-->
अन्सारी बोलले हे खरेच, मात्र...

अन्सारी बोलले हे खरेच, मात्र...

शनिवार दि. 12 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
अन्सारी बोलले हे खरेच, मात्र...
देशातील मुस्लिम समुदायात आज असुरक्षिततेची आणि भितीचे वातावरण असल्याचे वक्तव्य मावळते उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी केले आहे. राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अन्सारी यांनी हे वक्तव्य केले. अन्सारी यांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या दुसर्‍या कालावधीच्या अखेरच्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांच्या उद्देशाबद्दल शंका येऊ शकते. अन्सारी हे घटनातज्ज्ञ म्हणून ओळखले जातात व त्यांच्यासारख्या ज्येष्ठ विधीध्याने असे वक्तव्य करणे याला महत्व आहे. त्यांच्या या मुलाखतीमुळे त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. देशातील मुस्लिम समाजात आज भीती आणि असुरक्षेततेची भावना, असल्याचे आकलन योग्य आहे. देशातील वेगवेगळ्या प्रांतातून अशाप्रकारच्या प्रतिक्रिया येतही आहेत. भारताचा समाज अनेक जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन नांदणारा आहे. परंतु, सर्वांसाठी स्वीकार्यतचे हे वातावरण आता संकटात आहे. लोकांच्या भारतीयत्वावर आता प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याची प्रवृत्ती चिंताजनक असल्याची खंत अन्सारी यांनी व्यक्त केली आहे. लोकांवर विविध समूहाकडून होत असलेले हल्ले, अंधविश्‍वासाचा विरोध करणार्‍यांची हत्या आणि तथाकथित घरवापसीचे प्रकरणे ही भारतीय मूल्यांचे होत असलेल्या विघटनाचे उदाहरण आहे. यावरून असे दिसते की, कायदा-सुव्यवस्था लागू करण्याची सरकारी अधिकार्‍यांची क्षमता आता संपुष्टात येत आहे, असे अन्सारींनी म्हटले. त्यांच्या म्हणण्यात तथ्यच नाही असे बोलता येत नाही. कारण सध्या सेक्युलर विचारांचा माणूस हा मोदींच्या राज्यात खूष नाही. कारण त्यांच्या विचारांना आजही मुक्त वाव दिला जात नाही. जो सरकारच्या विरोधात बोलेल तो देशद्रोही अशी भूमिका सत्ताधारी मांडत आहेत, व ते धोकादायक आहे. आपली संस्कृती अशी नाही. सर्व जाती धर्मीयांना एकत्र जोडून ठेवण्याची आपल्याला समाजात क्षमता आहे, व त्यासाठी आजण स्वातंत्र्यानंतर नेहमीच प्रयत्न केले आहेत.त्यामुळे अन्सारी यांनी आपले हे वक्तव्य कार्यकाल संपण्याच्या शेवटच्या दिवशी नव्हे तर बरेच अगोदर बोलायला पाहिजे होते, हे ही तेवढेच खरे आहे.
-----------------------------------------------------------

0 Response to "अन्सारी बोलले हे खरेच, मात्र..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel