-->
रजनीकांत राजकारणात?

रजनीकांत राजकारणात?

रविवार दि. 28 मे 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
रजनीकांत राजकारणात?
------------------------------------------
एन्ट्रो-अमिताभ बच्चन यांंनी देखील राजीव गांधी पंतप्रधान असताना राजकारणात प्रवेश केला होता. मात्र त्यांचा हा शो फ्लॉप ठरला. शत्रृघ्न सिन्हा, राज बब्बर, धमेंद्र, हेमामालिनी, विनोद खन्ना असे चमचमते दुनियातील अनेक तारे राजकारणात आले. पंरतु येथे त्यांची डाळ फारशी काही शिजली नाही. मात्र याला दक्षिणेतील काही अभिनेते अपवाद आहेत. यात प्रामुख्याने तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन, नुकत्याच निधन पावलेल्या तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता व आंध्रचे दिवंगत मुख्यमंत्री रामाराव यांचा त्याला अपवाद ठरावा. या तिघांनीही या राज्यातील जातीची व अन्य सर्व समीकरणे खोटी ठरवित अनिर्बंध सत्ता गाजविली. दक्षिणेतील लोकांचे तेथील नट-नट्यांवर अपार प्रेम आहे व त्यापोटीच त्यांना लोकांच्या मनावर राज्य करणे शक्य झाले असावे. परंतु या राजकारणात मुरलेल्या कलाकारांना अनेकदा मतदारांनी धूळ देखील चारली आहे. मात्र काही काळाने ते त्याच गतीने पुन्हा वर देखील आले. एन.टी.रामाराव, जयललिता व एम.जी.रामचंद्रन या तिघांनाही मतदारांनी जेवढे डोक्यावर घेतले तेवढीच त्यांना धूळ देखील चारली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर रजनीकांत राजकारणात उतरत आहेत. अशा वेळी प्रश्‍न असा उपस्थित होतो की, खरोखरीच रजनीकांत राजकारणात उतरणार का?
---------------------------------------- 
मूळ मराठी असलेला दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतने राजकारणात प्रवेश करण्याविषयी सुतोवाच केले आणि संपूर्ण दक्षिण भारतात एकच हलचल निर्माण झाली. रजनीकांत हे दाक्षिणात्य अभिनेते असले तरीही त्यांची लोकप्रियता ही देशात आहे, त्यांच्याविषयी, त्यांच्या चित्रपटावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होते. अगदी अमिताभ बच्चन यांच्या तोडीस तोड त्यांचे करिअर व लोकप्रियता आहे. त्यामुळे रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश हा देशपातळीवर गाजत आहे. रजनीकांत सध्या राजकारणात येण्याची अनेक कारणे आहेत. मात्र चित्रपटात यशस्वी करिअर केल्यावर रजनीकांत राजकारणात यशस्वी होईल का, असा सवाल उपस्थित होतो. अमिताभ बच्चन यांंनी देखील राजीव गांधी पंतप्रधान असताना राजकारणात प्रवेश केला होता. मात्र त्यांचा हा शो फ्लॉप ठरला. शत्रृघ्न सिन्हा, राज बब्बर, धमेंद्र, हेमामालिनी, विनोद खन्ना असे चमचमते दुनियातील अनेक तारे राजकारणात आले. पंरतु येथे त्यांची डाळ फारशी काही शिजली नाही. यातील बहुतांश नेते राजकारण खासदार राहिले परंतु आपली राजकीय कारकिर्द काही गाजवू शकले नाहीत. नुकतेच निधन पावलेले भाजपाचे खासदार विनोद खन्ना हे तर पाच वेळा खासदार होते. मात्र एकदाच त्यांना मंत्री होता आले त्यातही त्यांनी आपला काही खास ठसा त्यात उमटविला नाही. हेमामालिनी, धर्मेंद्र हे देखील किमान तीन वेळा खासदार झाले आहेत. परंतु त्यांचाही फारसा ठसा राजकारणात उमटलेला नाही. मात्र याला दक्षिणेतील काही अभिनेते अपवाद आहेत. यात प्रामुख्याने तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन, नुकत्याच निधन पावलेल्या तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता व आंध्रचे माजी मुख्यमंत्री रामाराव यांचा त्याला अपवाद ठरावा. या तिघांनीही या राज्यातील जातीची व अन्य सर्व समीकरणे खोटी ठरवित अनिर्बंध सत्ता गाजविली. दक्षिणेतील लोकांचे तेथील नट-नट्यांवर अपार प्रेम आहे व त्यापोटीच त्यांना लोकांच्या मनावर राज्य करणे शक्य झाले असावे. परंतु या राजकारणात मुरलेल्या कलाकारांना अनेकदा मतदारांनी धूळ देखील चारली आहे. मात्र काही काळाने ते त्याच गतीने पुन्हा वर देखील आले. एन.टी.रामाराव, जयललिता व एम.जी.रामचंद्रन या तिघांनाही मतदारांनी जेवढे डोक्यावर घेतले तेवढीच त्यांना धूळ देखील चारली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर रजनीकांत राजकारणात उतरत आहेत. अशा वेळी प्रश्‍न असा उपस्थित होतो की, खरोखरीच रजनीकांत राजकारणात उतरणार का? रजनीकातं यांचे चित्रपटातील करिअर आता संपत येण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षी त्यांचा एक दक्षिणी चित्रपट फारसा चालला नव्हता. त्यामुळे आता आपले करिअर येत्या काही वर्षात संपुष्टात येणार आहे, हे वास्तव रजनीकांत यांनी गृहीत धरले असावे. तसे या अभिनेत्याचे पाय जमीनीवरच असतात. सर्वसाधारण कार्यक्रमात ते कोणताही मेक अप किंवा विग लावून येत नाहीत. आपण चित्रपटात मेकअप करुन जसे दिसतो तसे खर्‍या आयुष्यात दिसत नाही, हे ते उघडपणेे सांगतात व तसेच येतात. अशा प्रकारचे धाडस करणारे ते बहुदा एकमेव अभिनेते असावेत. त्यांच्या या वागण्यावरुन ते वास्तव स्वीकारणारे अभिनेत आहेत हे स्पष्टपणे दिसते. अशा या अभिनेत्याला आपली चित्रपटातील येत्या काळातली निवृत्ती दिसत असावी. अशा वेळी राजकारण प्रवेश करणे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. रजनीकांत यांच्याकडे स्वच्छ प्रतिमा आहे, त्यांची दानशूरवृत्ती प्रसिध्द आहे व एवढेे वर्षे चंदेरी दुनियेत राहूनही त्यांचे कोणत्याही एका महिलेशी नाव जोडले गेलेले नाही, त्यामुळे त्यांची कुटुंबवत्सल अशीच असलेली प्रतिमा या त्यांच्या दृष्टीने राजकारण प्रवेशासाठी फायदेशीर बाबी आहेत. आता प्रश्‍न येतो तो म्हणजे, रजनीकांत स्वत:चा पक्ष स्थापन करणार की भाजपामध्ये प्रवेश करणार? स्वत:चा पक्ष स्थापन करुन सत्तेवर येणे ही काही सोपी बाब नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज लागते. सध्या रजनीकांत यांच्याकडे चाहत्यांची फौज आहे, पण ते त्यांचे कार्यकर्ते होतील का, हा प्रश्‍न आहे. कारम सध्या त्यांचे हे चाहते कोणत्याना कोणत्या तरी पक्षाशी जोडले गेले आहेत. ते आपला सध्याचा पक्ष सोडून रनजीकांत यांच्या पक्षात येतील का, हा प्रश्‍न आहे. आंध्रप्रदेशात एन.टी.रामाराव यांनी मात्र आपले असे झांझावात उभे करुन आपला नव्याने स्थापन केलेला पक्ष सत्तेत आणून दाखविला होता. तसा झंझावात रजनीकांत करतील का? सध्या तामीळनाडूचा विचार करता दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ ए.आय.डी.एम.के.तच नाही तर संपूर्ण राज्यातच आहे. द्रमूकचे नेते करुणाकरण हे देखील 90च्या घरातील असून त्यांच्यानंतर त्यांचा वारसदार कोण असेल यासंबंधी चर्चा असते. अशा प्रकारे द्रमूकमधील नेतृत्वाची पोकळी व अण्णाद्रमूकमधील नेतृत्वाचा अभाव यात रजनीकांत आपली जागा नेमकी कशी तयार करतील, असा प्रश्‍न आहे. खरे तर त्यांचासारका लोकप्रिय अभिनेता आज संपूर्ण दक्षिणेत नाही. तामीळनाडूत तर त्यांची लोकप्रियता शिगेला आहे. मात्र त्यांचा जन्म तामीळनाडूतील नाही, तसेच ते सध्याच्या तामीळांच्या जातीय राजकारणातही ते बसू शकत नाहीत ही त्यांची पडकी बाजू आहे. त्यामुळे ते भाजपामध्ये जातील का, असा प्रश्‍न पडतो. भाजपात त्यांनी प्रवेश करणे व नव्याने पक्ष स्थापन करणे यासाठी त्यांना सारखीच मेहनत घ्यावी लागणार आहे. अर्थात भाजपाची तामीळनाडूत ताकद नगण्यच आहे. त्यामुळेे नवीन पक्ष स्थापन करण्यासारखीच मेहनत भाजपात रजनीकांत यांना करावी लागणार आहे. मात्र केंद्रीय भाजपाचे नेतृत्व त्यांना सर्व रसद पुरवू शकेल. परंतु भाजपाच्या चौकटीत रजनीकांत काम करु शकतील का, हा प्रश्‍न आहे. कदाचित असेही असेल रजनीकांत हे राजकारण प्रवेशाची चर्चा करुन आपली प्रसिद्दी वाढवून घेत असतील व भविष्यातील चाचपणीही त्याव्दारे करण्याचा त्यांचा इरादा असू शकतो. आपला आगामी चित्रपट हिट होण्यासाठी त्यांनी दररोज लोकांना बोलावून त्यांच्यासोबत फोटो करण्याची मालिका सुरु केली आहे. रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश हा त्यांना मुक्यमंत्रीपदापर्यंत पोहोचविणारा ठरला पाहिजे, अन्यथा त्यांच्या राजकारणास काहीच अर्थ राहाणार नाही. रजनीकांत राजकारणात खरोखरीच येणार का, हे कोडे सुटायला अजून काही काळ लागेल असेच दिसते.
--------------------------------------------------------

0 Response to "रजनीकांत राजकारणात?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel