-->
सूर्यावर स्वारी

सूर्यावर स्वारी

मंगळवार दि. 6 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
सूर्यावर स्वारी
सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी पार्कर सोलर प्रोब हे अंतराळ यान पुढील वर्षी 31 जुलै नासा अंतराळात सोडणार आहे. अशा प्रकारे थेट सूर्याच्या जवळ जाणारे हे पहिलेच यान असेल. ही मोहीम एकूण सात वर्षांची असून, ती 2025 मध्ये संपेल. हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून 40 लाख मैल एवढे जवळ जाईल. 2,550 फॅरेनहीट एवढ्या प्रचंड उष्णतेमध्ये हे यान ताशी 4.30 लाख किमी वेगाने सूर्याच्या 24 प्रदक्षिणा करत आपल्या सूर्यमालेतील या तार्‍याच्या वातावरणाचा अभ्यास करेल. सुमारे 10 फूट उंचीचे हे यान वितळून जाऊ नये यासाठी बाह्यभागावर एका विशिष्ट कार्बनी संयुगाचा पाच इंच जाडीचा मुलामा केलेला असेल. नासाने याआधी पाठविलेल्या काही यानांनी याहूनही दूरवरचा प्रवास केलेला आहे. सन 2015 मध्ये प्ल्युटो ग्रहाच्या जवळून गेलेले दि न्यू होरायझन प्रोब या यानाने आत्तापर्यंत 3.5 अब्ज मैलांचा प्रवास केला असून ते अद्याप थांबलेले नाही. त्याआधी 1977 मध्ये व्हॉयेजर-1 हे यान 11.7 अब्ज मैलांचा प्रवास करून आपल्या सूर्यमालेच्या पार बाहेर निघून गेले. मात्र पार्कर सोलर प्रोब या यानाची कामगिरी या सर्वांहून मोलाची ठरेल. सूर्य हा संपूर्ण ग्रहमालेचा केंद्रबिंदू आणि ऊर्जेचा स्रोत असल्याने त्याची रचना, तेथील वातावरण, तेथे होणार्‍या रासायनिक प्रक्रिया या सर्वांच्या अभ्यासातून मिळणारी माहिती ग्रहमालेच्या उत्पत्तीच्या आणि भविष्याच्याही वेध घेण्यासाठी बहुमोल ठरणार आहे. थेट सूर्यावर यान उतरविणे शक्य नसल्याने त्याच्या शक्य तेवढया जवळ जाऊन हे यान पहाणी करेल. संपूर्ण ग्रहमालेस व्यापून टाकणार्‍या सौरवार्‍यांचा वैज्ञानिक सिद्धान्त 60 वर्षांपूर्वी मांडून त्याचा पाठपुरावा करणारे थोर खगोलभौतिकी शास्त्रज्ञ प्रा. युजिन पार्कर यांच्या सन्मानार्थ हे नामकरण करण्यात आले आहे. नासाने त्यांच्या कोणत्याही अंतराळ यानास कोणाही जिवंत व्यक्तीचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे. नासाने ही घोषणा केली तेव्हा 90 वर्षांचे प्रा. पार्कर एखाद्या तरुणासही लाजवेल अशा उत्साहाने हजर होते. माणसाची आपल्या ग्रहमालिकेचा शोध घेण्याची इच्छा ही अतिशय तीव्र आहे. आतातर या मालिकेचा पितृ ग्रहावर त्याचे चाल केली आहे. माणसाचा हा प्रयत्न म्हणजे नवनवीन शोधांचा ध्याय घेऊन काम करण्याचा प्रकार आहे. यात त्यांच्या संशोधनाला यश लाभो हीच सदिच्छा.
-------------------------------------------------

0 Response to "सूर्यावर स्वारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel