाठी भारताच्या सरकारने ठाम भूमिका घेणेे गरजेचे आहे. यात भारत सरकार कोणती भूमिका घेते ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "संवेदनाक्षम सोशल मिडिया "
टिप्पणी पोस्ट करा