डिलिव्हरी लॉजिकमधील ‘सेलर्स ऑप्शन’ पर्यायाचा अर्थ काय?
दिव्य मराठी (15/04/12) ARTHPRAVA
डिलिव्हरी लॉजिकमधील ‘सेलर्स ऑप्शन’ पर्यायाचा अर्थ काय? उत्तर - डिलिव्हरीच्या काळात विक्रेत्याकडे कॉन्ट्रॅक्टसंबंधाने ओपन पोझिशनची मुभा असण्याला ‘सेलर्स ऑप्शन’ म्हटले जाते. या प्रकरणी विहित खरेदीदाराला डिलिव्हरी स्वीकारणे किंवा त्यासंबंधाने दंड भरणे बंधनकारक ठरते. प्रश्न- ‘कम्पल्सरी डिलिव्हरी’ या संज्ञेचा अर्थ काय?
उत्तर - ‘कम्पल्सरी डिलिव्हरी’च्या प्रकरणात खरेदीदार आणि विक्रेते दोघांनीही टेंडर/ डिलिव्हरी काळात (टी/पी किंवा डी/पी) खुला पवित्रा (ओपन पोझिशन्स) घेतलेल्या असतात आणि करारसमाप्तीनंतर त्यांना कमोडिटीची उचल व डिलिव्हरी करणे बंधनकारक असते. प्रश्न- डिलिव्हरी लॉजिकमधील ‘बोथ ऑप्शन’ या संज्ञेचा अर्थ काय?
उत्तर- ‘बोथ ऑप्शन’ प्रकरणात खरेदीदार आणि विक्रेते दोघेही जोवर कमोडिटीची उचल वा डिलिव्हरी करण्यास राजी होत नाहीत, तोवर डिलिव्हरी दिली जात नाही. डिलिव्हरीचा इरादा जर स्पष्टच होऊ शकला नाही, तर अंतिम मुदतीनंतर हा खुला पवित्रा रोख देऊन पूर्ण केला जातो. प्रश्न- उचल वा डिलिव्हरीचा इरादा स्पष्ट करूनही जर खरेदीदार वा विक्रेत्याने तो पाळला नाही तर काय होते? उत्तर - अशा प्रकरणी करारात नमूद तपशिलाप्रमाणे दंडात्मक रक्कम आकारली जाते. प्रश्न- ‘ऑड लॉट्स’ या संज्ञेचा अर्थ काय? उत्तर- कराराच्या समाप्तीच्या वेळी जर त्यातील सदस्याने खुला पवित्रा (ओपन पोझिशन) घेतला असल्यास, डिलिव्हरी करण्याजोग्या एककांमध्ये रूपांतर करणे शक्य नसल्यास त्याचे ‘ऑड लॉट्स’ प्रकारात वर्गीकरण केले जाते. प्रश्न- कमोडिटी वायदा कराराच्या समाप्तीनंतर ‘ऑड लॉट्स’ प्रकारातील सौद्यांची पूर्तता मग कशी केली जाते?
उत्तर - ‘ऑड लॉट्स’ प्रकारातील करारांची पूर्तता मुदतपूर्ती दिनांकानंतर सामान्यत: रोखीतून (कॅश) केली जाते, पण तसे कलम कराराच्या तपशिलात नमूद असायला हवे.
0 Response to "डिलिव्हरी लॉजिकमधील ‘सेलर्स ऑप्शन’ पर्यायाचा अर्थ काय?"
0 Response to "डिलिव्हरी लॉजिकमधील ‘सेलर्स ऑप्शन’ पर्यायाचा अर्थ काय?"
टिप्पणी पोस्ट करा