-->
सुवर्णबाजार संभ्रमावस्थेत

सुवर्णबाजार संभ्रमावस्थेत

गुरुवार दि. 20 जुलै 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
सुवर्णबाजार संभ्रमावस्थेत
वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) सोन्यावरील कर तीन पटीने वाढल्याने सुवर्ण व्यवसायात असलेल्या मंदीत आणखी भर पडली आहे. पर्यायाने सोन्याची खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या आता निम्म्यावर आली आहे. त्यात खरेदीसह मजुरीवरील जीएसटी नेमका ग्राहकांकडून किती आकारावयाचा यासंदर्भात व्यावसायिकांमध्येही संभ्रम आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीला दोन आठवडे झाले तरी सुवर्ण व्यवसायाला त्यामुळे झळाळी येत नसल्याचे चित्र बघावयास, मिळते आहे. जीएसटीपूर्वी सोन्यावर 1.2 टक्के मूल्यवर्धीत कर (व्हॅट) लागत होता. जीएसटी लागू झाल्यानंतर सोन्यावरील कर जवळपास तीनपट वाढून आता 3 टक्के लागत आहे. चालू भावाप्रमाणे पूर्वी एक तोळ्याामागे साधारण 300 रुपये कर लागायचा, आता 850 ते 900 रुपये मोजावे लागत आहेत. नेहमीच जुलै, ऑगस्ट हे महिने सुवर्ण बाजारासाठी मंदीचेच असतात. शेतकर्‍यांकडील पैसा पेरणीत अडकलेला असतो व लग्न सराईदेखील संपलेली असते. त्यामुळे साधारण 30 टक्केच ग्राहकी असते. त्यात यंदा याच काळात जीएसटी लागू झाल्याने मंदीत आणखी भर पडली. सुवर्ण बाजारातील ही स्थिती दरवर्षाच्या मंदीच्या काळाप्रमाणे आहे की जीएसटीचा परिणाम आहे, याबाबत व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असून येथे कलाकुसरीचे अलंकार तयार करणार्‍यांमध्ये
बंगाली कारागिरांची संख्या मोठी आहे. मजुरीवरील जीएसटीबाबत संभ्रम असल्याने बहुतांश कारागीर बसूनच आहेत. त्यामुळे त्यांच्या रोजंदारीवर गदा आली आहे.
कच्चा माल जेथून घेतला जातो, त्यातील अनेकांची जीएसटीची नोंदणी अजून झालेली नाही. त्यामुळे सराफ व्यावसायिक नोंदणीशिवाय माल घेण्यास तयार नाही, त्यामुळे देखील या उदयोगावर परिणाम झाला आहे. सध्या सुवर्णबाजारात मंदी असून जीएसटीमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कारागीरदेखील काम करायला तयार नाही. सोन्याची बाजारपेठ ही आपल्यासाठी खूप मोठी आहे. जादा कर त्यावर लागल्यास लगेच त्यात तस्करी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे करवाढीमुळे आता पूर्णपणे बंद झालेली सोन्याची तस्करी पुन्हा सुरु होण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारने यासंदर्भात सोन्याच्या खरेदीचा हंगाम सुरु होण्या अगोदर निर्णय घेणे गरजेचे आहे.
---------------------------------------------------------

1 Response to "सुवर्णबाजार संभ्रमावस्थेत"

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel