-->
संपादकीय पान शनिवार दि. २८ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
टाटा समूहातील मिस्त्री राजवटीचे पहिले वर्ष 
-------------------------
देशातील आघाडीच्या टाटा उद्योगसमूहाच्या नेतृत्व बदलास आज वर्ष पूर्ण झाले. रतन टाटा यांच्यासारख्या नामवंत उद्योगपतीने टाटा समूहाच्या नेतृत्वपदाची धुरा सायरस मिस्त्री यांच्याकडे सोपविली, त्यावेळी टाटा समूहाचे भवितव्य काय असेल अशी अनेकांना शंका वाटत होती. कारण रतन टाटा यांच्या नावाभोवती एक जबरदस्त दबदबा होता. त्यांनी जवळपास गेल्या पाव दशकात आपल्या नेतृत्व काळात टाटा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवून एका नवीन उंचावरी नेऊन ठेवले होते. रतन टाटा यांच्यानंतर आलेल्या वारसाचे आडवान टाटा नव्हते. सायरस मिस्त्री हे टाटा समूहात काम केलेले व टाटांच्या जवळचे असले तरीही टाटा समूहाचा अवाढव्य व्याप त्यांना सावरत येईल का, अशी शंका समभागधारकांपासून ते कामगारांपर्यंत सर्वांना वाटणे स्वाभाविकच होते. परंतु गेेल्या वर्षातल्या टाटा समूहातील घडामोडी पाहता मिस्त्री हे रतन टाटांचे वारस म्हणून योग्च आहेत असे दिसते. एकतर मिस्त्रींच्या हातात टाटा समूहाची सुत्रे आली त्यावेळी जगात जबरदस्त मंदीचे वारे वाहत होते. त्यामुळे १०० कंपन्यां असलेल्या या समूहात एक प्रकारे मंदीचा तडाखा बसलेला होता. याचे आणखी एक कारण म्हणजे टाटा समूहाच्या एकूण उलाढालीत विदेशातील ६० टक्क्याहून जास्त वाटा आहे. टाटा स्टील व टाटा मोटार्सने विदेशात ज्या कंपन्या खरेदी केल्या होत्या तत्यामुळे कर्जाचा बोजा वाढला होता. या पार्श्‍वभूमीवर सायरस यांनी सुत्रे घेतली असताना त्यांनी अतिशय शांत चित्ताने समूहात एक एक पाऊल टाकत सुधारणा सुरु केल्या. यातील सर्वात पहिले पाऊल टाकले ते समूहात तरुण रक्ताला त्यांनी वाव दिला. रतन टाटांनी ९०च्या दशकात ज्यावेळी सुत्रे हाती घेेतली होती त्यावेळी त्यांनी देखील अशाच प्रकारे तरुणांना वाव देऊन समुहात बदल केले होते. मिस्त्री यांनी देखील सुधारणा करताना यानेच सुरुवात केली. यातील काही जणांना त्यांनी ग्रुप कॉर्पोरेट सेंटरमध्ये समाविष्ट केले. टाटा स्टीलसारख्या एवढ्या मोठ्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ४२ वर्षीय टी.एन.नरेंद्रन यांची नियुक्ती केली. कंपनीतील नेतृत्वाचे वय हे सरासरी ४५च्या आसपास असेल हे त्यांनी पाहिले. आपल्या कंपन्या जागतिक तोडीच्या होण्यासाठी त्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले. समूहातील कंपन्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी नव्याने प्रय्तन करीत असताना दुसरीकडे हवाई क्षेत्रात प्रवेश केला. त्यासाठी टाटाव सिंगापूर एअरलाईन्सच्या सहकार्याने नवीन कंपनी स्थापन केली. तसेच लोकॉस्ट हवाई सेवेसाठी एअर एशियाच्या सहकार्याने आणखी एक दुसरी कंपनी स्थापन केली. सर्वात स्वस्त मोटार म्हणून जगात ओळखल्या गेलेल्या नॅनोला नवीन साज चढवून तिला नव्याने बाजारात आणली. आता नॅनो ही स्वस्त मोटार म्हणून विकली जाणार नसून तिचे मार्केटिंगचे स्वरुपच बदलण्यात आले. रिझर्व्ह बँकेने खासगी बँका स्थापन करण्यासाठी अर्ज मागविले त्यावेळी टाटा समूहाने आपला अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर सहा महिन्यात यासाठीचा अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी अनेकांना टाटांच्या हालचालीबद्दल आश्‍चर्य वाटले. पंरतु त्याच असाही अर्थ लावला गेला की नव्याने बँक स्थापण्याऐवजी बहुदा टाटा एखादी जुनी बँक ताब्यात घेण्याच्या तयारीत असावेत. हे अंदाज खरे आहेत किंवा नाहीत ते लवकरच समजेल. विमानतळाच्या खासगीकरणाच्या प्रकल्पातून माघार त्यांनी घेतली. अशा प्रकारे सायरस मिस्त्री हे विचारपूर्वत एक एक पाऊल टाकीत टाटा समूहाला एका नव्या दिशेने नेत आहेत.
-------------------------------          

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel