-->
भूजल पातळी खालावली

भूजल पातळी खालावली

गुरुवार दि. 13 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
भूजल पातळी खालावली
गेले काही दिवस तापमानात वाढ होत असून उन्हाचा कडाका जाणवत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळा वाढलेला आहे. दरवर्षी मराठवाडा, विदर्भात उन्हाळा कडक अशतो. मात्र यावेळी या दोन विभागांबरोबरच मुंबई व परिसरातील भागातही तापमानाने 48 अंशांवर भरारी घेतली आहे. रायगड जिल्ह्यातीव भिरा या गावी तर देशातील सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. त्यामुळे एकूणच तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. याची नेमकी कारणे शोधण्याची जबाबदारी दवामान शास्त्रज्ञांवर आहे. मात्र याचा मोठा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे. फेब्रुवारीअखेर राज्यातील 166 तालुक्यांमधील 3 हजार 496 गावांमध्ये भूजल पातळी एक मीटरपेक्षा अधिक खालावली आहे. यापैकी पावसाळ्यात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस पडलेल्या 841 गावांमध्ये यंदा तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण यंत्रणेने वर्तविली आहे. राज्यात झालेल्या पावसाचे प्रमाण आणि त्या तुलनेत प्रत्यक्ष निरीक्षणे घेऊन कमी झालेली भूजल पातळी यांचा तुलनात्मक अभ्यास करून उन्हाळ्यात भासणार्‍या संभाव्य टंचाईची माहिती भूजल सर्वेक्षण विभागातर्फे देण्यात येते. राज्यातील 365 तालुक्यांपैकी 166 तालुक्यांमधील तीन हजार 496 गावांच्या भूजल पातळीत एक मीटरपेक्षा अधिक घट झाली आहे. यापैकी 306 गावांमध्ये भूजल पातळी तीन मीटरपेक्षा अधिक खालावली आहे. तर 681 गावांमध्ये भूजल दोन ते तीन मीटरने आणि दोन हजार 509 गावांमध्ये भूजलाची पातळी एक ते दोन मीटरने कमी झाल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्यात 20 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या 30 तालुक्यांमधील 841 गावांमध्ये पाणीपातळी एक मीटरपेक्षा अधिक खालावली असून तेथे टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. एप्रिल महिन्यापासून टंचाई तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. सरासरीच्या तुलनेत 0 ते 20 टक्क्यांपर्यंत कमी पर्जन्यमान झालेल्या 52 तालुक्यांतील 1408 गावांमध्ये, तर सरासरीएवढा किंवा अधिक पाऊस पडलेल्या 84 तालुक्यांतील 1247 गावांमध्ये पाणीपातळीत एक मीटरपेक्षा अधिक घट झाली आहे. गतवर्षी राज्यातील 285 तालुक्यांतील 15 हजार 960 गावांमध्ये भूजल पातळी खालावली होती. यात चार हजार 28 गावांमध्ये पाणीपातळी तीन मीटरपेक्षा अधिक, तर तीन हजार 953 गावांमध्ये दोन ते तीन मीटरने, आणि सात हजार 179 गावांमध्ये पाणी पातळी एक ते दोन मीटरने कमी होती. यंदा केवळ 3496 गावांमधील पाणीपातळी कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. रायगड 96, पालघर 7, नाशिक 72, धुळे 459, जळगाव 314, नगर 154, नंदुरबार 116, पुणे 33, सोलापूर 281, कोल्हापूर 3, सांगली 222, सातारा 62, औरंगाबाद 350, बीड 3, जालना 47, परभणी 17, नांदेड 49, हिंगोली 280, अमरावती 209, अकोला 103, यवतमाळ 13, बुलडाणा 1, वाशीम 3, नागपूर 132, भंडारा 113, वर्धा 275, चंद्रपूर 5, गडचिरोली 2, गोंदिया 74, अशी ही जिल्हानिहाय गावांची संख्या आहे. यंदा पावसाळा चांगला असल्यामुळे गावांची स्ख्या तरी कमी आहे. जर पावसाळा चांगला नसता तर पाण्याची पातळी खालावलेल्या गावांची संख्या आणखी वाढली असती.

0 Response to "भूजल पातळी खालावली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel