-->
मेड इन इंडिया-मेट्रो

मेड इन इंडिया-मेट्रो

शनिवार दि. 15 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
मेड इन इंडिया-मेट्रो
ऑस्ट्रेलियामध्ये लवकरच मेड इन इंडिया लिहिलेल्या म्हणजेच भारतात उत्पादित झालेल्या मेट्रो धावणार आहेत. ऑट्रेलियातील या मेट्रोसोबत मध्यपूर्वेती देश आणि आशियातील अन्य देशामध्येही भारतात तयार झालेल्या मेट्रो आता धावू लागतील. भारतात कारखाना उभारून मेट्रोची बांधणी करणार्‍या अलस्टोम आणि बंबार्डियर इंकने आता भारतातूनच दुसर्‍या देशांमध्ये मेट्रोची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील शहरी वाहतुकीच्या वाढत्या बाजार विचारात घेऊन फ्रान्स आणि कॅनडातील बहुराष्ट्रीय  कंपन्यांनी  2008 ते 2010च्या दरम्यान भारतात आपल्या उप्तादनाला सुरुवात केली होती. आता या कंपन्या बाहेरच्या देशातून मिळत असलेल्या मेट्रोच्य कंत्राटांची पूर्तता भारतातूनच करणार आहेत. त्यामुळे भारतात तयार झालेल्या या मेट्रोंची निर्यात केली जाणार आहे. अलस्टोम आणि बंम्बार्डियर येथील अभियंते आणि स्वस्तात उपलब्ध असलेल्या श्रमिकांचा उपयोग फोर्ड आणि ह्युंडाई मोटर्स या कंपन्यांसारखा करू इच्छित आहेत. ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये कंपनीचा पहिला प्रकल्प असेल. येथूनच मेट्रोचे कोच सिडनीला पाठविले जाणार आहेत.  ही कंपनी दक्षिण भारातील आपल्या कारखान्यामधून उत्पादन करुन हे कंत्राट पूर्ण करील. ऑस्ट्रेलियासोबतच मध्यपूर्व आणि दक्षिणपूर्व आशियवरही या कंपन्यांचे लक्ष आहे. आपल्याकडे खुद्द तीस लाखाहून जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विणण्यात येणार आहे. मोठ्या शहरात मेट्रो ही काळाची गरज ठरली आहे. दिल्ली व कोलकाता या शहरात मेट्रोची सुरुवात झाली व अन्य शहरांनाही मेट्रोचे वेध लागले. दीर्घकालीन भारताची गरज लक्षात घेऊन या विदेशी कंपन्यांनी भारतात मेट्रोचे उत्पादन सुरु केले. भारतातील मेट्रोची उभारणी केली जात असताना ही कंपनी विदेशातही त्याची निर्यात करणार आहे. यामुळे आपल्या देशाच्या शिरोपात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to "मेड इन इंडिया-मेट्रो"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel