-->
कर्नाटकातील घोडेबाजार

कर्नाटकातील घोडेबाजार

मंगळवार दि. 09 जुलै 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
कर्नाटकातील घोडेबाजार
भाजपाने ठरवून कर्नाटकातील आघाडी सरकार संकटात आणले आहे. कर्नाटकातील सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्यासाठी भाजपाने ऑपरेशन कमळ सुरु केले होते. परंतु त्यात त्यांना फारसे यश येत नव्हते. आता मात्र केंद्रात पुन्हा एकदा भाजपाच्या सरकारला बहुमत मिळाल्यावर कर्नाटकातील घोडेबाजार जोरात सुरु झाला आहे. कर्नाटकातील काँग्रेस व जनता दलाच्या 13 आमदारांनी राजीनामा दिल्याने कुमारस्वामी सरकार अडचणीत आले आहे. कुमारस्वाही हे अमेरिकेत गेले असताना येते फोडफोडीचा खेळ सुरु झाला होता. नजिकच्या काळात भाजापाच्या फोडोफोडीच्या खेळी यशस्वी होऊन तेते भाजपाचे सरकार सत्तेत आल्यास आश्‍चर्य वाटू नये. तेथे भाजपा मोठा पक्ष असला तरी भाजपाला स्पष्ट बहुमत नव्हते. कॉँग्रेसने कुमारस्वामींना मुख्यमंत्री करुन काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल यांचे आघाडी सरकार अस्तित्वात आणले. पण या सरकारचा पाया भक्कम नव्हता. स्थापन झाल्यापासूनच ते कोसळणार अशी भाकिते केली जात होती. अपेक्षेनुसार सरकार अडचणीत आले आहे. 13 राजीनाम्यापैकी 11 राजीनामे विधानसभाध्यक्षांकडे पोहोचले आहेत. कर्नाटक विधानसभेची सदस्य संख्या 224 आहे. भाजपाकडे 105 संख्याबळ आहे. आता 13 जणांनी राजीनामे दिल्याने सदस्य संख्या 211 झाली आहे आणि बहुमतांसाठी 106 संख्या जादूई ठरणार आहे. भाजपानेच पुढाकार घेऊन 13 जमांना राजीनामा देण्यास ासंगितले आहे. कुमारस्वामी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अवघे 34 सदस्य असताना मुख्यमंत्री झाले होते आणि पहिल्या दिवसापासून हे सरकार ते रडत खडत चालवत होते. कर्नाटकातील हे सरकार स्थापन होत असताना लोकसभा निवडणुका हाकेच्या अंतरावर होत्या. अशा स्थितीत  शरद पवार, सोनिया गांधी, मायावती, ममता वगैरे मंडळींना भाजपा विरोधात लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण करण्यासाठी हे सरकार फार महत्वाचे वाटत होते. अनेक पक्षांची आघाडी केली आणि भाजपानेही शर्थीचे प्रयत्न केले होते पण, त्यांचे प्रयत्न फसले आणि काँग्रेस-जनता दलाचेे सरकार सत्तारुढ झाले. लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांचे केंद्रात स्थापन होण्याचे स्वप्न संपुष्टात आल्यावर आता भाजपाकडून कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. महाराष्ट्रातील एका भाजपा नेत्यावर या संबंधात जबाबदारी सोपवण्यात आल्याची व काँग्रेसचे काही आमदार या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. ऑपरेशन कमळची बरेच दिवस चर्चा सुरु होती. आता ऑपरेशन कमळ दृष्टीपथात आल्याचे दिसू लागले आहे. काँग्रेसचे संकटमोचक ज्येष्ठ मंत्री डी. के. शिवकुमार सरकार वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तसे पाहता काँग्रेसमध्ये जसे नाराज आहेत तसे भाजपामध्येही नाराज आहेत. त्यातूनच एकूणच सत्ता बळकाविण्यासाठी भाजपाकडून घोडेबाजारचा खेळ सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपाची सत्ता आली आणि कर्नाटकात 28 पैकी 26 जागा भाजपाने जिंकल्या. यानंतर काँग्रेसमधील आमदारांची चलबिचल वाढली होती. विधानसभेवर भाजपाचा भगवा फडकला की हे आमदार पुन्हा भाजपा तिकीटावर उभारतील व पैशाचा राशी ओतून विजयी होतील अशी भाजपाची खेळी आहे. मात्र जनतेच्या न्यायालयात काही खरे नसते. भल्याभल्यांचे पराभव झालेले आहेत. त्यामुळे शतप्रतिशत भाजपाचेच हे उमेदवार विजयी होतील हे ठामपणाने सांगता येत नाही. आज ऑपरेशन कमळ या नावाने जे ऑपरेशन सुरु आहे त्यानेे राजकारणाची पातळी किती घसरली आहे ते स्पष्टपणे दिसते. या पाडापाडीचा केंद्रबिंदू मुंबईत आहे. अर्थात आज जे भाजपा करीत आहे ते यापूर्वी कॉँग्रेसने अनेकदा सत्तेत असताना केले आहे. विरोधकांची सरकार पाडण्यात कॉँग्रेसने अशाच कारवाया केल्या होत्या. आज तेच राजकारण भाजपा करीत आहे. आपण कॉँग्रेसपेक्षा वेगळे आहोत असे सांगणार्‍या भाजपात कॉँग्रसेपेक्षा काहीच फरक नाही हेच यावरुन दिसते. कर्नाटक भाजपाचे अध्यक्ष येडियुराप्पा कर्नाटकात भाजपाची सत्ता स्थापन करण्यासाठी, मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दरम्यान अजून पूलाखालून बरेच पाणी बाहून जायचे आहे. सत्तारुढ आघाडीची आमदार संख्या 103 आणि भाजपाची सदस्य संख्या 105 झाल्याने विधानसौधवर भाजपाचा भगवा फडकवण्याचा मार्ग मोकळा झाला अशा अंदाजात भाजपा आहे. दुर्दैवाचा भाग म्हणजे, काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा घोळ अजून मिटलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या दारूण पराभवातून पक्ष अजूनही सावरलेला नाही. काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी के. सी. वेणूगोपाळराव या सा़र्‍याा घटना घडताना अंधारात आहेत. कॉँग्रेसला सध्या नेतृत्वच नसल्याने कोण निर्णय घेणार अशी स्थिती आहे. त्यातच भाजपाने ऑपरेशन कमळ यशस्वी करण्याचा चंग बांधला आहे. भाजपाकडे हुकमाची सारी पाने आहेत. त्यामुळे ऑपरेशन कमळ यशस्वी झाल्यास आश्‍चर्य नाही. कर्नाटकातील व देशातील जनतेला कर्नाटकी राजकीय नौटंकी बघायला मिळणार आहे. कर्नाटकातही भगवा फडकणार असे दिसते आहे. भाजपा येथील सत्ता कमाविल्या आनंद मिळवेल मात्र येते राजकीय नैतिकता रसातळाला पोहोचल्याचे या देशातील मतदाराला पहावे लागणार आहे.
----------------------------------------------------------------------------

0 Response to "कर्नाटकातील घोडेबाजार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel