-->
इंद्रेश कुमारांचा सल्ला

इंद्रेश कुमारांचा सल्ला

गुरुवार दि. 8 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
इंद्रेश कुमारांचा सल्ला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी मांस खाणे हा रोग असल्यामुळे मुस्लिमांनी मांस खाणे सोडून द्यायला हवे, असे विधान केले आहे. दिल्लीच्या जामा मिलिया इस्लामिया विद्यापीठात रमजाननिमित्त आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत त्यांनी अनेक मुक्ताफळे उधळली. यावेळी त्यांनी मांस खाणे हा एकप्रकारचा रोग असल्यामुळे मुस्लिमांनी ही सवय सोडून द्यावी, असा अजब सल्ला दिला. इंद्रेश कुमार यांच्या या वक्त्यावरुन केवळ मुस्लिमच मांस खातात असा अर्थ निघतो. आपल्याकडे केवळ मुस्लिमच नव्हे तर सर्व धर्मातील लोक हे मांस खाणारे आहेत. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार मांख खाणे किंवा न खामे पसंत करतो. त्यात धर्माचा काही अडसर नाही, हे वास्तव अजून इंद्रेश कुमार यांना माहित नसावे. इफ्तार पार्टीच्या या कार्यक्रमात इंद्रेश कुमार यांनी भाषण करताना इंद्रेश कुमार यांनी म्हटले की, माझी मुस्लिम समाजाला तीन आवाहने आहेत. पहिलं आवाहन म्हणजे मुस्लिमांनी रमजानच्या काळात त्यांच्या परिसरात, गल्लीत, मस्जिद आणि दर्गा अशा सर्व ठिकाणी झाडे लावावीत. जेणेकरून प्रदुषणाला आळा बसून पर्यावरणाचे रक्षण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिमांनी त्यांच्या घरात तुळशीचे रोपटे लावावे. अरबी भाषेत तुळशीला जन्नत का झाड म्हटले असून त्यामुळे जन्नत प्राप्त होते. तिसरी गोष्ट म्हणजे मुस्लिमांनी मांस खाणे सोडून द्यावे. प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांनी कधीच मांस सेवन केले नव्हते. मांस खाणे हा एकप्रकारचा रोग आहे. तर दूध हे औषध आहे. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांच्या सरबतात दूध घालावे, असा कुमार यांचा आग्र आहे. कुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे इफ्तार पार्टीचा कार्यक्रम साहजिकच वादग्रस्त ठरला. मुळात इंद्रेश कुमार यांना इफ्तार पार्टीला बोलवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेटबाहेर जोरदार निदर्शनेही केली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना मारहाण आणि अटक करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जामा मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे कुलगुरू तलत अहमद हेदेखील उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. इंद्रेश कुमार यांनी देलेला हा सल्ला बहुतांश संघ नेत्यांना पटणारा आहे, मात्र सरकारनेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे.
-----------------------------------------------------------

0 Response to "इंद्रेश कुमारांचा सल्ला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel