-->
यंत्र खोट बोलत नाही...!

यंत्र खोट बोलत नाही...!

रविवार दि. 11 जून 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
यंत्र खोट बोलत नाही...!
-----------------------------------
एन्ट्रो- गेल्या दोन महिन्यात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये केंद्रात सत्तेत असलेला भाजपा विजयी झाल्याने सर्वच विरोधी पक्षांनी मतदान यंत्रांच्या (ई.व्ही.एम.) विश्‍वाससार्हतेबाबत विचारमंथन सुरु केले आहे. यात मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचीही शंका व्यक्त केली आहे. मात्र त्यावेळी एक विचार केला पाहिजे की, पंजाबमध्ये कॉग्रेसचे सरकार कसे आले? गोव्यात सर्वाधिक जागा कॉग्रसेला कशा मिळाल्या? मतदान यंत्रांमध्ये खरोखरीच काही गडबडी असत्या तर या दोन राज्यातही भाजपाचा पराभव झाला असता का? याचा विचार केला पाहिजे. 2009 साली केंद्रात कॉग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेत आले त्यावेळी भाजपाचे त्यावेळचे नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व अनेक भाजपा नेत्यांनी देखील मतदान यंत्रांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप करुन त्यामुळेच पुन्हा कॉग्रेस सत्तेत आली असा आरोप केला होता. जर मतदान यंत्रात बिघाड करुन सत्तेत येणे एवढे सोपे असते तर हा घोटाळा कॉग्रेसनेच 2014 साली केला असता व नरेंद्र मोदी सत्तेत आलेच नसते. 2014 साली निवडणुका झाल्या त्यावेळी कॉग्रेसच सत्तेत होती, त्यामुळे त्यांना अशा प्रकारचा घोटाळा करुन आपली सत्ता टिकविणे सहज शक्य झाले असते. परंतु यंत्र काही खोट बोलत नाही हेच खरे...
---------------------------------------------------
गेल्या दोन महिन्यात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये केंद्रात सत्तेत असलेला भाजपा विजयी झाल्याने सर्वच विरोधी पक्षांनी मतदान यंत्रांच्या (ई.व्ही.एम.) विश्‍वाससार्हतेबाबत विचारमंथन सुरु केले आहे. यात मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचीही शंका व्यक्त केली आहे. मात्र त्यावेळी एक विचार केला पाहिजे की, पंजाबमध्ये कॉग्रेसचे सरकार कसे आले? गोव्यात सर्वाधिक जागा कॉग्रसेला कशा मिळाल्या? मतदान यंत्रांमध्ये खरोखरीच काही गडबडी असत्या तर या दोन राज्यातही भाजपाचा पराभव झाला असता का? याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, या विजयामुळे भाजपाला एक उन्माद चढला आहे. त्यांना असे वाटते की, आपल्या ध्येयधोरणांवर जनतेने ही मोहोर लगावली आहे. मात्र वस्तुस्थिती अशी नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. सरकारची धोरणे आम जनतेस मान्य नाहीत, मात्र त्याचबरोबर एक प्रबळ विरोधी पक्षांची एकजूट होण्याचीही आवश्यकता आहे. नरेंद्र मोदींची तीन वर्षांपूर्वी सुरु झालेली लाट अजून पूर्णपणे रोखली गेलेली नाही. लालूप्रसाद यादव-नितीश कुमार यांनी ही रोखण्यात यश मिळविले. मात्र उत्तरप्रदेशात मुलायमसिंग यादव यांना ही लाट रोखता आली नाही, हे देखील तेवढेच खरे. मतदान यंत्रात गडबडी केल्या जातात या आरोपात काही तथ्य नाही. 2009 साली केंद्रात कॉग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेत आले त्यावेळी भाजपाचे त्यावेळचे नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व अनेक भाजपा नेत्यांनी देखील मतदान यंत्रांमध्ये घोटाला असल्याचा आरोप करुन त्यामुळेच पुन्हा कॉग्रेस सत्तेत आली असा आरोप केला होता. जर मतदान यंत्रात बिघाड करुन सत्तेत येणे एवढे सोपे असते तर हा घोटाळा कॉग्रेसनेच 2014 साली केला असता व नरेंद्र मोदी सत्तेत आलेच नसते. 2014 साली निवडणुका झाल्या त्यावेळी कॉग्रेसच सत्तेत होती, त्यामुळे त्यांना अशा प्रकारचा घोटाळा करुन आपली सत्ता टिकविणे सहज शक्य झाले असते. परंतु यंत्र काही खोट बोलत नाही हेच खरे... हे वास्तव आपण गृहीत धरले तरीही यावेळी देखील मतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप संसदेपासून सोशल मीडियापर्यंत सर्वच माध्यमातून केला. निवडणूक आयोगाने आपली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे निर्दोष असल्याचा अनेक वेळा खुलासा केला. या खुलाशाकडे दुर्लक्ष करत आप पक्षाने थेट दिल्ली विधानसभेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कशी छेडछाड करता येते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आपचे एक मंत्री सौरभ भारद्वाज यांनी आपण सॉफ्टवेअरतज्ज्ञ असून 90 सेकंदांत मतदान यंत्र हॅक करू शकतो असा दावा केला होता. या दाव्यानंतर अनेकांमध्ये बळ संचारले होते. पण सौरभ भारद्वाज यांनी हे यंत्र कुठून आणले याचा खुलासा केला नाही. त्यामुळे यंत्राबद्दल गैरसमज व संशय वेगाने वाढत गेला. अखेरीस निवडणूक आयोगाने स्वत: या वादात उडी मारली. गेल्या आठवड्यात सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून यंत्राबद्दलचे दावे-आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांना आव्हान दिले. या प्रात्यक्षिकात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांत वापरण्यात आलेली 14 यंत्रे या पक्षांपुढे ठेवली होती. महत्त्वाची बाब अशी की, जे पक्ष तावातावाने निवडणूक आयोगावर बोट दाखवत होते त्यापैकी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस व माकपचे प्रतिनिधी हजर होते व या दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींना कोणताही आरोप सिद्ध करता आला नाही. आपने मतदान यंत्राचा मदरबोर्ड बदलण्याची तर्कहीन मागणी केली. निवडणूक आयोगाने मदरबोर्ड बदलण्याची आपची मागणी म्हणजे उद्या कोणीही या यंत्राचे उत्पादन करू शकेल व ती यंत्रे निवडणुकांत वापरावीत अशी निवडणूक आयोगाकडे मागणी करेल, अशा शब्दांत साफ फेटाळली. तूर्तास निवडणूक आयोगाने हा विषय संपला असल्याचे जाहीर केले. 2000 पासून गेली 17 वर्षे देशाच्या तीन सार्वत्रिक लोकसभा निवडणुका व 107 विधानसभा निवडणुका मतदान यंत्राद्वारे झाल्या आहेत. या यंत्रावर अनाठायी आरोप या काळात झाले आहेत. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर भाजपने या यंत्राच्या विरोधात पहिल्यांदा राळ उडवून दिली होती व त्यावर भाजपच्या काही माध्यमवीरांनी प्रचार पुस्तकेही लिहिली होती. आज हेच माध्यमवीर मतदान यंत्रांची मखलाशी करताना दिसतात. जगातील सर्वात मोठ्या असलेल्य आपल्या लोकशाहीचा प्रवास मतपेट्यांपासून सुरू झाला आहे. प्रत्येक नागरिकाला जो अगदी दुर्गम, डोंगरदर्‍यांमध्ये राहत असला तरी त्याला मतदान करता यावे म्हणून आपला निवडणूक आयोग प्रयत्नशील राहिला आहे. आपल्याकडील मतदान घेणे व ती सर्व प्रक्रिया पूर्ण करणे ही काही सोपी बाब नव्हे. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात एवढी यंत्रणा ुभारणे हे कौतुकास्पदच आहे. टी. एन. शेषन यांनी निवडणूक आयोगाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रत्येक नागरिकाला मतदार ओळखपत्र देण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला होता. त्यावरही त्या काळात प्रचंड राजकीय टीका झाली होती. मात्र याचे अनेक सकारात्मक परिणाम दिसले. बोगस मतदानाचे प्रकार कमी झाले. त्यानंतर मतदान यंत्रे आली. सुरुवातीला काही ठिकाणी त्यापूर्वी प्रयोगिक तत्वावर ही यंत्रे वापरण्यात आली होती. आता या मशिन्समुळे आपली मतमोजणी जेमतेम चार तासांवर आली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या व विस्तिर्ण पसरलेल्या देशात पारदर्शक मतदान पध्दती अंमलात आली आहे. पूर्वी मतपेट्या पळवण्याचे, मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे गैरप्रकार होत. त्यात झपाट्याने घट झाली. भविष्यात आपण इंटरनेटव्दारेही मतदान करण्याचा काळ येऊ शकतो. आज अनेक विकसीत देशसुध्दा मतपेटीव्दारे पारंपारिक पध्दतीने मतदान घेताना दिसतात, मतदान यंत्राला विरोध करणारे देखील हा मुद्दा पुढे करतात. एवढे विकसीत देशही मतदानासाठी पारंपारिक पद्धती वापरतात ते मुर्ख आहेत का, असा त्यांचा प्रश्‍न असतो. मात्र आपल्याकडील मतदान यंत्रणा ही रशियातील पुढील निवडणुकीत वापरली जाणार आहे, हे देखील आपण स्वत:ने विकसीत केलेल्या या तंत्रज्ञानाचा विजय म्हटला पाहिजे.
----------------------------------------------------------

0 Response to "यंत्र खोट बोलत नाही...!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel