-->
बहुजनांचे राजकारण

बहुजनांचे राजकारण

रविवार दि. 17 जून 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
बहुजनांचे राजकारण
---------------------------------------------
एन्ट्रो- छगन भुजबळांच्या रूपाने त्यांना फक्त महाराष्ट्रातच, नव्हे तर संपूर्ण देशामधील इतर मागासवर्गीयांची मते एकत्र करणारा नेता मिळाला आहे. धनंजय मुंढे हे त्याखालोखालचे बहुजनांचे नेतृत्व ठरु शकते. एवढा मोठा तुरुंगवास भोगून आलेल्या भुजबळांचीही आता एकट्याने लढण्याची उमेद संपली असावी. साहजिकच महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाबरोबरच इतर मागासवर्गीय मतदारही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर रहावा यासाठीची धडपड एवढाच या सगळ्याचा अर्थ मर्यादित नाही. राजकारणाच्या अंकगणितामध्ये पुणेरी पगडीचा बळी देऊन फुले पगडीचा पुरस्कार करणे हेच बहुधा बेरजेचे राजकारण ठरेल, असा पवारांचा होरा आहे.
-----------------------------------------
निवडणुका आता जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसा वातावरणातही आता फरक पडू लागला आहे. प्रत्येक राजकारण्यांची व राजकीय पक्षाची बॉडी लँग्वेज आता बदलू लागली आहे. भाजपा व शिवसेना कितीही भांडले तरीही शेवटी एकत्र येणार आहेत. अगदी निवडणुकात जरी परस्पर विरोधात लढले तरी नंतर सत्तेसाठी तरी एकत्र येतात असा आजवरचा अनुभव आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसने देखील आपले धोरण कसे असेल याची झलक नुकतीच दिली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे अत्यंत धुर्त राजकारणी आहेत व सत्तेच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला बहुजनांचे राजकारण करण्याची आवश्यकता आहे हे बरोबर ओळखले आहे. त्यादृष्टीने त्यांनी आत्तापासूनच पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विसावा वर्धापनदिन साजरा करतानाच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी, पक्षाच्या व्यासपीठावरून पुणेरी पगडी नाही, तर महात्मा फुले परिधान करीत असलेली पगडीच वापरण्याचा संदेश दिला आहे. एवढेच नव्हे तर बहुजनांचे नेते म्हणून समाजात प्रतिमा असलेल्या छगन भुजबळ यांना त्यांनी ही पगडी घातली. फुले पगडी घालण्याबाबत आक्षेप असण्याचे काहीही कारण नाही, परंतु या पगडीव्दारे त्यांनी दिलेला संदेश अतिशय महत्वाचा ठरावा. यापुढे बहुजनांचेच राजकारण होईल असा त्यांनी याव्दारे दिलेला सुप्त संदेश महत्वाचा आहे. पुणेरी पगडी ही प्रामुख्याने ब्राह्मण नेत्यांच्या डोक्यावर असायची. आता मात्र आपली सामाजिक भूमिका जनतेला थेट जनतेला सांगावयाच्या हेतूने ही टोपी घातली आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नुकतेच जामीनावर सुटून आलेले नेते छगन भुजबळ यांची उपस्थीती हे देखील महत्वाचे होते. भुजबळ जेलमधून सुटल्यावर शिवसेना की भाजपा कुठे जाणार अशी चर्चा माध्यमांनी रंगविल्या होत्या. परंतु या सर्व चर्चा खोट्या ठरवित भुजबळ हे राष्ट्रवादीतच राहाणार हे या निमित्ताने स्पष्ट झाले. भूजबलांवर झालेले आरोप सिद्द व्हायचे आहेत, मात्र त्यांच्यावर राजकीय सुडापोटी अन्याय करण्यात आला, त्यांना प्रदीर्घ काळ जेलमध्ये डांबून ठेवण्यात आले अशी जनतेची भावना आहे. यात काहीसे तथ्यही आहे. त्यांच्या अटकेमागे पवार होते अशीही चर्चा झाली. मात्र भुजबळांनी या सर्व चर्चांना आता आराम दिला आहे. गेले अडीज वर्षे राजकारणापासून दूर राहिल्यामुळे भुजबळ काहीसे अलिप्त झाले होते. आता पुन्हा त्यांनी आपले बहुजनांचे नेते म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी नाशिकपासून सुरुवात करुन राज्यभर दौरे करणार आहेत. भुजबळांचा मोटा चाहता वर्ग आज राज्यात आहे, त्यांची भाषणे म्हणजे मुलुख मैदान तोफच असल्याने अनेकांना त्यांची भाषणे आवडतात. त्यातच त्यांना बहुजनांचे नेते असे त्यांच्याभोवती वलय असल्यामुळे त्यांचा राज्यातील परिघ मोठा आहे. जेलमध्ये अशताना राष्ट्रवादीत त्यांची भूमिका धनंजय मुंढे यांनी वठविली होती. हे दोघेही बहुजनांचे नेते आहेत. दोघेही फर्डे वक्ते आहेत, तसेच दोघांनाही मोठा जनाधार आहे. राष्ट्रवादीची जी अनेक बलस्थाने आहेत त्यात हे बहुजनांचे राजकारण आहे. हे पवारांनी बरोबर ओळखून राजकारणाची दिशा नक्की केली आहे. अर्थातच ही बाब राज्याच्या हिताच्या दृष्टीने महत्वाची ठरावी. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशातील समविचारी पक्षांची आघाडी जमविण्याचे शरद पवार सध्या प्रयत्नशील आहेत. काँग्रेसने पडती भूमिका घेऊन प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षाला महत्त्व देण्याचे मान्य केले तरच ही आघाडी आस्तित्वात येणार आहे. या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे हे नंतर ठरवू,असे सांगून पवारांनी रविवारच्या सभेतून अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांचे नेतृत्व चालणारे नसल्याचे स्पष्ट केले आहे. कॉग्रेसला देखील जागा किती मिळतात त्यावर त्यांची सर्व गणिते असतील. अर्थातच कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही हे स्पष्टच आहे. परंतु कॉग्रेसला किती जागा मिळतात त्यावर त्यंचा पंतप्रधान होईल किंवा नाही ते ठरेल. तसेच कॉग्रेस आघाडीचा धर्म पाळत पंतप्रधानपद दुसर्‍याला सोडून देण्याचाही विचार करु शकते. भाजपचा सर्वांत जुना सहकारी असलेल्या शिवसेनेलाही त्यांनी आघाडीत येण्याचे अप्रत्यक्ष निमंत्रण दिले आहे. अर्ताच ही शक्यता कमीच वाटते. कारम शिवसेना आल्यास डाव्या पक्षांचा त्याला नकार येऊ शकतो. ही आघाडी प्रत्यक्षात आलीच तर त्यामध्ये अनुभवाची कमतरता असेल आणि ती पोकळी फक्त शरद पवारच भरून काढू शकतात, असा दावा त्यांचे सहकारी प्रफुल्ल पटेल यांनी जाहीरपणे केला आहे. अनुभवाची पोकळी भरून काढण्यासाठी येत्या वर्षभरात पवार जिवाचे रान करणार हे आता स्पष्ट झाले आहे. पोकळी भरून काढण्याची किंमत काय असणार हे अजून गुलदस्त्यात असले, तरी पंतप्रधानपदापासून ते कळीच्या खात्याच्या मंत्रिपदापर्यंत ही किंमत असू शकते. शरद पवारांनी भुजबळांना बळ देण्याचे काम पुन्हा एकदा केले आहे. भुजबळांच्या रूपाने त्यांना फक्त महाराष्ट्रातच, नव्हे तर संपूर्ण देशामधील इतर मागासवर्गीयांची मते एकत्र करणारा नेता मिळू शकणार आहे. धनंजय मुंढे हे त्याखालोखालचे बहुजनांचे नेतृत्व ठरु शकते. एवढा मोठा तुरुंगवास भोगून आलेल्या भुजबळांचीही आता एकट्याने लढण्याची उमेद संपली असावी. साहजिकच महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाबरोबरच इतर मागासवर्गीय मतदारही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर रहावा यासाठीची धडपड एवढाच या सगळ्याचा अर्थ मर्यादित नाही. राजकारणाच्या अंकगणितामध्ये पुणेरी पगडीचा बळी देऊन फुले पगडीचा पुरस्कार करणे हेच बहुधा बेरजेचे राजकारण ठरेल, असा पवारांचा होरा आहे. एल्गार परिषदेच्या आयोजकांना सरकार सूडबुद्धीने अटक करीत असल्याचा आरोप जाहीरपणे करून पवार यांनी त्या विषयीची आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. भाजपच्या विरोधातील सर्व गटातटांना एकत्र करण्याच्या बेरजेचे राजकारणाचाच एक भाग म्हणून याकडे पाहायला हवे. दोन दशके राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणारे सत्त्याहत्तर वर्षांचे पवार पुन्हा एकदा भाजपाविरोधी उभे ठाकून नव्याने पट मांडताना दिसत आहेत. राजायतील जनता या बहुजनांच्या राजकारणाच्या दिशेने उभी राहिल असा विश्‍वास वाटतो.
------------------------------------------------------------------

0 Response to "बहुजनांचे राजकारण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel