-->
बालचित्रवाणी इतिहासजमा

बालचित्रवाणी इतिहासजमा

मंगळवार दि. 6 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
बालचित्रवाणी इतिहासजमा
ज्या काळी मोबाईल, टी.व्ही.चॅनेल्स व सोशल मिडिया अस्तित्वात नव्हता त्याकाळी मुलांचे करमणूक करण्यासाठी असलेली बालचित्रवाणी आता कालाच्या ओघात इतिहास जमा झाली आहे. खरे तर आजही बालचित्रवाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन चालविती आली असती, परंतु सध्याच्या सरकारलाच यात रस नाही त्यामुळे तिचे दरवाजे कायमचेच बंद करण्यात आले. 80च्या दशकापर्यंत जे बालक म्हणून वावरत होते त्यांनी या बालचित्रवाणीचा ुरेपूर फायदा गेतला आहे. खरे तर त्याकाळची पिढी ही बालचित्रवाणीच्या संस्कारात मोठी झाली आहे. आजची दहा ते बारा वर्षांपर्यंतची बालके टी.व्ही. चॅनेल्ससमोर बसून कार्टून पहात असतात व त्यातील बर्‍या-वाईट गोष्टी शिकत असतात. परंतु त्या काळी बालचित्रवाणी ऐन भरात असतानाचे तेथील साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरण हेवा करण्यासारखे होते. शांताबाई शेळके यांच्यापासून मंगेश पाडगावकरांपर्यंत अनेक नामवंतांचे येथेे राबता असे. या सार्‍या मान्यवरांच्या मबालचित्रवाणीफवरील उपस्थितीमुळे केवळ मुले-मुलीच, नाही तर त्यांच्या पालकांनाही आनंद दिला आहे. बालचित्रवाणीवरील कार्यक्रमांद्वारे मुलामुलींना बोधप्रद शिक्षण दिले जात असे; मात्र त्यासाठी फळा व खडू अजिबात वापरला जात नसे. खेळकर वातावरणात गोष्टी, गंमतगाणी, प्रश्‍नमंजूषा अशा विविध मार्गाने एकीकडे मनोरंजन करणारा आणि मनोरंजनातून ज्ञान-विज्ञानाचे धडे देणारी, अशी ही बालचित्रवाणी होती. अनेकदा चित्रपटगृहातही चित्रपट सुरु होण्याच्या अगोदर काही मिनीटांची बालकांसाठी लहान फिल्म दाखविली जाई. केवळ बालकेच नव्हे तर त्यांचे पालकही हे आवर्जून बघीत. त्यातील प्रत्येक बाबीतून तरुण पिढीला काही ना काही संदेश दिला जाई. सध्याच्या कार्टून फिल्ममधून असा प्रकारचा बोधप्रद संदेश किती दिला जातो हा एक संशोधनाचा विशय ठरेल. 90च्या दशकानंतर आर्थिक शिथीलीकरण सुरु झाल्यावर तंत्रज्ञानाने उत्तुंग झेप घेतली आणि टीव्हीच्या शेकडो वाहिन्या घरोघरी आल्या. त्यामुळे जगच भारताच्या अंगणात येऊन ठेपले आणि मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच अवांतर सामान्यज्ञानाचे मनोरंजक पद्धतीने धडे देणारी बालचित्रवाणी या चॅनेल्सच्या धबडग्यात कधी हरवून गेली, ते कळलेही नाही. शेवटी आता ही संस्था बंद करण्यापर्यंत पोहोचली. खरे तर यासाठी राज्य शासन दरवर्षी जेमतेम दोन कोटी रुपयांचे अनुदान देत होते. परंतु तेवढेही देमे आता त्यांना जड वाटू लागले. सध्याच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ही चित्रवाणी सुरुच ठेवण्याची जबाबदारी शासनाची होती. खासगी चॅनेल्ससाठी किंवा सरकारी दूरदर्शनसाठी चांगले कार्यक्रम करुन देण्याचे काम जर या बालचचित्रवाणीने केले असते व त्यासाटी त्यांना सासनाने मदत केली असती तर ही संस्था तगली शअती. परंतु ही संस्था सुरु ठेवण्याची सरकारची इच्छाही नाही. बालचित्रवाणी ही केवळ तंत्रज्ञानाचे धडे देणारी संस्था नव्हती, तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचे एक संचित होते. हा ठेवा आपण आता गमावला आहे.
या संस्थेकडे या ठेव्याबरोबरच दोन स्टुडिओ, संगणक यंत्रणा, उच्च दर्जाचे कॅमेरे आदी अनेक गोष्टी आहेत. त्यांचा सुयोग्य वापर करून घेतला तर नवीन पिढीही यातून काही नव्या आनंददायी गोष्टी शिकू शकेल. पण सरकारनेच आता बालचित्रवाणीला टाळे ठोकल्यामुळे सर्वच गोष्टी आता संपल्या आहेत.

0 Response to "बालचित्रवाणी इतिहासजमा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel