-->
मान्सूनची आगेकूच

मान्सूनची आगेकूच

सोमवार दि. 12 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
मान्सूनची आगेकूच 
कर्नाटकात दाखल झालेला मान्सून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत आहे. गुरुवारी मान्सूनने गोवा आणि दक्षिण कोकणातील वेगुर्ल्यापर्यंत मजल मारली आहे. मुंबई आणि कोकणाचा उत्तर भाग, मध्य महाराष्ट्रात आता कधीही दाखल होईल अशी स्थीती आहे. गोवा व कोकणाच्या दक्षिण भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. सध्या मान्सूनला अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. तसेच कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश या भागातही व्यापण्यासाठी पोषक स्थिती आहे. तसेच बंगालचा उपसागर, त्रिपुरा, आसाम, मेघालय, हिमालय, पश्‍चिम बंगाल या भागात अनुकूल स्थिती तयार होत आहे. अरबी समुद्रात तयार झालेले चक्राकार वारे ओमानकडे सरकल्यामुळे रेंगाळलेला मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे गुरुवापर्यंत थेट दक्षिण कोकणापर्यंत मान्सून दाखल झाला. उत्तर भारतातील पंजाब ते ओडिसाचा उत्तर भाग, राजस्थानचा उत्तर भाग ते बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र मध्यप्रदेशचा उत्तर भाग, छत्तीसगड आणि उडिसा हा भाग व्यापण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मिर या भागातही चक्राकार वार्‍याची स्थिती तयार झाली असून ती समुद्रसपाटीपासून 3.1 आणि 3.6 किलोमीटर उंचीवर आहे. पाकिस्तानच्या मध्यभागातही चक्राकार वार्‍याचे क्षेत्र तयार झाले असून ते राजस्थानच्या पश्‍चिम भागापर्यत आहे. समुद्रसपाटीपासून ते 2.1 किलोमीटर उंचीवर आहे. बंगाल उपसागराचा पूर्व भाग, आणि अंदमान समुद्राचा उत्तर भागात समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वार्‍याची स्थिती तयार झाली आहे. या जोडीला आंध्रप्रदेश आणि बंगाल उपसागर, उडिसाचा दक्षिण भागातही चकाक्रार वार्‍याची स्थिती तयार झाली आहे. बिहारचा अग्नेय भाग व परिसरात अशीच स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच छत्तीसगडच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. देशातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या 48 तासामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, कोकण, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, अंदमान व निकोबार परिसरात जोरदार पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगाना, कर्नाटकाचा दक्षिण भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. आता मान्सून जम्मू आणि काश्मीर, हरियाना, मध्य प्रदेशचा पश्‍चिम भाग, उत्तर प्रदेशचा पश्‍चिम भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, त्रिपूरा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगाना, केरळ, तमिळनाडू, अंदमान व निकोबार परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कधीही सुरु होईल अशी अपेक्षा आहे. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज आजपर्यंत तरी खरा ठरला आहे. यंदा पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय होईल हा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. आता देशात शंभर टक्क्याहून पाऊस असेल हा अंदाज देखील खरा ठरो असे म्हणावेसे वाटते. यंदा अल् निओचा धोका देशावर नाही, त्यामुळे पाऊस समाधानकारक असेल असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

0 Response to "मान्सूनची आगेकूच "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel