-->
‘डिलिस्टिंग’: मंदीत नफ्याची मोठी संधी

‘डिलिस्टिंग’: मंदीत नफ्याची मोठी संधी

‘डिलिस्टिंग’: मंदीत नफ्याची मोठी संधी

 (31/01/12) BUSINESS PAGE NEWS

 शेअर बाजारात नोंद असलेल्या सुमारे दोन डझनभर कंपन्यांनी ‘डिलिस्टिंग’चा मार्ग चोखाळल्याने सध्याच्या मंदीच्या वातावरणातही गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा आपल्या पदरी पाडून घेता येणार आहे.  प्रामुख्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील उपकंपन्यांनी आपली शेअर बाजारातील नोंदणी रद्द करण्याचे धोरण अवलंबल्याने बाजारमूल्यापेक्षा जास्त मूल्य देऊन या कंपन्या गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी करीत आहेत.  
यात सर्वात मोठा फायदा हा लहान गुंतवणूकदारांचा आहे; कारण अनेक कंपन्या बाजारभावापेक्षा पंधरा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत जास्त दर देत आहेत. सध्या बाजारात असलेली मंदीमुळे अनेक चांगल्या कंपन्यांचे समभाग घसरणीला लागले आहेत. अशा स्थितीत समभागांवर एवढा चांगला दर मिळणे म्हणजे गुंतवणूकदारांसाठी नफा ‘बुक’ करण्याचे एक चांगले साधन ठरावे. सरकारने आता नोंद असलेल्या कंपन्यांना किमान भांडवलापैकी किमान 25 टक्के समभाग जनतेकडे ठेवण्याचे बंधन ठेवल्याने अनेक कंपन्यांना ही अट जाचक वाटते. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील उपकंपन्यांचे समभाग शेअर बाजारात नाममात्र म्हणजे दहा टक्केच जनतेकडे उपलब्ध आहेत. बाजारातील समभाग कमी उपलब्ध असल्याने या समभागात मोठ्या प्रमाणावर सट्टाही चालतो तसेच अनेकदा या समभागांना तरलता नसते. अनेक कंपन्या केवळ 10 ते 15 टक्के समभागच जनतेला विकणे पसंत करतात. जनतेला जास्त समभाग विकण्यापेक्षा अनेक कंपन्यांनी ‘डिलिस्टिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांना उलट फायदाच होणार आहे. शेअर बाजारात नोंदणी नसल्याने त्यांना कोणतेही ‘कॉर्पोरेट’ निर्णय घेणे सोपे जाते. तसेच ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’चे नियम लागू होत नाहीत.  
सध्या ‘डिलिस्टिंग’साठी इच्छुक असलेल्या कंपन्या व कंसात त्यांच्या प्रवर्तकांच्या भांडवली वाट्याची टक्केवारी दिली आहे- अ‍ॅस्टाझेन्का फार्मा (90 टक्के), फ्रेस काबी (90), जिलेट इंडिया (88.76), केनामेटल इंडिया (88.16), फेअरफिल्ड अ‍ॅटलास (83.91), वॉर्नर टी (83.51), इनोस एबीएस (83.33), हनिवेल आॅटो (81.24), ब्ल्यू डार्ट (81.03), ओरॅकल फिन (80.39), टिमकिन इंडिया (80.02), सिंगर इंडिया (78.9), थॉमस कूक (77.11), नोव्हेटिस (76.42), थ्री एम इंडिया (76) या कंपन्यांचा यात समावेश आहे. याशिवाय कॅरोल इन्फो, अल्फा लाव्हल, पटणी कॉम्प्युटर्स, एक्स डी इंडिया या कंपन्यांनी नोंदणी रद्द करण्याची घोषणा यापूर्वी केलीच आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे ?
कंपन्यांची ही आॅफर अनेकदा गुंतवणूकदारांसाठी आकर्षक असली तरी ती स्वीकारावी का, असा प्रश्न अनेकदा गुंतवणूकदारांच्या मनात असतो. अनेकदा नोंदणी रद्द होणार या बातमीमुळे त्या कंपनीचे समभाग वधारूलागतात आणि कंपनीच्या आॅफर किमतीपेक्षा बाजारातील किंमत जास्त होते. अशा वेळी गुंतवणूकदारांनी काय करावे ? गुंतवणूक सल्लागार व दलाल अँड ब्रोचा या नामवंत शेअर दलाल कंपनीच्या उपदलाल शर्मिला कर्वे यांच्या सांगण्यानुसार, चांगली किंमत आल्यास गुंतवणूकदारांनी समभाग कंपनीला विकण्यास काहीच हरकत नाही. अगदी हे समभाग ‘डिलिस्ट’ झाले तरी पुढील सहा महिन्यांत कंपनी गुंतवणूकदारांना पुन्हा एखादी आॅफर देऊ करते. ही आॅफर कदाचित गेल्या वेळेपेक्षा जास्त चांगली असण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान गुंतवणूकदारांचा विचार करता ‘डिलिस्टिंग’ ही नफा कमावण्याची चांगली संधी ठरते.

0 Response to "‘डिलिस्टिंग’: मंदीत नफ्याची मोठी संधी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel