सत्ताधार्यांना चपराक
संपादकीय पान बुधवार दि. १३ जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सत्ताधार्यांना चपराक
रायगड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींसह राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार राजाने सत्ताधार्यांना एकूण जागांत तीन व चार क्रमांकावर फेकून चांगलीच चपराक दिली आहे. राज्यातील १८ नगरपंचायती व दोन नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ३३१ जागा होत्या. त्यातील १०७ जागा कॉँग्रेसने जिंकून पहिला क्रमांक पटकाविला आहे तर त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेसने ८४ जागा पटकावून दुसरा क्रमांक पटकाविला. तर सत्ताधारी असणार्या शिवसेनेला ५८ व भाजपाला केवळ ३२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना-भाजपाच्या कामाबाबत अशा प्रकारे मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपासह शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी हा एक मोठा धडा आहे. सरकारविरोधातील रोष अशा प्रकारे मतदारांनी व्यक्त केल्याने सत्ताधार्यांसाठी ही धोक्याची घंटाच ठरावी अशी स्थिती आहे. रायगड जिल्ह्यात खालापूर येथे शेतकरी कामगार पक्षाने जोरदार मुसंडी मारुन एक हाती सत्ता कमावली आहे. तर तळा, पोलदपूर शिवसेनेकडे तर म्हसळा, माणगाव येथे राष्ट्रवादीने आपली सत्ता कायम टिकविण्यात यश मिळविले आहे. शेकापला खालापूरात मिळालेले यश हे लक्षणीयच म्हटले पाहिजे. आजवर शेकापला खालापूर ग्रामपंचायत असताना एकहाती सत्ता कधी मिळाली नव्हती. आता मात्र नगरपंचायत झाली असताना पहिल्यांदा मतदारांनी शेकापच्या हाती सत्ता देऊन विकासाच्या दृष्टीने आपला कौल दिला आहे. आजवर खालापूरमध्ये कॉँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर अलिकडच्या काळात शिवसेनेने आपला वरचश्मा येथे कायम टिकविला होता. आता मात्र जनतेने या दोघांनाही बाजुला सारुन शेकापच्या हाती सत्ता दिली आहे. आता तर शिवसेना तालुकाप्रमुखाला त्यांच्या वॉर्डातून लोकांनी बाजूला सारले आहे. खालापूर हे एतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. छत्रपची शिवाजी महाराजांनी कल्याणची बाजारपेठ लुटल्यावर येथील साभाई मंदिरातच आपला पहिला मुक्काम ठोकला होता. त्याचबरोबर अष्टविनायकातील वरदविनायकाचे स्थान येथीलच. खालापूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाव स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. इंग्रजांनी या भागाचे वैशिष्ट्य ओळखून तेथे तहसिल कार्यालय स्थापन केले होते. अलिकडच्या काळात तर खालापूर हे औद्योगिक केंद्र म्हणूनही पुढे आले आहे. एकीकडे ग्रामीण संस्कृती रुजलेली असताना नागरीकरणाचे वेध खालापूरला लागले आणि गेल्या दशकात त्याचा चेहरामोहरा बदलू लागला. आता पुढील पाच वर्षात खालापूरचा विकास करण्याचे काम शेकापला करावे लागणार आहे. रायगड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या या निवडणुकीत भाजपा व मनसे या दोन्ही पक्षांना शून्य भेदता आलेले नाही. संपूर्ण राज्याचा विचार करता राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व गृहराज्यमंत्री राम शिंदे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये विरोधकांनी बाजी मारल्याने सत्ताधार्यांना हादरा बरणे स्वाभाविक आहे. या निवडणुकीत कॉँग्रेसची कामगिरी सर्वात उत्तम आहे. एकूण १०७ जागा जिंकत कॉँग्रेसने सात नगरपंचायतींमध्ये स्पष्ट बहुमत प्राप्त केले. मुंबई, नवीमुंबई, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील एकूण चार जागांपैकी एकाही ठिकाणी भाजपाला यश आलेले नाही. याचा अर्थ शहरी मतदार जो सातत्याने भाजपाच्या बरोबरीने राहिला आहे त्यानेही भाजपाची साथ सोडल्याचे दिसते. मुंबईची एक जागा शिवसेनेने आपल्याकडे राखण्यात य्श मिळविले तर अहमदनगरमध्येही त्यांना एका जागा विजय मिळाला आहे. नवी मुंबई व पिंपरी-चिचंवड येथील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील दोन नगरपालिका कॉँग्रेसने ताब्यात घेतल्या असून तेथे भाजपाला फक्त तीन जागा मिळाल्या. याच जिल्ह्यातील गोडपिंपरीमध्ये भाजपाला सहा ठिकाणी यश आले असले तरीही तेथील चाव्या अपक्षांच्या हाती आल्या आहेत. त्यामुळे तेथे भाजपाला सत्ता मिळविण्यासाठी पक्षांची मनधरणी करावी लागणार आहे. गृहराज्यमंत्री व भाजपाचे नेते राम शिंदे यांच्या जामखेडमध्येही भाजपाची स्थिती दयनीय झाली असून २१ पैकी फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागत आहे. भाजपाला रायगडबरोबर नंदुरबारमधील सातही नगरपालिकांमध्ये एकही जागा मिळालेली नाही. अन्य जिल्ह्यातही तीन नगरपालिकांमध्ये भाजपाच्या हाती भोपळाच लागला आहे. या निवडणुका कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या राज्यातील सर्वच भागात झाल्यामुळे ही एक मिनी विधानसभेची निवडणूक ठरली होती. मात्र जनतेने भाजपाला एकमताने झिडकारले आहे. एकूणच पाहता भाजपाच्या विरोधात एक लाटच तयार होत आह असे सार्वत्रिक चित्र दिसते आहे. गेल्या दीडवर्षांपूर्वी त्यांच्या बाजून ेलाट होती. मात्र लोक केवळ दीड वर्षातच सध्याच्या राज्यकर्त्यांना कंटाळल्याचे दिसत आहे. सत्ताधार्यांना ही एक मोठी चपराक आहे.
-------------------------------------------------------------------

0 Response to "सत्ताधार्यांना चपराक"
टिप्पणी पोस्ट करा