-->
स्पेक्युलेटर्स-सट्टेबाज कोण असतात? 
प्रसाद केरकर, मुंबई  Published on 23 Jan-2012 ARTHPRAVA
भविष्यातील भावातील वध-घटीतून नफा कमावण्यासाठी बाजारपेठेत प्रवेश करणार्‍यांना स्पेक्युलेटर्स अर्थात सट्टेबाज म्हटले जाते. सट्टेबाजाला तसे शारीरिक अस्तित्व नसते. हेर्जस ज्या जोखमेला टाळू पाहतात तीच जोखीम सट्टेबाजांसाठी सुसंधी बनते, ज्यायोगे कमोडिटी बाजाराला उलाढालीत आवश्यक असलेली तरलता (लिक्विडिटी) कायम राखली जाते. 
मार्केटमध्ये ‘आर्बिट्राज’चा अर्थ काय? 
एकाच वेळी एका बाजारात खरेदी करून, त्याची दुसर्‍या बाजारपेठेत विक्री करून दोन्हीतील किंमत फरकातून नफा कमावणे म्हणजे ‘आर्बिट्राज’ होय. विविध ठिकाणच्या मागणी-पुरवठय़ाच्या स्थितीनुसार, किमतीचा समतोल प्रत्यक्षात ढळला अथवा ढळेल असा अंदाज आर्बिट्राज व्यवहारात प्रामुख्याने असतो. 
वेअरहाऊस रिसीट्स म्हणजे काय? 
गोदामांमध्ये ठेवल्या जाणार्‍या कमोडिटीज्च्या बदल्यात ती ठेवणार्‍याला गोदामाकडून पावती स्वरूपात दिल्या जाणार्‍या दस्ताला ‘वेअरहाऊस रिसीट्स’ म्हटले जाचे. या दस्ताचे हस्तांतरण साध्या सहीने अथवा प्रत्यक्षात ताबा घेऊन होतो. मूळ ठेवीदार किंवा ताबेदार गोदामातून या कमोडिटीवर विशिष्ट कालावधीत आपला हक्क हे दस्त वा पावती दाखवून मिळवू शकतो. 
कमोडिटीज्मध्ये वायदे व्यवहाराचे फायदे काय? 
कमोडिटीज्मध्ये वायदे व्यवहाराचा मोठा फायदा किंमत जोखीम व्यवस्थापन आणि सुयोग्य किंमत निश्चिती हा आहे. शेतमालातील नको असलेल्या किंमत फेरबदलांपासून शेतकर्‍यांना संरक्षण हवे असते आणि त्यानुसार तो कोणते पीक घ्यावे हे ठरवत असतो. व्यापार्‍यांनाही किंमत जोखीम टाळावयाची असते. प्रक्रियादारांना कच्च्या मालावर होणार्‍या खर्चावर नियंत्रण हवे असते, जेणेकरून उत्पादन खर्च त्याला आटोक्यात ठेवता येईल. वायदे सौद्यांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार्‍यांना किमती स्थिर ठेवता येतात. 
नियमन करणारी वैधानिक चौकट कोणती? 
कमोडिटीज् एक्स्चेंजेसचे नियमन भारत सरकारद्वारे ‘फॉरवर्ड काँट्रॅक्ट्स’ (रेग्युलेसन) अँक्ट, 1952 च्या कायद्यांतर्गत केले जाते. ही नियंत्रणाची भूमिका मुंबई स्थित फॉरवर्ड मार्केट्स कमिशन (एफएमसी)द्वारे निभावली जाते, जे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते. 
या बाजारासंबंधी कोणते नवे बदल अपेक्षित? 
बँका, म्युच्युअल फंड्स आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) या सारख्यांच्या मोठय़ा प्रमाणातील संस्थात्मक सहभागाला परवानगी प्रदीर्घ काळापासून अपेक्षित जात आहे. सामान्य गुंतवणूकदारांचा सहभागही आणखी वाढायला हवा तसेच ऑप्शन्स ट्रेडिंगला सुरुवात होणेही अपेक्षित आहे. 
डीमटेरिअलायझेशन काय? 
कमोडिटीज, रोख्यावरील मालकी दर्शविणार्‍या कागदी दस्तऐवजाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात परावर्तित करण्याची प्रक्रिया म्हणजे डीमटेरिअलायझेशन होय. कमोडिटीज् मार्केटमध्ये या प्रक्रियेसाठी वेअरहाऊस रिसीट्स असणे ही पूर्वअट आहे. व्यवहार कोण करू शकतो? 
शेअर बाजाराप्रमाणेच कमोडिटी एक्स्चेंजसमध्येही सदस्यत्वाची एक खास चौकट असते. एक्स्चेंजसचे हे सदस्य आणि त्यांचे नोंदणीकृत, मान्यताप्राप्त यूर्जस (क्लायन्ट्स) कमोडिटी एक्स्चेंजेसवर व्यवहार करू शकतात. 
सदस्यांचे वेगवेगळे वर्गीकरण कसे केले जाते? 
एमसीएक्सच्या सदस्यांचे वर्गीकरण असे आहे- ट्रेडिंग-कम-क्लिअरिंग मेंबर (टीसीएम), इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग-कम-क्लिअरिंग मेंबर (आयटीसीएम), प्रोफेशनल क्लिअरिंग मेंबर (पीसीएम) आजच्या घडीला एमसीएक्सकडे विविध वर्गवारीत मिळून एकंदर 1000 हून अधिक सदस्य आहेत. अन्य एक्स्चेंजेसमध्येही सदस्यत्वाबाबत याच धाटणीची वर्गवारी असते. 
ट्रेडिंग-कम-क्लिअरिंग मेंबर (टीसीएम) कोण? 
व्यक्ती, कंपनीला कमोडिटी एक्स्चेंजमध्ये ट्रेडिंग-कम-क्लिअरिंग मेंबर (टीसीएम) म्हणून मान्यता मिळवता येते, ज्याला व्यवहार करण्याचे तसेच कमोडिटी एक्स्चेंजच्या क्लिअरिंग हाऊसद्वारे क्लिअरिंगचा अधिकार प्राप्त होतो. सदस्यांना स्वत:साठी (प्रोप्रायटरी पोझिशन्स) व्यवहार करता येईलच, त्या व्यतिरिक्त तो त्याच्या नोंदणीकृत/ मान्यताप्राप्त/ प्राधिकृत यूर्जससाठी ट्रेडिंग करू शकेल व सौद्याचे सेटलमेंट व क्लिअरन्स करू शकेल. 
prasadkerkar73@gmail.com 

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel