-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
ब्रिटीशांचा वारसा असलेले पोस्ट व रेल्वे कार्यक्षम कधी होणार?
--------------------------------
आपल्या देशातून ब्रिटीश राजवट संपुष्टात येऊन आता तब्बल सहा दशके लोटली आहेत. असे असले तरीही ब्रिटीशांनी दिलेल्या देणग्या म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या रेल्वे व पोस्ट खाते हे आता शेवटचा श्‍वास घेते आहे. यातील रेल्वे ही आता आशिया खंडातील सर्वात मोठी असली तरीही त्याचा दर्जा खालावलेला आहे. तर पोस्ट खात्याचे जाळे ६० हजार हून कार्यालयांचे असले तरी आता ते मृतावस्थेत असल्यासारखे आहे. रेल्वे व पोस्ट खात्याला नवसंजिवनी देण्याचे काम हे सरकार करील का असा सवाल आहे. शंभरी पार केलेल्या पूर्वी ब्रिटीश कंपनी मक्लिक निक्सनच्या ताब्यात असलेल्या यवतमाळ-मूर्तीजापूर या शकुंतला नावाने परिचित असलेल्या नॅरोगेज रेल्वेचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये होणे तर दूरच राहिले उलट, आता शकुंतलाचा श्वास थांबला हा मार्ग आता कोमात गेला आहे.  १९१६ मध्ये क्लिक निक्सन ऍँड कंपनीने यवतमाळ-मूर्तीजापूर, मूर्तीजापूर-अचलपूर आणि पुलगाव-आर्वी या तीन नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या. आश्चर्य म्हणजे, देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्र झाल्यावरही देशातील या तीन रेल्वे आजही याच कंपनीच्या ताब्यात आहेत. संपलेली आथक तरतूद आणि ब्रिटीश कंपनीशी असलेला केंद्र सरकारचा संपुष्टात आलेला करार व त्या कराराचे न झालेले नूतनीकरण, अशी कारणे देत रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी शकुंतला बंद करून टाकली.  यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातही यवतमाळ-मूर्तीजापूर- अचलपूर व पुलगाव-आर्वी या शकुंतलेचे नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली नाही. यवतमाळ-मूर्तीजापूर रेल्वे सुरू ठेवण्यासाठी एका दमडीचीही तरतूद केली नाही. याबाबतचा कोणताच उल्लेख त्यांच्या भाषणात नसल्याने वैदर्भीय जनतेच्या तोंडाला रेल्वेमंत्र्यांनी पाने पुसली. केंद्रात नव्याने स्थापन झालेले मोदी सरकार तरी याबाबत काही तरी करेल अशी अपेक्षा होती. पण याही सरकारला पैशांचे सोंग आणता येत नाही, याची जाणीव झाली आहे. शकुंतलाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होण्यासाठी एक याचिकासुध्दा संसदेच्या याचिका समिती समोर दाखल झाली होती. समितीचे तत्कालीन अध्यक्ष खासदार अनंत गीते यांच्यासमोर तीनदा सुनावणी झाली. मूर्तीजापूर-अचलपूर ही रेल्वे बंद आहे, तर पुलगाव-आर्वी रेल्वे केवळ बंदच नाही, तर या मार्गावरील रूळही उखडून पडत आहेत. या तीनही शकुंतलांचे ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतर होणार असल्याचा जो विश्वास खासदार भावना गवळींनी व्यक्त केला होता तोही रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी फोल ठरवला. आता तर शकुंतला कोमातच गेली आहे. ती कोमातून बाहेर येईल की नाही, याबद्दल शंकाच आहे. ९१६ मध्ये सुरू झालेली शंकुतला जवळपास ७० वर्षे वाफेच्या इंजिनवर चालत होती. नंतर ती डिझेल इंजिनवर धावायला लागली. गरिबांची जीवनरेखा असलेली शकुंतला चालवणे आता मात्र मध्य रेल्वेला परवडेनासे झाले आहे. कारण, शकुंतलाचे उत्पन्न व खर्च यात जमीन अस्मानाचे अंतर पडले आहे. डिझेलच्या वाढलेल्या किमती, रेल्वे पायलट, गार्ड, स्टेशन मास्तर आणि कर्मचार्‍यांचे वाढलेले पगार, यामुळे ही रेल्वे प्रचंड तोट्यात आहे. तिचे रोजचे उत्पन्न ३०० रुपयेसुध्दा नाही. शकुंतलाचा आस्थापना खर्चही मध्य रेल्वेचे कंबरडे मोडणारा आहे. या मार्गावरील कारंजा वगळता सारे स्टेशन्स उध्वस्त होऊन बंद पडले आहेत. अशा स्थितीत शकुंतला ब्रॉडग्रेज कशी होईल, हा अनाकलनीय प्रश्न सध्या चर्चेत असतांना रेल्वेमंत्र्यांनी तिला कोमात पाठविली आहे. आज भारतीय पोस्ट खात्याचेही असेच झाले ाहे. हे खाते खरे कर ज्या कार्यक्षमतेने काम करावयास हवे तसे करीत नाही. गेल्या काही महिन्यात याचे बँकेत रुपांतर करण्याची चर्चा होती, मात्र तोही निर्णय झालेला नाही. अशा प्रकारे आजच्या स्वातंत्र्य दिनाला ब्रिटीशांनी आपल्याला दिलेल्या दोन मोठ्या देणग्या अधोगतीला लागल्याचे पहावे लागत आहे.
---------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel