-->
डिलिव्हरी पिरियड माजिर्न म्हणजे काय?

डिलिव्हरी पिरियड माजिर्न म्हणजे काय?

डिलिव्हरी पिरियड माजिर्न म्हणजे काय?
 Published on 06 Feb-2012 ARTHPRAVA
एक्स्चेंजेसकडून विशिष्ट कॉन्ट्रॅक्ट्सच्या अंतिम टप्प्यात आकारला जाणारा हा अतिरिक्त माजिर्न निधी आहे. (जेव्हा विशिष्ट काळानंतर असे कॉन्ट्रॅक्ट्स परिपक्व होतात वा डिलिव्हरी किंवा सौदापूर्तीच्या स्थितीत येतात.) ही रक्कम शिल्लक असलेल्या खरेदी व विक्री स्थिती अशा दोन्हींबाबत लागू होते. 
0‘मार्क-टू-मार्केट’ (एमटीएम) म्हणजे काय? 
3व्यवहार झालेल्या प्रत्येक दिवसाच्या अखेरीस, प्रत्येक ट्रेडिंग मेंबर/ क्लायंटचे माजिर्न खाते हे त्याने मिळवलेल्या नफा वा तोट्यानुसार जुळवले जाते. प्रत्येक व्यवहार झालेल्या दिवसाच्या शेवटी हे नफ्या-तोट्याचे प्रमाण आदल्या दिवशी बंद झालेल्या किमतीच्या तुलनेत बदलत जाते. हा किमतीतील बदल मग माजिर्न खात्यात वर्ग केला जातो. या प्रक्रियेला मार्क-टू-मार्केट म्हटले जाते. 
0 एखाद्या वायदा सौद्यात (फ्युचर्स काँट्रॅक्टमध्ये) मुदतपूर्तीच्या दिवसापूर्वी खुल्या स्थितीची (ओपन) जर तोंडमिळवणी केली गेली नाही, तर काय होते? 
3 फ्युचर्स काँट्रॅक्ट्समधील खुल्या स्थितीची तोंडमिळवणी जर मुदतपूर्तीच्या आधी न केली गेल्यास, तर त्याच्या लाँग/ शॉर्ट पोझिशन्सच्या आधारे त्या ट्रेडरला त्या विशिष्ट कमोडिटीची डिलिव्हरी घ्यावी वा द्यावी लागेल. काँट्रॅक्टमध्ये निश्चित केलेल्या सौदापूर्ती कलमांनुसार हे घडले पाहिजे. 
0 कमोडिटी मार्केट्समध्ये क्लिअरिंग-हाऊसेसची भूमिका काय आहे? 
3 एक्स्चेंजेसच्या क्लिअरिंग हाऊसेसकडून डिलिव्हरी, सेटलमेंट, माजिर्न्स आणि सेटलमेंट गॅरंटी फंडाचे व्यवस्थापन यासंबंधीच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जात असतात. क्लिअरिंग हाऊसेसकडून प्रत्येक मेंबर्सच्या माजिर्नबाबत दक्षता पाळली जाते, पे-इन आणि पे-आऊट तारखा पाळल्या जातील, हे पाहिले जाते आणि डिलिव्हरी आणि सौदापूर्तीवर देखरेख ठेवली जाते. 
0 एक्स्चेंजेसवर कोणतेही व्यवहार हे सामान्यत: कसे घडत असतात? 
3 एक्स्चेंजेसवर केल्या जाणार्‍या प्रत्येक व्यवहारासाठी एक ठरावीक प्रारंभिक माजिर्न आकारले जाते, जे प्रत्येक दिवसाअखेरीस ‘मार्क-टू-मार्केट (एमटीएम) प्रक्रियेने नियमित केली जाते. त्यातून पुढे येणारी अतिरिक्त रक्कम ही त्या त्या सदस्याच्या सेटलमेंट खात्यात जमा केली जाते वा वसूल केली जाते. ही पेमेंटची प्रक्रिया एक्स्चेंजच्या क्लिअरिंग बँक्सकडून इलेक्ट्रॉनिक विनिमयाद्वारे पूर्ण केली जाते. 
0 ‘टेंडर पिरियड’ या सं™ोतून कोणता अर्थ अभिप्रेत आहे? 
3 कोणतेही काँट्रॅक्ट हे मुदतपूर्तीच्या नजीक पोहोचताना ‘टेंडर पिरियड’मध्ये प्रवेश करते. या समयी या काँट्रॅक्टमध्ये प्रवेश केलेल्या मेंबरला त्याला डिलिव्हरी घ्यायची वा द्यायची आहे की नाही, हे स्पष्ट करावे लागते. 
0 ‘ड्यू डेट रेट’ काय असतो? 
3 मुदतपूर्तीच्या दिवशी काँट्रॅक्टची सौदापूर्ती ज्या किमतीला होते, तिला ‘ड्यू डेट रेट’ म्हटले जाते. सामान्यत: ही किंमत म्हणजे काँट्रॅक्टच्या मुदतपूर्तीआधीच्या काही दिवसांतील (एक्स्चेंजेसने ठरवून दिलेल्या दिवसांची) त्या कमोडिटीच्या स्पॉट किमतीची सरासरी असते. 
0 काँट्रॅक्टचा कालावधी संपल्यानंतरही जर डिलिव्हरी करण्यात कुचराई केली गेली तर काय होते? 
3 अशी कुचराई झाल्याचे आढळून आल्यास, काँट्रॅक्टमधील विहित कलमांनुसार ड्यू-डेट-रेटच्या काही टक्के इतकी दंडात्मक रक्कम आकारली जाते. 
0 ‘स्प्रेड’चा अर्थ काय? 
3 एका विशिष्ट कमोडिटीच्या दोन वेगवेगळ्या वायदा (फ्युचर्स) काँट्रॅक्ट्समधील किमतीतील तफावतीला ‘स्प्रेड’ म्हटले जाते. फ्युचर्स मार्केट ही सामान्य बाजाराप्रमाणे तसेच उलटी वाटचालही करू शकतात. जर खूप पुढच्या महिन्यातील फ्युचर्स काँट्रॅक्टमधील किंमत ही नजीकच्या महिन्यातील फ्युचर्स काँट्रॅक्टमधील किमतीपेक्षा अधिक असेल तर ही बाजाराची सामान्य वाटचाल आहे म्हणता येईल; पण त्या उलट, ही किंमत जर खूप कमी असेल, तर अशा स्थितीला ‘इन्व्हर्टेड मार्केट’ स्थिती म्हटले जाते. 
0 ‘इंट्रा-कमोडिटी स्प्रेड’ आणि ‘इंटर-कमोडिटी स्प्रेड’ या दोन संज्ञांतील फरक काय? 
3 ‘इंट्रा-कमोडिटी स्प्रेड’ म्हणजे विशिष्ट कमोडिटीतील दोन वेगवेगळ्या फ्युचर्स काँट्रॅक्ट्ससाठी निश्चित केलेल्या किमतीतील तफावत होय, तर ‘इंटर-कमोडिटी स्प्रेड’ म्हणजे एकच मुदतपूर्ती कालावधी असलेल्या दोन वेगवेगळ्या कमोडिटीजच्या फ्युचर्स काँट्रॅक्ट्समधील किमतीतील तफावत होय. 
0 कॅश अँड कॅरी आर्बिट्राज म्हणजे काय? 
3 उधार घेतलेल्या पैशातून प्रत्यक्षात कमोडिटीची खरेदी करणे आणि त्याच वेळी फ्युचर्स काँट्रॅक्टची विक्री करणे याला कॅश अँड कॅरी आर्बिट्राज म्हटले जाते; परंतु यात कमोडिटीची डिलिव्हरी ही काँट्रॅक्टच्या मुदतपूर्तीनंतरच प्राप्त होते. 
0 ही ‘कॅश अँड कॅरी आर्बिट्राज’ची संधी केव्हा प्राप्त होते? 
3 ही संधी तेव्हा प्राप्त होते जेव्हा विशिष्ट कमोडिटीची वायदा किंमत ही त्या समयीची तिची स्पॉट किंमत आणि मुदतपूर्तीच्या काळापर्यंतच्या कॉस्ट ऑफ कॅरी मूल्यापेक्षा खूपच अधिक असते. 
0 रिव्हर्स कॅश अँड कॅरी आर्बिट्राज म्हणजे काय? 
3 एखाद्या कमोडिटीची प्रत्यक्षात विक्री करणे त्यायोगे मिळवलेल्या पैशाची त्याच प्रमाणातील कमोडिटीची खरेदी करण्यासाठी फ्युचर्स काँट्रॅक्टमध्ये गुंतवणूक करण्याला ‘रिव्हर्स कॅश अँड कॅरी आर्बिट्राज’ म्हटले जाते. 
prasadkerkar73@gmail.com

0 Response to "डिलिव्हरी पिरियड माजिर्न म्हणजे काय?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel