-->
टीकेकडे लक्ष द्या...

टीकेकडे लक्ष द्या...

मंगळवार दि. 28 जानेवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
टीकेकडे लक्ष द्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला हिंदू राष्ट्र बनवित असून भारतीय लोकशाहीला त्यांच्याकडून धोका आहे, असे स्पष्ट मत लंडनहून प्रकाशित होणार्‍या द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकातील लेखात व्यक्त केले आहे. अर्थात ही टीका जर देशातील विरोधी पक्षांनी केली असती तर त्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नसते परंतु द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकाने केल्याने त्याची दखल गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हे साप्ताहिक जगभरातील घडामोडींवर तटस्थपणे व परखडपणे भाष्य करीत असते. 1843 सालापासून नियमीत प्रकाशित होणारे हे साप्ताहिक जगात वितरीत होते. सुमारे आठ लाखांच्यावर त्यांच्या प्रति जगात वितरीत होत असतात. जगातील उद्योजक, सामाजिक अभ्यासक, अभ्यासू राजकारणी, पत्रकार, अर्थतज्ज्ञ व जाणकार याचे ग्राहक असून इकॉनॉमिस्ट एखाद्या घटनेबाबत कोणती भूमिका घेते त्याकडे जगाचे लक्ष लागलेले असते. खरे तर एकॉनॉमिस्टने एकदा का एखादी राजकीय, आर्थिक विषयी भूमिका घेतली ती त्याचे त्याच अंगाने जगात पडसाद उमटत असतात. त्यादृष्टीने त्यांनी सध्याच्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर केलेली टीका ही सरकारच्या डोळ्यात अंजण घालणारी ठरणारी आहे. परंतु आपल्या देशातील भाजपाचे सत्ताधारी नेते, मोदी-शहा याचा किती गांभीर्याने विचार करतील हे पहावे लागेल. इकॉनॉमिस्टने मोदींवर कव्हर स्टोरी करण्याची ही काही पहिली वेळ नाही. मोदी सत्तेत आल्यापासून आजवर इकॉनॉमिस्टने त्यांना वाहिलेले सहा अंक प्रकाशित केले आहेत. या सर्वच अंकातील लेखांमध्ये ते मोदींचे कधी समर्थक असल्याचे दिसत नाहीत. मात्र काही बाबतीत त्यांनी खूप सावध भूमिका घेतलेली होती. मोदींचे समर्थन या साप्ताहिकाने कधीही केले नसले तरी मोदी भारतीय अर्थकारणात फार मोठे योगदान देऊ शकतील याबाबत ते आशावादी होते. एका अंकात त्यांनी मोदींना स्टॉँगमॅन असे देखील संबोधले होते. मात्र गेल्या सहा वर्षात त्यांची संपादकीय भूमिका बदलत आता मोदींमुळे देशात रक्तपात होईल असे भविष्य वर्तविण्यापर्यंत पोहोचली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे दाओस येथे भरलेल्य जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर हा लेख प्रसिध्द झाल्याने भारताविषयी अनेक उद्योजक, गुंतवणूकदार साशंक होण्याची शक्यता आहे. याचा देशातील विदेशी गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच दाओस येथील परिषदेत उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी देखील मोदींच्या राजकारणावर कडाडून हल्ला केला आहे. भारतातील वाढत्या हिंदू राष्ट्रवादाबाबत ते म्हणाले की, आज भारतापुढे हिंदू राष्ट्राचा मोठा धोका निर्माण झाला आहे. लोकशाही पद्दतीने निवडून आलेले मोदी भारताला हिंदू राष्ट्र बनवू पाहात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काश्मीरवर निर्बंध लादले गेले आहेत. कोट्यावधी मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व हिरावण्याची भीती दाखवित आहेत. जॉर्ज सोरोस यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे जगातील गुंतवणूकदार सावध झाले आहेत. इकॉनॉमिस्टने या ताज्या अंकात मोदी व भारतीय राजकारण यावर तीन स्वतंत्र लेख लिहिले आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या प्रश्‍नांची हाताळणी, आर्थिक सुधारणा राबवितानाचे प्रश्‍न तसेच आर्थिक मंदी हाताळण्यासंबंधी सरकारची अर्कायक्षमता हे तीन विषय या एकाच अंकात हाताळण्यात आले आहेत. या तिनही लेखात मोदी सरकारच्या धोरणांवर काडाडून हल्ला चढविण्यात आला आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी ही अनेक दशकापासून सुरु असलेल्या चिथावणीसदृश्य प्रकल्पाच्या दृष्टीने टाकलेले हे एक महत्वाकांक्षी पाऊल आहे असे या लेखात म्हणून सुमारे 20 कोटी मुस्लिम समुदाय सध्या भीतीच्या छायेखाली आहे अशी टीपणी केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला मिळालेले हे अमृततुल्य यश हे कदाचित भारतासाठी राजकीय विष ठरणार आहे. भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष तत्वांना तिलांजली देऊन मोदी सध्या राबवित असलेल्या योजनांमुळे अनेक वर्षापासून भारतात नांदणार्‍या लोकशाहीस धोका निर्माण करीत आहेत, असे परखड मत यात व्यक्त करण्यात आले आहे. राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष तत्त्वांची पायमल्ली करणार्‍या मोदींच्या नव्या योजना कित्येक दशके रूजलेल्या भारतीय लोकशाहीसाठी घातक आहेत. प्रादेशिक आणि राष्ट्रीय ओळखीवरून भेद निर्माण करून, मुस्लिमांना सातत्याने दुखावून भाजपने आपल्या हिंदुत्ववादी समर्थकांना सातत्याने चिथावत ठेवले आहे आणि अर्थव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवरून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविले आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवहीमुळे भाजपची भेदनीती अधिक बळकट होईल. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालणारी असल्यामुळे सतत नवनवी आव्हाने समोर येत राहतील, असेही लेखात म्हटले आहे. मोदींच्या धोरणावर कडाडून टीका करणारा हा लेख मोदी-शहा जोडीच्या हिंदुत्ववादी धोरणाचे वाभाडे काढणारा तर आहेच तसेच देशापुढील संभाव्य धोके सांगणार आहे. इकॉनॉमिस्टचा हा लेख देशाच्या राजकारण व अर्थकारणावर दीर्घकालीन परिणाम करणारा ठरणार आहे. कारण या टीकेमुळे आपल्याकडे कुणी विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास पुढे धजावणार नाही. त्यामुळे रोजगार निर्मीतीला खो बसणार आहे. सध्या जे मंदीचे वातावरण आहे ते दूर होण्यास त्यामुळे काही मदत होणार नाही. त्यामुळे या लेखाचा नरेंद्र मोदींनी विचार करुन आपल्या धोरणात बदल करावयास हवा. परंतु त्यांचा स्वभाव पाहता ते काही आपले धोरण बदलतील असे दिसत नाही.
--------------------------------------------------------------------

1 Response to "टीकेकडे लक्ष द्या..."

  1. Love captions for Whatsapp & Fb. fb caption & 2 line love status in english, Today We are Sharing top love caption for whatsapp status. Dpcaption
    Love Caption For Girlfriend. A love Caption is always a good idea to remind your girlfriend how much you care about her. Girl friendship quotes. Dpcaption
    Romantic love Caption for instagram.Here are some couple Instagram captions for that cute selfie. short love captions or love captions for him. Dpcaption
    Love Captions For BoyFriend
    Best Love Captions for Whatsapp & Fb
    Love Captions For GirlFriend
    Love Captions For Lover

    You stole my heart, but I’ll let you keep it.
    When we’re together, hours feel like seconds. When we’re apart, days feel like years.
    Every love story is beautiful, but ours is my favorite.

    उत्तर द्याहटवा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel