सौदी राजपुत्राची 30 कोटी डॉलरची गुंतवणूक

प्रसाद केरकर, मुंबई Published on 31 Dec-2011 PRATIMA
सौदी अरेबियाचे राजपुत्र वाहीद बिन तलाल यांनी गेल्याच आठवड्यात ट्विटरमध्ये 30 कोटी डॉलर (भारतीय रुपयांत सुमारे 1500 कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची घोषणा केली आणि जगातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. या सौदी राजकुमारची जगातील अनेक आघाडीच्या कंपन्यांत अब्जावधींची गुंतवणूक आहे. तेलातून कमावलेला पैसा कसा खर्च करायचा, असा प्रश्न असलेल्या या राजपुत्राने मात्र आपल्याकडील निधीचे योग्य नियोजन करून गुंतवणूक केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक ही अमेरिकन कंपन्यांत आहे. अशा प्रकारे जगभरात आपली अवाढव्य गुंतवणूक करणारे हे सौदी राजपुत्र आहेत तरी कोण? जन्मजात सोन्याचा (किंवा त्याहून महाग असलेला कोणत्याही धातूचा) चमचा तोंडात घेऊन आलेले सौदी राजपुत्र वाहीद बिन तलाल यांचा जन्म सौदी अरेबियातला असला तरी त्यांचे सर्व उच्च शिक्षण अमेरिकेतच झाले. किंगडम होल्डिंग कॉर्पोरेशन ही त्यांची गुंतवणूक कंपनी असून या कंपनीच्या मार्फत ते जगभरातील आपली सर्व गुंतवणूक करतात. अशा प्रकारे जगभरातील अनेक कंपन्यांत अब्जावधी रुपयांची गुंतवणूक असलेल्या किंगडम होल्डिंग या कंपनीची 2007 मध्ये सौदीतील शेअर बाजारात नोंद करण्यात आली. या राजपुत्राचा जन्म 1955 मध्ये राजघराण्यात झाला.
सौदी अरेबियाचे संस्थापक आणि पहिले राज्यकर्ते अब्दुल अझिज अल्सूद हे त्यांचे आजोबा. 1979 मध्ये त्यांनी कॉलिफरेनियाच्या मेलेनो महाविद्यालयातून प्रशासनातील पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी 1985 मध्ये न्यूयॉर्कमधील विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. शैक्षणिक अभ्यासात अतिशय तल्लख असलेल्या वाहीद बिन तलाल यांना जवळजवळ जगभरातील 14 विद्यापाठांनी डॉक्टरेट प्रदान केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते 1985 मध्ये सौदीत परतले आणि सर्वात प्रथम त्यांनी आपल्या व्यवसायात लक्ष घालावयास सुरुवात केली. किंगडम होल्डिंग ही कंपनी त्यांनी त्याचदरम्यान स्थापन केली. ही कंपनी प्रामुख्याने व्यापार करीत असताना विविध कंपन्यांत गुंतवणूक करण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीला पहिले काम मिळाले ते रियाध येथील लष्कराच्या एका क्लबची उभारणी करण्याचे. सुरुवातीचे कंत्राट अतिशय छोटे असले तरी पुढे त्यांनी रियाधमध्ये अनेक कामे हाती घेतली आणि ही कंपनी झपाट्याने वाढू लागली. सौदीच्या राजपुत्राचीच कंपनी असल्यामुळे या कंपनीच्या वाढीला कधी निर्बंध आले नाहीत. 1988 मध्ये त्यांनी आजारी असलेली युनायटेड सौदी कर्मशियल बँक ताब्यात घेतली. केवळ एका वर्षाच्या आत ही बँक नफ्यात आणून दाखवली. त्यानंतर या बँकेचा समभाग पंचवीस पटीने वधारला. त्यानंतर त्यांनी अशीच आणखी एक आजारी असलेली सौदी कैरो बँक ताब्यात घेतली आणि युनायटेड सौदी कर्मशियल बँकेत विलीन केली. त्यानंतर त्यांनी सौदी अमेरिकन बँक ताब्यात घेतली. 1999 मध्ये ही बँकदेखील युनायटेड सौदी बँकेत विलीन केली. 1991 मध्ये अमेरिकन बहुराष्ट्रीय बँक- सिटी बँक आर्थिक पेचात अडकली असताना त्यातील मोठे भांडवल खरेदी केले आणि या बँकेला अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले. आजही या बँकेत सर्वाधिक व्यक्तिगत भांडवल असलेल्यांच्या यादीत हा सौदी राजपुत्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ त्यांची गुंतवणूक अँपल, वॉल्ट डिन्से, टाइम वॉर्नर, न्यूज कॉर्प, युरो डिस्ने, पेप्सी, मोटोरोला, प्रॉक्टर अँड गॅम्बल या आघाडीच्या कंपन्यांत आहे. भारतात त्यांची अजून तरी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक नसली तरी भविष्यात ते भारतीय कंपन्यांना ‘टार्गेट’ करू शकतात.
Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "सौदी राजपुत्राची 30 कोटी डॉलरची गुंतवणूक"
टिप्पणी पोस्ट करा